औरंगाबादेत गाजर प्रतिक्विंटल १२०० ते १७०० रुपये

गाजर
गाजर

औरंगाबाद: येथील उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता.१३) गाजराची २५५ क्‍विंटल आवक झाली. मकर संक्रांतीच्या पर्वावर या गाजराला १२०० ते १७०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.  औरंगाबाद बाजार समितीमध्ये शनिवारी ४१३ क्‍विंटल आवक झालेल्या हिरव्या मिरचीला १००० ते ३००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. १६७ क्‍विटंल आवक झालेल्या टोमॅटोचे दर ३०० ते ४०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. ५९ क्‍विंटल आवक झालेल्या वांग्याला ५०० ते २००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. मक्याची आवक २३ क्‍विंटल झाली. मक्याला ८०० ते १२०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. ३४ क्‍विंटल आवक झालेल्या काकडीचा दर ५०० ते १२०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. ३० क्‍विंटल आवक झालेल्या लिंबाला ८०० ते १२०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. कारल्याची आवक ६ क्‍विंटल; तर दर २५०० ते ३००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. ५ क्‍विंटल आवक झालेल्या दुधीभोपळ्याला ८०० ते १००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. कोबीची आवक १७८ क्‍विंटल झाली. कोबीला ५०० ते ७०० रूरुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. ६५ क्‍विंटल आवक झालेल्या फ्लाॅवरचे दर १००० ते १६०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. २२ क्‍विंटल आवक झालेल्या ढोबळी मिरचीला १८०० ते २००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. वाटाण्याची आवक ११७ क्‍विंटल; तर दर १८०० ते २२०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. २६ हजार जुड्यांची आवक झालेल्या मेथीचे दर ४०० ते ५०० रुपये प्रतिशेकडा राहिले. १५ हजार जुड्यांची आवक झालेल्या पालकला २५० ते ३०० रुपये प्रतिशेकड्याचा दर मिळाला; तर ३३ हजार जुड्यांची आवक झालेल्या कोथिंबिरीचे दर २०० ते २५० रुपये प्रतिशेकडा राहिल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com