agriculture news in Marathi, Capsicum, gawar and ladies finger rates are stable in Solapur, Maharashtra | Agrowon

सोलापुरात ढोबळी मिरची, गवार, भेंडीचे दर टिकून
सुदर्शन सुतार
मंगळवार, 16 जानेवारी 2018

सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गत सप्ताहात गवार, भेंडी, ढोबळी मिरचीची आवक कमी राहिली, पण मागणी चांगली असल्याने दर टिकून राहिल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.

बाजार समितीच्या आवारात गत सप्ताहात ढोबळी मिरचीची आवक रोज ५०० ते ९०० किलोपर्यंत राहिली. गवार आणि भेंडीची प्रत्येकी १० ते १५ क्विंटलपर्यंत आवक राहिली. फळभाज्यांची ही सगळी आवक स्थानिक भागातूनच झाली; पण मागणी चांगली असल्याने दर टिकून राहिले. गेल्या महिना-दीड महिन्यापासून त्यांच्या आवक आणि दराची ही स्थिती आहे.

सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गत सप्ताहात गवार, भेंडी, ढोबळी मिरचीची आवक कमी राहिली, पण मागणी चांगली असल्याने दर टिकून राहिल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.

बाजार समितीच्या आवारात गत सप्ताहात ढोबळी मिरचीची आवक रोज ५०० ते ९०० किलोपर्यंत राहिली. गवार आणि भेंडीची प्रत्येकी १० ते १५ क्विंटलपर्यंत आवक राहिली. फळभाज्यांची ही सगळी आवक स्थानिक भागातूनच झाली; पण मागणी चांगली असल्याने दर टिकून राहिले. गेल्या महिना-दीड महिन्यापासून त्यांच्या आवक आणि दराची ही स्थिती आहे.

ढोबळी मिरचीला प्रति दहा किलोसाठी २०० ते ३०० रुपये, गवारीला २०० ते ३५० रुपये आणि भेंडीला २०० ते ३२५ रुपये असा दर आहे. त्याशिवाय वांगी, बटाटा, हिरव्या मिरचीला चांगली मागणी राहिली. पण त्यांची आवकही तुलनेने कमी राहिली. वांग्याची २० क्विंटलपर्यंत, हिरव्या मिरचीची १०० क्विंटल आणि बटाट्याची २०० क्विंटल आवक झाली. मागणी असूनही दरातील किचिंत चढ-उतार वगळता त्यांचे दरही स्थिर राहिले.  

वांग्याला प्रति दहा किलोसाठी १०० ते २०० रुपये, बटाट्याला १५० ते २०० रुपये आणि हिरव्या मिरचीला १०० ते २५० रुपये असा दर मिळाला. भाजीपाल्याच्या दरात मात्र पुन्हा चढ-उतार राहिला. त्यांची आवक ही सगळी स्थानिक भागातूनच झाली. कोथिंबिरीला शंभर पेंढ्यासाठी १०० ते २५० रुपये, मेथीला १५० ते ३०० रुपये आणि शेपूला २०० रुपयांपर्यंत दर मिळाला. 

कांद्याला मागणी टिकून
कांद्याला असलेली मागणी या सप्ताहातही पुन्हा टिकून राहिली. आवक वाढूनही दर मात्र तेजीत राहिले. कांद्याची आवक जिल्ह्यातूनच सर्वाधिक झाली. रोज बाजारात २०० ते ४०० गाड्यांपर्यंत आवक होती. कांद्याला प्रतिक्विंटल २०० ते ३८०० व सरासरी २२०० रुपये असा दर मिळाला. येत्या दिवसात कांद्याची हीच स्थिती राहिली. तर कांद्याच्या दरात तेजी राहील, असे सांगण्यात आले.

इतर ताज्या घडामोडी
उष्णतेचे कारण देऊन पपईच्या दरात अडवणूकनंदुरबार : जिल्ह्यातील पपई उत्पादकांना अपेक्षित...
नांदेड जिल्ह्यात साडेअकराशे हेक्टरवर...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात गुरुवार (ता. १४) पर्यंत...
नगर जिल्हाधिकाऱ्यांच्या तपासणी मोहिमेची...नगर : जनावरांच्या छावण्या सुरू केल्या. मात्र,...
वऱ्हाडात हळद काढणीला सुरवातअकोला : वऱ्हाडात दुष्काळी परिस्थिती, तसेच पाणी...
परभणीतील पशुवैद्यक विद्यार्थ्यांचे भीक...परभणी ः पशुसंवर्धन विभागांतर्गंत पशुधन सहायकांना...
नाशिक जिल्ह्यात बिबट्यांचा धुमाकूळनाशिक : नाशिक शहर व जिल्ह्यात बिबट्याच्या...
सोलापूर कृषी विज्ञान केंद्राला...सोलापूर : भारतीय कृषी व संशोधन परिषदेअंतर्गत...
नगर जिल्ह्यात सव्वा कोटी टन उसाचे गाळपनगर ः जिल्ह्यातील २३ सहकारी व खासगी साखर...
सोलापूर जिल्हा दूध संघाचे पैसे...सोलापूर : दूध अनामत रक्कम, पशुखाद्य व गायी...
शेतकऱ्यांचे नाही, तर श्रीमंतांचे...प्रयागराज, उत्तर प्रदेश : "गेल्या काही...
नगरला चिंच प्रतिक्विंटल ८३०० ते ११९००...नगर ः नगर बाजार समितीत गेल्या आठवडाभरात भुसार...
शिरवळला पशुवैद्यकीय विद्यार्थ्यांचे...सातारा : सहायक पशुधन विकास अधिकाऱ्यांच्या...
स्वाभिमानीसोबत दिलजमाईसाठी बुलडाण्यात...बुलडाणा ः लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीने...
जळगावात गव्हाची आवक रखडत; दर स्थिरजळगाव ः जिल्ह्यात गव्हासाठी प्रसिद्ध असलेल्या...
नाशिकमध्ये हिरव्या मिरचीची आवक टिकून;...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
I transfer my JOSH to you...पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी...
जीवलग मित्र गेला...मनोहर गेला. हे जरी सत्य असले तरी ते मान्य होणे...
जबरदस्त, प्रभावी इच्छाशक्तीचे केंद्र :...लहानपणापासूनच कुठलीही गोष्ट एकदा ठरवली की, तो ती...
तळपत्या सूर्याचा अस्त !राजकारणी माणसाला यश आणि अपयशाचा सामना रोजच करावा...
विदर्भात कापूस पोचला प्रतिक्विंटल ५९१५...नागपूर ः शेतकऱ्यांकडील कापूस संपल्यापनंतर आता...