agriculture news in Marathi, career rats of banana increased in jalgaon district, Maharashtra | Agrowon

जळगाव जिल्ह्यात केळी वाहतूक दरात वाढ
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 2 नोव्हेंबर 2017

केळीची वाहतूक ही शेतकरी, व्यापारी व मजूर यांच्यातील समन्वयाने व्हावी. सरबोजाची पद्धत वॅगनद्वारे केळी वाहतूक सुरू होती तेव्हा लागू होती; पण आता ट्रकमधून पंजाब, दिल्लीपर्यंत केळी जाते. त्यामुळे सरबोजा ही पद्धत नाही. 
- आर. टी. पाटील, अध्यक्ष, रावेर फळ बागायतदार युनियन

जळगाव ः जिल्ह्यात चोपडा, जळगाव, जामनेर भागात शेतातून बांधानजीक असलेल्या ट्रकपर्यंत डोक्‍यावरून केळी वाहतुकीसंबंधी प्रतिजोडी (दोन घड) सरसकट आठ रुपये वाहतूक दर लागू झाले आहेत. यंदा प्रतिजोडी दोन रुपये दरवाढ झाली असून, मागील पाच वर्षांत जोडीमागे तीन रुपये वाढल्याने केळी उत्पादकांचा उत्पादन खर्च वाढतोय; पण उत्पादन व उत्पन्न मात्र तेवढेच किंबहुना पूर्वीपेक्षा कमीच होत असल्याचे चित्र आहे. 

शेतातून बांधावरील ट्रकपर्यंत केळी घड नेण्यासाठी सरबोजाही शेतकऱ्यांना देय असतो; परंतु अनेक केळी खरेदीदार संस्था किंवा व्यापारी हा सरबोजाही शेतकऱ्यांना देत नसल्याचे चित्र आहे. केळी उत्पादकांची पिळवणूक सुरूच असून, हा प्रश्‍न यंदा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. २०१३-१४ मध्ये केळीची बांधापर्यंत वाहतुकीची मजुरी किंवा दर प्रतिजोडी पाच रुपये एवढी होती; परंतु आता सरसकट आठ रुपये प्रतिजोडी, असे दर आकारले जात आहेत. 

३०० पेक्षा कमी घड असले, तर आठ रुपये प्रतिजोडी, असे दर आहेत. ३०० घड असले, तर सहा रुपये प्रतिजोडी, असे दर आहेत. यातच एखाद्या शेतकऱ्याच्या बांधापर्यंत किंवा बांधावरील ट्रकपर्यंत घड नेताना चढउताराचा रस्ता असला तर मजूर वाहतुकीस नकार देतात आणि अनेकदा जादा दराची मागणी करतात. 

केळी वाहतुकीनंतर मजुरी केळी खरेदीदार मजुरांना रोखीने देतात. नंतर खरेदीदार केळी उत्पादकाला देय असलेल्या पैशांमधून केळी वाहतुकीचे मजुरांना दिलेले पैसे वजा करून केळी उत्पादकाला चुकारा देतात. 

इतर बातम्या
महारेशीम नोंदणीला अकोला, वाशीममध्ये...अकोला :  रेशीम शेती आणि उद्योगास प्रोत्साहन...
मुख्यमंत्री फडणवीस साधणार ‘लोक संवाद’ पुणे ः शासनाच्या विविध योजना गरजूंपर्यंत...
मराठवाड्यात महारेशीम अभियानाला सुरवात औरंगाबाद ः रेशीम उद्योगातून शेतकऱ्यांचे जीवनमान...
जळगावमधील सर्वच तालुके दुष्काळीजळगाव : जिल्ह्यातील सर्व गावांची अंतिम पैसेवारी...
‘पिंपळगाव खांड’तून पिण्यासाठी आवर्तनलिंगदेव, जि. नगर : मुळा नदीवरील पिंपळगाव खांड (ता...
पुणे विभागात रब्बीची अवघी ३४ टक्के पेरणीपुणे ः पावसाळ्यात कमी झालेल्या पावसामुळे गेल्या...
परभणीची खरिपाची अंतिम पैसेवारी ४४.६९...परभणी ः परभणी जिल्ह्याची खरीप हंगामाची अंतिम...
धुळे, नंदुरबार जिल्ह्यांत ९० विहिरींचे...धुळे : पाणीटंचाईची तीव्रता धुळे, नंदुरबार...
कोल्हापूर जिल्ह्यात वाढती थंडी रब्बी...कोल्हापूर : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून...
कॅनॉल दुरुस्तीची कामे आता जलयुक्‍त...वर्धा : जलसंधारण आणि जलसंपदा विभागाच्या...
सोलापूर कृषी समितीच्या बैठकीत...सोलापूर : गुजरातमध्ये राबविण्यात येणाऱ्या कृषी...
कांदा, भाजीपाला वाटला मोफतचांदवड, जि. नाशिक : कांद्यासह भाजीपाला व इतर...
पालखेडच्या आवर्तनास जिल्हाधिकाऱ्यांचा...येवला, जि. नाशिक : पालखेड डाव्या कालव्यावरील...
एफआरपी थकविणाऱ्या कारखान्यांचे होणार...सोलापूर : यंदाच्या गाळप हंगामात संबंधित...
औरंगाबादमध्ये २७ डिसेंबरपासून ‘ॲग्रोवन’...पुणे  : राज्यातील शेतकऱ्यांना तंत्रज्ञान व...
पावसातही शेतकऱ्यांचा आम नदीपात्रात...वेलतूर, नागपूर : टेकेपार येथील शेतकऱ्यांनी...
स्वाभिमानीचे डफडे बजाओ आंदोलनबुलडाणा ः दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत, सोयाबीन...
विदर्भातील तीन जिल्हा बँकांचे विलीनीकरण...मुंबई: राज्यातल्या सामान्य शेतकऱ्यांच्या...
किमान तापमानात वाढ पुणे  : ‘पेथाई’ चक्रीवादळाच्या प्रभावामुळे...
मराठवाड्यातील दुष्काळाची पैसेवारीने...औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील ८५३३...