agriculture news in marathi, Cash payment will be given to farmers in Niphad APMC | Agrowon

निफाडला भुसार मालाचे होणार रोख पेमेंट
टीम अॅग्रोवन
रविवार, 5 नोव्हेंबर 2017

नाशिक : निफाड येथील बाजार समितीच्या मुख्य बाजार आवारावर भुसार व तेलबिया शेतीमाल विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना येत्या सोमवारपासून (ता.६) वजन मापानंतर रोख पेमेंट मिळणार आहे. गुरुवारी व्यापारी वर्गाच्या बैठकीत घेण्यात हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती बाजार समितीचे सभापती जयदत्त होळकर यांनी दिली. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

नाशिक : निफाड येथील बाजार समितीच्या मुख्य बाजार आवारावर भुसार व तेलबिया शेतीमाल विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना येत्या सोमवारपासून (ता.६) वजन मापानंतर रोख पेमेंट मिळणार आहे. गुरुवारी व्यापारी वर्गाच्या बैठकीत घेण्यात हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती बाजार समितीचे सभापती जयदत्त होळकर यांनी दिली. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

गेल्या ८ नोव्हेंबर रोजी केंद्र शासनाने नोटाबंदी केल्याने उद्भवलेल्या परिस्थितीवर उपाययोजना करण्याच्या दृष्टीने बँकांमध्ये चलन पुरवठा सुरळीत होईपर्यंत शासनाने शेतमाल विक्रीची रक्कम धनादेश, RTGS/NEFT द्वारे अदा करण्याबाबत बाजार समित्यांना सूचना दिल्या होत्या. त्यानुसार गेल्या वर्षभरापासून बाजार समितीच्या बाजार आवाराम शेतमाल विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना वजनमापानंतर धनादेश, RTGS / NEFT सेवेद्वारे चुकवतीची रक्कम अदा करण्यात येत आहे.

२४ तासांत मिळणार पैसे
शेतकऱ्यांसह व्यावसायिकांच्या मागणीचा विचार करून बाजार समितीच्या बाजार आवारांवर शेतमाल विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांना पूर्वीप्रमाणे रोख स्वरूपात मोबदला देण्यासाठी गुरुवारी कांदा बाजार आवारावर कांदा व धान्य विभागातील व्यापाऱ्यांची बैठक घेण्यात आली. बैठकीत धान्य विभागातील व्यापाऱ्यानी सोमवारपासून भुसार व तेलबिया शेतीमाल विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना वजनमापानंतर २४ तासांच्या आत मालविक्रीची संपूर्ण रक्कम रोख स्वरूपात अदा करण्याचा निर्णय घेतला. बैठकीत मर्चंटस असोशिएशनचे अध्यक्ष व बाजार समितीचे सदस्य नंदकुमार डागा, सचिनकुमार ब्रह्मेचा, संदीप दरेकर, रमेश पालवे, सचिव बी. वाय. होळकर, कांदा व्यापारी नितीनकुमार जैन, ओमप्रकाश राका, अजित भंडारी उपस्थित होते.

इतर ताज्या घडामोडी
जात पडताळणीसाठी रक्त नात्यातील दाखला...नागपूर : रक्त नात्यातील व्यक्तीची जात पडताळणी...
कोंबडीखताचा वापर कसा करावा?मशागतीच्या वेळी पेरणीपूर्वी एक ते दीड महिना अगोदर...
ऊस पाचटाचे गांडूळ खत कसे तयार करावे?गांडूळ खताच्या निर्मितीसाठी उत्तम निचरा होणारी...
कृषी सल्ला : कापूस, भुईमूग, बाजरी, मका... कापूस बीटी कापूस बोंड अळ्यांना प्रतिकारक्षम...
मका, सोयाबीन, हळदीच्या भावात घसरणएनसीडीईएक्समध्ये या सप्ताहात साखर व सोयाबीन वगळता...
अभिनव पद्धतीने सणसरला आंदोलनभवानीनगर, जि. पुणे   ः सणसर येथील कुरवली...
मराठा आरक्षणासाठी सरकार कटिबद्ध :...नागपूर : मराठा समाजाला शिक्षण आणि सरकारी नोकरीत...
पुणे जिल्ह्यातील काही भागांत पावसाची...पुणे  ः जिल्ह्यातील अनेक भागांत गेल्या दहा...
खारपाणपट्ट्यात भूसुधारणा कार्यक्रम...अकोला  : जिल्ह्यात खारपाणपट्ट्याचे प्रमाण...
...तर जिनिंग मिल मालकांविरोधात कारवाई ः...वर्धा   ः गुलाबी बोंड अळी नियंत्रणासाठी...
अकोले तालुक्‍यात पावसाचा जोर कायमनगर  : अकोले तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात...
स्वाभिमानीचा सर्जिकल स्ट्राईक,...कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून...
सातारा जिल्ह्यात दूध दरप्रश्नी तिसऱ्या...सातारा   ः स्वाभिमानी शेतकरी संघटनेने...
संतश्रेष्ठ तुकोबाराय पालखीचे सोलापूर...सोलापूर : पिटू भक्तिचा डांगोरा । कळिकाळासी दरारा...
कोयना, कण्हेर धरणांतून विसर्गसातारा : जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. बुधवारी...
कर्नाटकातून येणारे दूध आंदोलकांनी अडवलेसोलापूर :  दुधाच्या वाढीव दरासाठी स्वाभिमानी...
किणी टोल नाका येथे पोलिसांची जबरदस्ती;...कोल्हापूर- : स्वाभिमानीने शेतकरी संघटनेने पुणे...
कनिष्ठ सहायकाची एक वेतनवाढ बंदनाशिक  : जिल्हा परिषदेची सभा असो की मुख्य...
भेंडीची वेळेवर लागवड आवश्यकभाजीपाला पिकांमध्ये भेंडी पिकाची लागवड वाढत आहे....
दूध दरप्रश्‍नी राज्य सरकार दोषी : राज...पुणे  ः दूधदराचा प्रश्न गंभीर होत आहे....