साताऱ्यात ढोबळी मिरची दहा किलोला २०० ते ३०० रुपये

साताऱ्यात ढोबळी मिरची दहा किलोला २०० ते ३०० रुपये
साताऱ्यात ढोबळी मिरची दहा किलोला २०० ते ३०० रुपये

सातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता. ५) ओली ढोबळी मिरची, भुईमूग शेंग, कारली, फ्लॉवर, कांदा तेजीत असून हिरवी मिरची, शेवग्याच्या आवकेत वाढ झाली. ढोबळीत गुरुवारी (ता. ३१) तुलनेत दहा किलोमागे शंभर रुपयांची दरवाढ झाली असल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. ढोबळी मिरचीस दहा किलोला २०० ते ३०० रुपये भाव मिळाला. तसेच ओल्या भुईमूग शेंगेची ५२ क्विंटल आवक झाली असून दहा किलोस २५० ते ३०० असा दर मिळाला आहे. कारल्याची तीन क्विंटल आवक झाली असून दहा किलो कारल्यास २५० ते ३५० असा दर मिळाला आहे. फ्लॉवरची १३ क्विंटल आवक झाली असून दहा किलो फ्लॉवरला १५० ते २०० असा दर मिळाला आहे. भुईमूग शेंग, कारली, फ्लॉवरला दहा किलोमागे ५० रुपयांची दरवाढ झाली आहे. कांद्याची १०० क्विंटल आवक झाली असून दहा किलो कांद्यास ९० ते ११० असा दर मिळाला आहे. टोमॅटोची ५० क्विंटल आवक झाली असून दहा किलो टोमॅटोस १०० ते १३० असा दर मिळाला. कांदा व टोमॅटोच्या दरात सुधारणा होऊ लागली आहे. कांद्यास दहा किलो मागे २० रुपये तर टोमॅटोस ३० रुपयांनी दरवाढ झाली आहे. वाटाण्याची दोन क्विंटल आवक झाली असून दहा किलो वाटाण्यास ६०० ते ७०० असा दर मिळाला. पावट्याची चार क्विंटल आवक झाली असून दहा किलो पावट्यास ५०० ते ६०० असा दर मिळाला आहे. भेंडीची १४ क्विंटल आवक होऊन दहा किलो भेंडीस २५० ते ३०० दर मिळाला. गवारीची १६ क्विंटल आवक होऊन दहा किलोस २०० ते ३०० असा दर मिळाला. हिरवी मिरची, शेवग्याच्या आवकेत वाढ झाली. हिरवी मिरचीची २३ क्विंटल आवक होऊन दहा किलोस २०० ते ३०० दर मिळाला. शेवग्याची १२ क्विंटल आवक होऊन दहा किलोस ३०० ते ३५० असा दर मिळाला आहे. पालेभाज्यात मेथीची १२०० जुड्याची आवक होऊन शेकड्यास १००० ते १६०० तर कोथिंबिरीची २२०० जुड्याची आवक होऊन शेकड्यास ७०० ते ८०० दर मिळाला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com