सोलापुरात गाजर, काकडीचे दर वधारले, भाजीपालाही टिकून

सोलापुरात गाजर, काकडीचे दर वधारले, भाजीपालाही टिकून
सोलापुरात गाजर, काकडीचे दर वधारले, भाजीपालाही टिकून

सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात गाजर, काकडीला मागणी वाढली. त्यांची आवक तुलनेने कमीच राहिली. पण मागणी असल्याने दर वाढल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. भाजीपाल्याच्या दरातील तेजीही पुन्हा टिकून राहिली.  बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात काकडीची १० ते २० क्विंटल, गाजराची ८ ते १० क्विंटल अशी आवक झाली. गाजर आणि काकडीची आवक सर्वाधिक स्थानिक भागातूनच झाली. बाहेरील आवक खूपच कमी राहिली. उन्हाच्या वाढत्या तडाख्यामुळे गाजर आणि काकडीला मागणी वाढत आहे. येत्या काही दिवसांत ही मागणी आणखी वाढण्याची आणि दरही वाढण्याची शक्‍यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली. काकडीला प्रतिदहा किलोसाठी ४० रुपये, सरासरी १२० रुपये आणि सर्वाधिक २५० रुपये असा दर मिळाला. गाजराला किमान ४० रुपये, सरासरी १०० रुपये आणि सर्वाधिक २०० रुपये असा दर मिळाला. गेल्या दोन आठवड्यांपासून गाजर आणि काकडीला उठाव कमीच होता आणि आवकही तुलनेने कमीच होती. या सप्ताहात मात्र त्याच्या आवकेत काहीशी घट असली, तरी दर मात्र चांगलेच वधारलेले राहिले. त्याशिवाय ढोबळी मिरची, हिरवी मिरची, भेंडीचे दरही पुन्हा वधारलेलेच राहिले. त्यांची आवक ही तुलनेने कमीच होती. प्रत्येकी ३० ते १०० क्विंटलपर्यंत आवक होती. ढोबळी मिरचीला प्रतिदहा किलोसाठी किमान ८० रुपये, सरासरी १४० रुपये आणि सर्वाधिक २२० रुपये, हिरव्या मिरचीला किमान ८० रुपये, सरासरी १५० रुपये आणि सर्वाधिक २७५ रुपये असा दर मिळाला. भाजीपाल्याचे दरही पुन्हा टिकून राहिले. गेल्या दोन आठवड्यापासून भाजीपाल्यालाही मागणी वाढलेली दिसून आली. भाज्यांची आवक १० ते १५ हजार पेंढ्यांपर्यंतच असते, पण या सप्ताहात त्यात पुन्हा थोडीशी घट झाली. भाज्याही स्थानिक भागातूनच आल्या. कोथिंबिरीला शंभर पेंढ्यांसाठी ४०० ते १३०० रुपये, शेपूला ६०० ते ८०० रुपये आणि मेथीला ६०० ते १००० रुपये असा दर मिळाला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com