agriculture news in marathi, Capital investment in farming has increased | Agrowon

शेतीत भांडवली गुंतवणूक वाढली : गिरीश बापट
टीम अॅग्रोवन
रविवार, 3 डिसेंबर 2017

मोशी, पिंपरी- चिंचवड :  शेती आणि शेतकऱ्यांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी भाजप सरकारच्या वतीने शेतीक्षेत्राचे बजेट २० हजार काेटींवरून ६१ हजार कोटी रुपयांपर्यंत वाढविले आहे. यामुळे शेतीत भांडवली गुंतवणू वाढली आहे. सरकारच्या माध्यमातून सिंचनासह शेतीसाठी विविध योजना रावबिण्यात येत आहे. तसेच शेतकरी कर्जमुक्तही हाेत असल्याने शेतकरी समाधान व्यक्त करीत असून, हे सरकारचे यशच म्हणावे लागेल, असे प्रतिपादन अन्न व नागरी पुरवठा आणि पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केले.

मोशी, पिंपरी- चिंचवड :  शेती आणि शेतकऱ्यांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी भाजप सरकारच्या वतीने शेतीक्षेत्राचे बजेट २० हजार काेटींवरून ६१ हजार कोटी रुपयांपर्यंत वाढविले आहे. यामुळे शेतीत भांडवली गुंतवणू वाढली आहे. सरकारच्या माध्यमातून सिंचनासह शेतीसाठी विविध योजना रावबिण्यात येत आहे. तसेच शेतकरी कर्जमुक्तही हाेत असल्याने शेतकरी समाधान व्यक्त करीत असून, हे सरकारचे यशच म्हणावे लागेल, असे प्रतिपादन अन्न व नागरी पुरवठा आणि पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केले.

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने मोशी येथील श्री नागेश्‍वर महाराज उपबाजार आवारात आयाेजित शेतकरी तांदूळ महोत्सव, देशी गाई, स्पर्धा, प्रदर्शन व विक्री महोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमात बापट बाेलत हाेते. या वेळी जलसंपदा व जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे, आमदार महेश लांडगे, महापौर नितीन काळजे, बाजार समितीचे मुख्य प्रशासक दिलीप खैरे, उपमुख्य प्रशासक भूषण तुपे, संचालक एकनाथ टिळे, संतोष खांदवे, गाेरख दगडे, राजेंद्र कोरपे, मंगेश मोडक, अण्णा शिंदे, प्रताप चव्हाण, दादासाहेब घाटे, क्रातीताई सोमवंशी आदी मान्यवर उपस्थित होते.

मंत्री शिवतारे म्हणाले, ‘हिंदू धर्मामध्ये देशी गाईंचे पावित्र्य आणि महत्त्व असामान्य आहे. या गाईंचे संवर्धन, प्रचार व प्रसार यासाठी पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीने देशी गाईंचे भरविलेले हे प्रदर्शन हे शेतकरी आणि नागरिकांना देशी गाेवंशाचे महत्त्व पटवून देण्यासाठी मार्गदर्शक ठरणार आहे.

तांदूळ महोत्सवामध्ये जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी हातसडीचा इंद्रायणी, कोलम, बासमती तांदूळ, सेंद्रिय गूळ, काकवी, गाईंचे दूध, गोमूत्र, शेण आदींपासून बनविलेले पदार्थ विक्रीसाठी ठेवले असून विविध प्रकारच्या २०० हून अधिक देशी गाई या स्पर्धा-प्रदर्शनामध्ये सहभागी केल्या आहेत. उद्या रविवार (ता.३) पर्यंत सुरू असणार आहे.

इतर बातम्या
पुणे विभागात पाणीटंचाईची तीव्रता वाढलीपुणे : पावसाळा संपताच उन्हाचा चटका वाढल्याने पुणे...
नांदेड जिल्ह्यात मुगाची उत्पादकता...नांदेड ः यंदा नांदेड जिल्ह्यातील १४ तालुक्यांतील...
निर्यात वाढविण्यासाठी कृषी विभाग...परभणी ः शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर...
दुष्काळी तालुक्यांतून अकोले, कोपरगावला...नगर : अकोले तालुक्‍यात पाऊस पडण्याच्या प्रमाणात...
सोयाबीनने मोडले शेतकऱ्यांचे कंबरडेअमरावती  ः दिवाळीच्या मोसमात दोन पैसे...
संतप्त शेतकऱ्यांनी हवामान विभागाला...पुणे : हवामान विभागाचा अंदाज चुकीचा...
शेतीमालाच्या साठवणुकीसाठी उभारणार गोदामेकऱ्हाड, जि. सातारा ः शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला...
हापूसचा ‘अल्फोन्सो जीआय’ वादातपुणे   : केंद्र सरकारने हापूस आंब्याला ‘...
तिसगाव उपबाजारात चाऱ्यासाठी उसाला...तिसगाव, जि. नगर  : पाथर्डी तालुक्‍यात...
साखर निर्यातीसाठी कारखान्यांनी पुढे...मुंबई   : अडचणीतील साखर उद्योगाला...
जलयुक्त शिवार, शेततळ्यांमुळे संरक्षित...अमरावती   : जिल्ह्यात शेततळी, जलयुक्त शिवार...
दक्षिण कोकणात बुधवारपासून शक्यतापुणे  : कमाल तापमानात चढ-उतार होत असला तरी...
बांगलादेशातील रेशीम उद्योग...प्राचीन काळी भारतीय उपखंडामधील रेशमी कापड हे जगभर...
पंजाब, हरियानात पिकांचे अवशेष जाळण्यावर...गुडगाव : पिकांचे अवशेष जाळण्यावर असलेली बंदी...
शबरीमला मंदिर प्रवेशप्रकरणी केरळमध्ये...तिरुअनंतपुरम, केरळ : शबरीमला मंदिरात सर्व...
नैसर्गिक समतोलासह खाद्यसुरक्षेसाठी...२०५० मध्ये जगाची लोकसंख्या १० अब्जांपर्यंत पोचेल...
भातशेती वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपडनगर ः ‘पोळ्यापासून पाऊस नाही. पोळ्याला गेला तरी...
म्हैसाळ उपसाचे मागणीअभावी काही पंप बंदसांगली ः म्हैसाळ उपसा सिंचन आठवडाभरापूर्वी पंप...
सातारी आल्याच्या बाजारभावात सुधारणासातारा ः आले पिकाच्या दरात सुधारणा झाली आहे....
कमी पाऊस झाल्याने मनरेगा’च्या मजुर...नगर : पावसाने हात आखडता घेतल्याने खरीप हंगाम वाया...