कोल्हापुरात ढोबळी मिरची, वाटाणा तेजीत
राजकुमार चौगुले
मंगळवार, 10 ऑक्टोबर 2017

अनेक ठिकाणी पाणी साचून राहिल्याने विशेष करून पालेभाज्यांची काढणीही खोळंबली आहे. तसेच शेतात जाता येत नसल्याने जितका आवश्‍यक तितकाच भाजीपाला शेतकऱ्यांकडून काढण्यात येत आहे.

कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजारसमितीत या सप्ताहात ढोबळी मिरची, हिरवी मिरची, ओला वटाण्याचे दर सातत्याने तेजीत राहिले. गेल्या पंधरवड्यापासून जिल्ह्याच्या पश्‍चिम भागासह बेळगाव जिल्ह्यातही पावसाने दमदार हजेरी लावल्याने भाजीपाल्याच्या आवकेत घट झाली.

हिरव्या मिरचीस दहा किलोस ८० ते २२० रुपये, ढोबळी मिरचीस २०० ते ३३०, गवारीस दहा किलोस २०० ते ४८० रुपये दर मिळाला. ढोबळी मिरचीस दहा किलोस ३०० पोती, तर गवारीची दररोज तीस ते चाळीस पोती आवक होती. पावसामुळे भाजीपाला पट्याचे पिका काढणीचे नियोजन कोलमडले आहे. 

अनेक ठिकाणी पाणी साचून राहिल्याने विशेष करून पालेभाज्यांची काढणीही खोळंबली आहे. तसेच शेतात जाता येत नसल्याने जितका आवश्‍यक तितकाच भाजीपाला शेतकऱ्यांकडून काढण्यात येत आहे. यामुळे शेतात भाजीपाला असूनही भाजीपाल्याच्या आवकेत घट असल्याचे बाजारसमितीच्या सूत्रांनी सांगितले.

पाणी साचून राहिल्याने मुळेही कुजू लागली आहेत. यामुळे भाजीपाल्याची वाढ आवश्‍यक त्या प्रमाणात होत नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. याचा एकत्रित परिणाम भाजीपाल्याच्या आवकेवर झाला आहे.  भेंडी, वरणा, दोडक्‍याची दररोज शंभर ते दीडशे पाट्या आवक होत आहे या भाज्यांना दहा किलोस २०० ते ४०० रुपय दर मिळत आहे. 

पालेभाज्यांमध्ये कोथिंबिरीच्या आवकेवरही मोठा परिणाम झाला. कोथिंबिरीची दररोज सात ते आठ हजार पेंढ्या आवक होत आहे. नियमित आवकही साधारणत: पंधरा हजार पेंढ्याच्या आसपास असते. यामध्ये तीस ते चाळीस टक्क्‍यांनी घट झाली आहे. साहजिकच कोथिंबिरीच्या दरात चांगलीच वाढ झाली आहे. काेथिंबिरीस शेकडा १००० ते ३००० रुपये इतका दर मिळाला. तुलनेने मेथीची आवक थोडीशी चांगली होती. 

मेथीची दररोज दहा ते बारा हजार पेंढ्या इतकी आवक झाली. मेथीस शेकडा ५०० ते १४०० रुपये इतका दर होता. पालक, पोकळा, शेपूच्या आवकेतही लक्षणीय घट झाल्याचे चित्र बाजारसमितीत या सप्ताहात होते. दररोज केवळ पाचशे ते एक हजार पेंढ्‌या इतक्‍याच प्रमाणात या भाज्या बाजारसमितीत दाखल झाल्या. यामुळे या भाज्यांचे दरही चढेच राहिले या भाज्यांना शेकडा १००० ते २००० रुपये इतका दर मिळाला. जोपर्यंत पाऊस थांबत नाही तो पर्यंत भाजीपाल्याची आवक रोडावलेलीच राहील अशी शक्‍यता बाजारसमितीच्या सूत्रांनी व्यक्त केली.

इतर ताज्या घडामोडी
सांगलीत ज्वारीच्या कणसांना दाणेच आले... सांगली : कृषी विभागाने शेतकऱ्यांना वाटप...
केळीवरील करपा निर्मूलनासाठी अनुदान... जळगाव : केळी पिकावर सातत्याने करप्याचा...
परतीच्या पावसाने रब्बी पेरणीचा खोळंबा परभणी : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांमध्ये...
शिरूर तालुक्यातील पिकांचे पावसामुळे... रांजणगाव सांडस, जि. पुणे : शिरूर तालुक्यातील...
जळगाव जिल्ह्यात हरभऱ्याचे क्षेत्र... जळगाव :  जिल्ह्यात मागील चार ते पाच...
संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाचे सोधी...वाशीम : संयुक्त राष्ट्रसंघाच्या वतीने राबविण्यात...
पुण्यात भाजीपाल्याची आवक घटली, दर स्थिरपुणे : पावसामुळे मार्केट यार्ड येथील...
सिंचन प्रकल्पांसाठी ७१८० कोटींचे... मुंबई ः महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्याग्रस्त...
आमचे पैसे दंडासह परत करा ः...अकोला ः कृषी व संलग्न विषयांमध्ये अाचार्य पदवी...
पुणे जिल्ह्यातील सोळा धरणे तुडुंबपुणे ः गेल्या पाच ते सहा दिवसांपासून परतीच्या...
वैद्यकीय महाविद्यालयांतील तज्ज्ञांचे... यवतमाळ : कपाशीवर कीटकनाशकांची फवारणी करताना...
कापूस उत्पादनात घटीसोबत दरातही दिवाळेऔरंगाबाद : सोयाबीनची सोंगणी व कापसाची पहिली वेचनी...
कर्जमाफीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात ः...पुणे : कर्जमाफीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली...
नाशिक विभागात कांदा चाळींसाठीचा निधी... नाशिक : कांदा साठवणुकीची सोय नसल्याने...
जळगाव जिल्ह्यात सोयाबीन, ज्वारीची कापणी... जळगाव : जिल्ह्यात मागील आठवड्यात झालेल्या...
गावातील कारभाऱ्यांकडून हायटेक प्रचार सातारा ः जिल्ह्यातील २६० ग्रामपंचायतींच्या...
‘स्वाभिमानी’ने केले हंगामा अांदोलन बुलडाणा ः संग्रामपूर तालुक्यात या हंगामात तूर...
सांगली जिल्ह्यातून परदेश दौऱ्यांसाठी ४७...सांगली ः तीन वर्षांच्या खंडानंतर शेतकऱ्यांची...
औरंगाबाद, जालना , बीड जिल्ह्यांत रब्बी...औरंगाबाद  : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना व...
अमरावती विभागातील महसूल कर्मचाऱ्यांचा... अकोला : महसूल कर्मचाऱ्यांनी पुकारलेले काम बंद...