गाभण काळात खाद्यासह गोठा व्यवस्थापनाकडे द्या लक्ष

गाभण जनावरांसाठी शक्‍यतो मुक्तसंचार गोठापद्धतीचा अवलंब करावा.
गाभण जनावरांसाठी शक्‍यतो मुक्तसंचार गोठापद्धतीचा अवलंब करावा.

जनावरांचा गाभण काळ हा अतिशय संवेदनशील काळ असतो. या काळात जनावरे अाजाराला बळी पडतात. त्यांना शारीरिक पोषणासाठी जास्त पोषणतत्त्वांची आवश्‍यकता असते. गाभण काळात जनावरांचे योग्य व्यवस्थापन ठेवल्यास आजार कमी होतात व दूध उत्पादनसुद्धा वाढते. गाभण जनावरांच्या व्यवस्थापनात विण्याच्या आधी आणि विल्यानंतर महत्त्वाचे बदल करावे लागतात. या काळात गाभण जनावरांना जास्त ऊर्जा आवश्‍यक असते. ती ऊर्जा चांगल्या प्रतीचा चारा दिल्यास मिळू शकते. गोठ्याचे व्यवस्थापन

  • गोठ्यामध्ये गाभण जनावरांना पुरेशी जागा द्यावी, जमीन नेहमी स्वच्छ व कोरडी असावी शक्‍यतो मुक्तसंचार गोठापद्धतीचा अवलंब करावा.
  • गोठ्यात घाण किंवा दलदल असल्यास कासदाह, ताप येणे, गर्भाशयदाह इ. आजार होण्याचे प्रमाण वाढते.
  • गाभण जनावरांना वेगळे ठेवण्यासाठी सोय करावी, जमीन मऊ असावी.
  • एकाच जागी गाभण जनावरांना जास्त वेळ बांधून ठेवू नये.
  • विल्यानंतर घ्यावयाची काळजी गाय, म्हैस विल्यानंतर सुरुवातीचे २१ दिवस भूक कमी असते. तर दूध उत्पादन वाढत असते, यामुळे एकीकडे शरीरात कमी पोषणतत्त्वे जातात आणि दुसऱ्या बाजूने दूध उत्पादन वाढत असल्यामुळे पोषणतत्त्वांचा जास्त प्रमाणात निचरा दुधाद्वारे शरीराबाहेर केला जातो, यामुळे एकतर जनावर अशक्त होते आणि पुढील दूध उत्पादनही घटते, नंतर जनावर वेळेवर माजावर येत नाही, माजावर आलेच तर गर्भधारणा होत नाही. हे सर्व टाळण्यासाठी या काळात कमी चाऱ्यातून जास्त पोषणमूल्य पुरवठा होईल असा चारा आणि खुराक जनावरांना द्यावा. यामध्ये लसूणघास, बरसीम, डीएचएन-६ इ. असा चारा आणि उत्तम प्रतीच्या पशुखाद्याचा वापर करावा. याबरोबरच जास्तीची ऊर्जा आणि प्रथिनांची गरज भरून काढण्यासाठी आहारामध्ये बायपास फॅट आणि बायपास प्रथिनांचा गरजेनुसार तज्ज्ञांच्या सल्ल्याने वापर करावा. पहिल्यांदा विलेल्या कालवडीमध्ये प्रथिनांची गरज एकापेक्षा जास्त वेत झालेल्या गायीपेक्षा वाढलेली असते. खाद्य व्यवस्थापन

  • गाभण काळामध्ये जर आहाराची काळजी नाही घेतली तर बरेचसे आजार उद्‌भवतात जसे ताप येणे, दुग्धज्वर, कितनबाधा इ. असे अाजार होऊ नये म्हणून जनावरांना उत्तम संतुलित आहार देणे गरजेचे असते.
  • जनावरांना गाभण काळात पचनास हलका चारा द्यावा
  • विण्यापूर्वी किमान दीड ते दोन किलो संतुलित पशुखाद्य दररोज द्यावे.
  • जनावरांना शारीरिक प्रक्रियेसाठी जास्तीच्या ऊर्जेची गरज असते. ही ऊर्जा चांगल्या प्रतीचा चारा दिल्यास मिळते. शरीरस्वास्थ्य चांगले राहाते.
  • जनावरांच्या आहारात गरजेनुसार हिरवा चारा, वाळलेला चारा व इतर आवश्‍यक घटक वापरावे जसे की विकर, प्रोबायोटिक्‍स, क्षारमिश्रण, प्रतिजैविक इ.
  • विकारांच्या वापरामुळे कोटीपोटामध्ये खाद्य जास्त प्रमाणात पचन होऊन जास्त ऊर्जा मिळते.
  • प्रोबायोटिक्‍सचा वापर केल्यास कोटीपोटामध्ये उपयुक्त सूक्ष्मजिवांची संख्या वाढून चयापचय क्रिया जलद होते व शरीराला जास्त ऊर्जा मिळते.
  • क्षार मिश्रण जनावरांच्या खाद्यामध्ये वापरल्यास आवश्‍यक असणारे क्षार शरीराला मिळून आजार कमी होतात.
  • वरील खाद्य मिश्रणाचा वापर केल्यामुळे गर्भाशयातील वासराची वाढ चांगली होते.
  • स्वच्छ अाणि स्वच्छ पाणी जनावरांना पिण्यासाठी नियमितपणे उपलब्ध करून द्यावे.
  • कॅल्शिअम, स्फुरदाचे शरीरात पोषण चांगल्या प्रकारे होण्यासाठी गाय/ म्हैस विण्याअगोदर एक ते दोन आठवडे जीवनसत्त्व अ, ड-३ आणि ई युक्त इंजेक्‍शन द्यावे.
  • गाभण काळातील व्यवस्थापनाचे महत्त्व

  • कासेचे आरोग्य चांगले राहते व दूध उत्पादन मुबलक मिळते.
  • दूध तयार करणाऱ्या पेशींना चालना मिळते, संख्या वाढते.
  • रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.
  • कोटीपोटातील उपयुक्त जिवाणूंना चालना मिळते.
  • विल्यानंतरचे आजाराचे प्रमाण कमी होते.
  • जनावरांची प्रकृतीही चांगली राहते.
  • संपर्क ः डॉ. पवनकुमार देवकते, ९९७०२८५५८५ (पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com