करडा केव्हीकेने सोयाबीनसाठी 'लेबरलेस फार्मिंग मॉडेल'

करडा : कृषी विज्ञान केंद्राच्या पुढाकाराने लेबरलेस फार्मिंग मॉडेलमध्ये यंत्राद्वारे मळणी करताना.
करडा : कृषी विज्ञान केंद्राच्या पुढाकाराने लेबरलेस फार्मिंग मॉडेलमध्ये यंत्राद्वारे मळणी करताना.

अकोला : सध्या शेती करताना मजुरांची तीव्र टंचाई भासत असून अनेक जण यामुळे शेती परवडत नसल्याचे बोलतात. यावर मात करण्याच्या उद्देशाने करडा कृषी विज्ञान केंद्राने या खरीप हंगामात नावीन्यपूर्ण प्रयोग करीत कमीत कमी मजुरांमध्ये शेती करणे शक्य असल्याचे निदर्शनास आणून दिले. सोयाबीन पिकामध्ये हा प्रयोग राबविण्यात अाला.  

वाशीम जिल्ह्यात सोयाबीन काढणीच्या वेळी मजूर मिळत नाहीत. मजुरांअभावी सोयाबीनचे नुकसान होते. हे लक्षात घेत यावर्षी करडा कृषी विज्ञान केंद्राचे प्रक्षेत्र व्यवस्थापक प्रमोद देशमुख यांनी केव्हीकेच्या प्रक्षेत्रावर या मॉडेलची सुरवात केली. तसेच हे मॉडल गोहगाव हाडे येथील शेतकऱ्यांच्या ५० एकर शेतामध्ये राबवण्यात अाले.

मेकॅनिकल कंबाइन हावेस्टरद्वारे पिकाची काढणी केल्यामुळे पारंंपरिक पद्धतीपेक्षा साधारणतः एकरी दोन हजारांचा फायदा झाला. पीक काढणीकरिता मजुरांची आवश्यकता भासली नाही. तसेच परतीच्या पावसामुळे होणारे नुकसान टाळता अाले. एका तासामध्ये एक एकर पिकाची काढणी झाल्याने वेळेची मोठी बचत झाली. शिवाय पारंंपरिक मळणी यंत्राद्वारे अनेकदा मजुरांचे अपघात होतात. हा धोका या मेकॅनिकल कंबाइन हार्वेस्टमध्ये नाही. तसेच मेकॅनिकल कंबाइन हार्वेस्टरमध्ये रबर कोटींंग असल्यामुळे सोयाबीन बियाण्यास कुठलाही मार बसत नसल्याचे दिसले. पीक काढणीनंतर सोयाबीन थेट ट्रॉली अथवा पोत्यामध्ये भरता येते हेही दिसून अाले. सोयाबीनचे कुटारही गोळा झाले.

लेबरलेस फार्मिंग मॉडेलकरिता केलेले नियोजन सोयाबीनच्या एमएयूएस -१६२ व एमएयूएस – १५८ या नवीन वाणाची निवड  ट्रॅक्टरच्या रुंद सरी वरंंबा यंत्राद्वारे पेरणी छोट्या ट्रॅक्टरद्वारे डवरणी ट्रॅक्टरवरील फवारणी यंत्राद्वारे कीडनाशकाची फवारणी मेकॅनिकल कंबाइन हार्वेस्टरद्वारे पिकाची काढणी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com