agriculture news in marathi, cane sugar workers demand thousands of rupees | Agrowon

तोडणी कामगारांकडून होतेय हजारो रुपयांची मागणी
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 2 जानेवारी 2018

कोल्हापूर  : गेल्या वर्षीपेक्षा यंदा ऊसतोडणी कामगार कमी आले आहेत. आधीच गळीत हंगाम धीमा झालेला असतानाच आता ऊस उत्पादकाला खिंडीत पकडण्याचे प्रयत्न तोडणी यंत्रणेकरून सुरू झाले आहे. अनेक तोडणी कामगारांकडून हजारो रुपयांची मागणी उत्पादकांकडे केली जात आहे. कारखान्याकडून पैसे मिळत असतानासुद्धा अशी मागणी केली जात असल्याने उत्पादक हैराण झाले आहेत. कारखान्यांकडूनही या प्रकाराकडे काणाडोळा केला जात असल्याने उत्पादकांतून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

कोल्हापूर  : गेल्या वर्षीपेक्षा यंदा ऊसतोडणी कामगार कमी आले आहेत. आधीच गळीत हंगाम धीमा झालेला असतानाच आता ऊस उत्पादकाला खिंडीत पकडण्याचे प्रयत्न तोडणी यंत्रणेकरून सुरू झाले आहे. अनेक तोडणी कामगारांकडून हजारो रुपयांची मागणी उत्पादकांकडे केली जात आहे. कारखान्याकडून पैसे मिळत असतानासुद्धा अशी मागणी केली जात असल्याने उत्पादक हैराण झाले आहेत. कारखान्यांकडूनही या प्रकाराकडे काणाडोळा केला जात असल्याने उत्पादकांतून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

यंदा मजूरटंचाईची जादा झळ
करार केलेल्या ऊसतोडणी कामगारापैकी केवळ साठ टक्केच कामगार यंदा दाखल झाले आहेत. यामुळे कारखान्यांचा तोडणी कार्यक्रम पुनर्रचित करावा लागत आहे. चाळीस टक्के कामगारांची उणीव भरून काढताना कारखान्यांना नाकीनऊ येत आहेत. यामुळे ऊसतोडणी खूपच धीम्या गतीने सुुरू आहे. ज्या गावात तीन ते चार ऊसतोडणी कामगारांची टोळी असायची, त्या गावांमध्ये एक किंवा दोन इतक्‍याच प्रमाणात टोळ्या दाखल झाल्या आहेत. साहजिकच याचा ताण कारखान्यांच्या ऊसतोडणी यंत्रणेवर पडत आहे. शेतकऱ्यांना वेळेत तोड देणे शक्‍य होत नसल्याने कारखान्यांचे प्रतिनिधी हवालदिल झाले आहेत. यातच या कामगारांकडून आर्थिक मोबदल्याची मागणी केली जात असल्याने शेतकरी पुरता घायाळ झाला आहे.

अशी केली जाते मागणी
तुमच्या उसाला वाडे नाही, ऊस पडलेला आहे, उसात कचरा आहे, उसावर वेल आहे, उसावर मावा आहे, रोगट आहे, अशी अनेक कारणे तोडणी कामगारांकडून उत्पादकांना सांगण्यात येत आहेत. अडचणीतला ऊस असेल तर एकरी पाच पाच हजार रुपये उत्पादकांकडून उकळले जात आहेत. कोणत्याही परिस्थितीत उसाची तोडणी गरजेची असल्याने मुकाटपणे शेतकरी ही रक्कम तोडकऱ्यांना देत आहेत.

कारखाने हतबल
अगोदरच मजूर नसल्याने तोडणी कार्यक्रम वेळेत करण्यासाठी कारखाने धावपळ करीत आहेत. यामुळे या कामगारांकडून होणाऱ्या अनाठायी मागण्यांबाबत कारखाने गंभीर नसल्याचे चित्र आहे. परिणामी या खेळात उत्पादकाचीच कोंडी होत आहे.

टॅग्स

इतर अॅग्रो विशेष
आज शिवजयंती : शिवनेरीवर पारंपारिक...पुणे : फाल्गुन वद्य तृतीया या तिथीनुसार आज (ता....
अतितीव्र हवामानस्थितीला कर्बाचे वाढते...पुणे : वातावरणातील कार्बनडाय ऑक्साईडचे (कर्ब)...
कमतरतेनुसार सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर...अलीकडे सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता अधिक...
पिंप्री गावाने कमावले लसूणघास शेतीत नाव पिंप्री (वळण) (ता. राहुरी, जि. नगर) हे गाव मुळा...
दुष्काळातही सुरती हुरड्याची  चवच काही...औरंगाबाद जिल्ह्यातील सारंगपूर येथील अरुण कडूबाळ...
। तुका म्हणे कान्हा । भूक लागली नयनां ।।देहू : तुकाराम तुकाराम...असा नामघोष आणि...
नांदेड जिल्ह्यात कापूस उत्पादकता...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात २०१८-१९ च्या खरीप...
नगरची लढत राहणार लक्षवेधीनगर : राज्याच्या सर्वाधिक लक्ष असलेल्या नगर (...
रब्बी पीकविम्याला बोगस प्रकरणांचे ग्रहणमुंबई ः २०१८-१९ च्या रब्बी हंगामात पंतप्रधान...
सहा कारखान्यांची धुराडी थंडावलीऔरंगाबाद  : मराठवाडा व खानदेशातील पाच...
बेदाण्याला दराची गोडीसांगली ः होळी सणाच्या पार्श्वभूमीवर बेदाण्याची...
आनंदाचा उतरता आलेखजगभरातील आनंदी देशांचा अहवाल (वर्ल्ड हॅपीनेस...
आदित्यात् जायते वृष्टि:जगात एकूण १९५ देश आहेत, पण आकार, आर्थिक स्थिती,...
आज संत तुकाराम बीजदेहू, जि. पुणे  : जगद्‌गुरू संत श्री तुकाराम...
उज्ज्वल भविष्याचा सर्वोत्तम मार्ग ‘जल...भारत जलसंकट समस्येचा सामना करत आहे. वाढती...
जल‘मुक्त’ शिवारवॉ टर ग्रीडच्या माध्यमातून मराठवाड्यातील सर्व...
राज्यात शंभर लाख टन साखर उत्पादनभवानीनगर, जि. पुणे ः राज्यात ३० टक्के हुमणीग्रस्त...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अवकाळीची...पुणे : रविवारी, सोमवारी पुन्हा काही अंशी...
जैविक कीड-नियंत्रणासाठी उपयुक्त बुरशीगेल्या काही वर्षांमध्ये कीडनियंत्रणासाठी...
केशर आंबा फळगळीची कारणे अन् उपाययोजना  सद्यःस्थितीत हवामान आंबा झाडांसाठी...