औरंगाबादेत गाजर प्रतिक्विंटल १००० ते १८०० रुपये

गाजर
गाजर

औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता. १६) गाजराची ४५ क्‍विंटल आवक झाली. या गाजराला प्रतिक्‍विंटल १००० ते १८०० रुपयांचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.  औरंगाबाद बाजार समितीमध्ये हिरव्या मिरचीची ४५ क्‍विंटल आवक झाली, तिला १८०० ते २००० रुपये प्रतिक्‍विंटल दर राहिले. ६०५ क्‍विंटल आवक झालेल्या कांद्याला ६०० ते ३१०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. १५० क्‍विंटल आवक झालेल्या टोमॅटोचे दर ७५० ते १३०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. वांग्याची आवक ५३ क्‍विंटल, तर दर ५०० ते ७०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. भेंडीची आवक ३३ क्‍विंटल, तर दर १२०० ते २००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. काकडीची आवक १४ क्‍विंटल, तर दर ५०० ते १००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. १८ क्‍विंटल आवक झालेल्या लिंबाला ३०० ते ६०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. ७८ क्‍विंटल आवक झालेल्या पत्ता कोबीला ८०० ते १२०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. फ्लॉवरची आवक ३४ क्‍विंटल, तर दर ५०० ते ७०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. ३४ क्‍विंटल आवक झालेल्या ढोबळ्या मिरचीला १६०० ते २००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. वाटाण्याची आवक १५५ क्‍विंटल, तर दर १५०० ते २५०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. २९ हजार जुड्यांची आवक झालेल्या मेथीला ८० ते ११० रुपये प्रतिशेकड्याचा दर मिळाला. २१ हजार जुड्यांची आवक झालेल्या पालकचे दर ६० ते ८० रुपये प्रतिशेकडा राहिला. तर ३९ हजार जुड्यांची आवक झालेल्या कोथिंबिरीला ८० ते १०५ रुपये प्रतिशेकड्याचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com