शेतकऱ्याच्या आत्महत्येप्रकरणी बँक व्यवस्थापकावर गुन्हा

शेतकऱ्याच्या आत्महत्येप्रकरणी बँक व्यवस्थापकावर गुन्हा
शेतकऱ्याच्या आत्महत्येप्रकरणी बँक व्यवस्थापकावर गुन्हा

वर्धा : पात्र असतानाही कर्जमाफीचा लाभ न दिल्याने शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचा ठपका ठेवत प्रशासनाच्या तक्रारीवरून बॅंक व्यवस्थापकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. चौकशीअंती शासनाच्या आदेशावरून दाखल करण्यात आलेल्या या गुन्ह्यामुळे खळबळ उडाली आहे. हिंगणघाट तालुक्‍यातील वडनेर येथील शेतकरी गणपत भोर यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली होती. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत कर्जमाफीसाठी पात्र असतानाही लाभ न मिळाल्याने त्यांनी आत्महत्या केल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला होता.  या प्रकरणी मंत्रालयातून चौकशीचे ओदश आल्यानंतर यंत्रणा कामाला लागली. २६ फेब्रुवारी २०१९ रोजी त्यांनी आत्महत्या केली होती. त्यांच्यावर बॅंक ऑफ इंडियाचे दीड लाख रुपयांचे, ग्रामशक्‍ती या फायनान्स कंपनीचे तीन लाख रुपये तसेच इतरांचे दोन ते तीन लाख रुपयांचे कर्ज होते. त्यांच्या भावांना कर्जमाफीचा लाभ मिळाला. परंतू त्यांना मात्र डावलण्यात आले. कर्जमाफीच्या लाभासाठी त्यांनी जिल्ह्याची लीड बॅंक असलेल्या बॅंक ऑफ इंडियाचे उंबरठे झिजविले. परंतू कर्जमाफी मिळण्याची चिन्हे नसल्याने त्यांनी आत्महत्या केली.  उपविभागीय अधिकाऱ्यांनी याप्रकरणी चौकशी करीत तसा अहवाल दिला. त्यांच्याच तक्रारीवरून बॅंक व्यवस्थापक गौतम जांभुळे यांच्याविरोधात गुन्हा दखल करण्यात आला. राज्यातील अशा प्रकारच्या पहिल्याच घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com