लहू काळे यांच्या व्यंगचित्रांचे कोल्हापुरात प्रदर्शन

लहू काळे यांच्या व्यंगचित्रांचे कोल्हापुरात प्रदर्शन
लहू काळे यांच्या व्यंगचित्रांचे कोल्हापुरात प्रदर्शन

कोल्हापूर : कोल्हापूर आर्ट फाउंडेशनच्या वतीने ‘दैनिक अ‍ॅग्रोवन’चे व्यंगचित्रकार लहू काळे यांच्या शेतकऱ्यांच्या जीवनशैलीवर भाष्य करणाऱ्या व्यंगचित्रांचे प्रदर्शन १७ जूनपासून येथील शाहू स्मारक भवन येथे होणार आहे. २३ जूनअखेर हे प्रदर्शन सुरू राहील, अशी माहिती फाउंडेेशनचे संस्थापक अध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी दिली. श्री. काळे यांची विविध माध्यमांतून चार हजारांहून अधिक व्यंगचित्रे प्रसिद्ध झाली आहेत.

नुकतीच याची नोंद इंडिया बुक रेकॉर्डमध्ये झाली आहे. ‘अ‍ॅग्रोवन’च्या माध्यमातून त्यांंनी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर विविध शैलीत भाष्य करणारी अनेक व्यंगचित्रे प्रसिद्ध होत आहेत. या माध्यमातून त्यांनी शेतकऱ्याच्या विविध प्रश्नांवर चित्रे काढून शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले अाहेत. प्रदर्शनात बळिराजाच्या जीवनशैलीवर आधारित शंभर ते दीडशे चित्रे प्रदर्शनात मांडण्यात येतील. रविवारी (ता. १७) सकाळी दहा वाजता शाहू स्मारक भवनातील कला दालन येथे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदर्शनाचे उद्घाटन होईल. बळिराजाची अवस्था, त्याच्याबाबतीत शासकीय धोरणांची अवस्था, निसर्गाच्या अडचणी, आदी बाबत मार्मिक भाष्य करणाऱ्या या व्यंगचित्रांचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन श्री. पाटील यांनी केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com