agriculture news in marathi, cashew growers cheated by trader, ratnagiri, maharashtra | Agrowon

देवरुखमधील काजू उत्पादकांना लाखोंचा गंडा
टीम अॅग्रोवन
रविवार, 12 मे 2019

रत्नागिरी   ः जादा दराचे आमिष दाखवून एका व्यापाऱ्याने देवरूखमधील निवे बुद्रुक पंचक्रोशीतील आठ ते दहा काजू उत्पादक शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. या प्रकरणी देवरूख पोलिस निरीक्षकांना निवेदन सादर करण्यात आले आहे.

रत्नागिरी   ः जादा दराचे आमिष दाखवून एका व्यापाऱ्याने देवरूखमधील निवे बुद्रुक पंचक्रोशीतील आठ ते दहा काजू उत्पादक शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. या प्रकरणी देवरूख पोलिस निरीक्षकांना निवेदन सादर करण्यात आले आहे.

यंदा उत्पादन कमी असतानाही काजू बी ला म्हणावा तसा दर मिळालेला नाही. अगदी हंगामाच्या सुरवातीपासून आतापर्यंत काजू बीला साधारण ११५ ते १२० रुपये एवढाच दर असून आता तो ११० रुपयांवर स्थिरावला आहे. बागायतदार हवालदिल झाल्याचा फायदा घेत निवे बुद्रूक पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना एका व्यापाऱ्याने गंडा घातला. हा व्यापारी पंचक्रोशीतील एका गावातील मूळ रहिवासी असून सध्या मात्र परजिल्ह्यात राहतो. या व्यापाऱ्याने फेब्रुवारी महिन्यापासून काजू-बी घेण्याच्या व्यवसायाला सुरवात केली. निवे बुद्रुक व तुळसणी येथे दुकान थाटले होते.

बाजारात दर १२० असतानाही त्याने १५० रुपयाने काजू घेण्यास सुरवात केली. यामुळे मोठे बागायतदार त्याच्याकडे वळले. या ठिकाणी दर चांगला मिळत असल्याचे ऐकून अनेक शेतकरी या व्यापाऱ्याकडे आले. सुरवातीला त्याने सर्व व्यवहार रोखीने केला. त्यामुळे बागायतदार आणि शेतकऱ्यांचा त्याच्यावर विश्‍वास बसला. शेवटच्या टप्प्यात आलेले मोठे उत्पादन पाहून त्याने लाखो रुपयांचा काजू उधारीने खरेदी केला. सुमारे २० ते २५ लाखांची खरेदी करून या व्यापाऱ्याने तेथून पळ काढला आहे. त्याचा मोबाईल बंद असून त्याचा परजिल्ह्यातील पत्ता ठाऊक नसल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत.

या संदर्भात सुनील बेर्डे, सदानंद आगरे, श्रीकांत यादव, शैलेश यादव, पर्शराम घडशी, अनंत कडू, प्रवीण पेडणेकर, विष्णू पेडणेकर या शेतकऱ्यांनी फसवणूक झाल्याबाबत पोलिसांना निवेदन दिले आहे.

इतर अॅग्रो विशेष
पूरक धोरणानेच वाढेल निर्यातकें द्रातील मोदी सरकारच्या सुरवातीच्या काळात...
निवडणूक आयोगाला घरचा आहेर! सतरावी लोकसभा निवडण्यासाठीची मतदान प्रक्रिया कालच...
विरोधी पक्षनेता आज ठरणार; पृथ्वीराज...नागपूर ः राधाकृष्ण विखे पाटील यांच्या...
कृषी निविष्ठांमध्ये हवी मधमाशीपुणे : पीक उत्पादनात अत्यंत मोठा हातभार असलेल्या...
विषबाधा नियंत्रणाची जबाबदारी आता...यवतमाळ : जिल्ह्यात फवारणीदरम्यान झालेल्या विषबाधा...
उन्हाचा चटका अन् उकाड्यातही वाढपुणे : विदर्भातील चंद्रपूर, ब्रह्मपुरीसह मध्य...
SakalSaamExitPolls : महाराष्ट्रात...- सकाळ आणि सामच्या सर्वेक्षणानुसार महाराष्ट्रात...
रानडुकरांचे पर्यावरणस्नेही व्यवस्थापनवनविभाग किंवा जंगलाच्या आसपास असलेल्या...
मराठवाड्यात भीषण जलसंकटऔरंगाबाद : मराठवाड्यातील ८२४ लघू मध्यम...
पशुपालन, प्रक्रिया उद्योगात नेदरलॅंडची...शास्त्रीय पद्धतीने पशुपालन, दुग्धोत्पादन आणि...
आदिवासी पाड्यावर रुजली कृषी उद्योजकताकोणे (ता. त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक) येथील आदिवासी...
मंडळ स्तरावरील अचूक हवामान अंदाजासाठी...परभणी ः महावेध प्रकल्पांतर्गत मंडळ स्तरावरील...
विदर्भासह, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात...पुणे : विदर्भात उष्णतेची लाट आली आहे. यातच दोन...
राज्यातील सर्वांत मोठा सौरऊर्जा प्रकल्प...नाशिक: कृषिपंपांना दिवसा वीज मिळावी, या...
मॉन्सून मंगळवारपर्यंत उत्तर...पुणे: नैॡत्य मोसमी वारे (मॉन्सून) शनिवारी (ता. १८...
राज्याचे स्वतंत्र निर्यात धोरण ठरणारनागपूर ः शेतीमालाची निर्यात दुपटीने वाढविण्याचे...
राज्यात कापूस बियाणे विक्री २५ मेपासूनजळगाव ः राज्यातील पूर्वहंगामी कापूस लागवड...
दुष्काळात परवडीने ओलांडली सीमा (video...औरंगाबाद : वीस वर्षांचा होतो तवापासून शेतीत राबतो...
Breaking : मॉन्सून अंदमानात दाखलपुणे : नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) आज (ता. १८)...
बिगर नोंदणीकृत जैविक उत्पादनात खत...पुणे : शेतकऱ्यांना पुरविल्या जाणाऱ्या बिगर...