agriculture news in marathi, Cashew nuts season | Agrowon

मोहराने बहरल्या काजूच्या बागा
राजकुमार चौगुले
सोमवार, 22 जानेवारी 2018

सिंधुदुर्ग : डिसेंबरच्या शेवटच्या सप्ताहातील थंडीच्या तडाख्यातून बचावलेला काजू मोहर आता चांगलाच बहरात आला आहे. सध्या कोकणात काजूसाठी वातावरण पोषक बनले आहे. वातावरणात अनपेक्षित बदल न झाल्यास यंदा काजूच्या उत्पादनात चांगलीच वाढ होण्याची शक्‍यता आहे. सध्या तरी बहुतांशी काजू बागा मोहराने बहरल्या आहेत.

सिंधुदुर्ग : डिसेंबरच्या शेवटच्या सप्ताहातील थंडीच्या तडाख्यातून बचावलेला काजू मोहर आता चांगलाच बहरात आला आहे. सध्या कोकणात काजूसाठी वातावरण पोषक बनले आहे. वातावरणात अनपेक्षित बदल न झाल्यास यंदा काजूच्या उत्पादनात चांगलीच वाढ होण्याची शक्‍यता आहे. सध्या तरी बहुतांशी काजू बागा मोहराने बहरल्या आहेत.

काजूचा सरता हंगाम काजू उत्पादकांना संमिश्र गेला. गेल्या वर्षी पहिल्या टप्प्यात काजूची खरेदी किलोस १६० ते १७० रुपयांच्या आसपास सुरू झाली. जसा उन्हाळा वाढत गेला, तसे दर खाली आले. हा दर ११५ रुपयांपर्यंत येऊन ठेपला. नोटाबंदीचा तर परिणाम झालाच, तसेच मागणी कमी झाल्याने दराच्या दुष्टचक्रात काजू उत्पादक अडकला. दोन वर्षापूर्वी काजू उत्पादनात घट झाल्याने अनेक व्यापाऱ्यांनी गेल्या वर्षीसाठी आफ्रिकेतून काजूची मागणी नोंदविली होती. यामुळे कोकणातील काजूला मागणी कमी राहिली. साहजिकच याचा परिणाम काजू दरावर झाला.

कोकणाचे हक्काचे नगदी पीक
राज्यात काजूचे सुमारे दोन लाख हेक्‍टर क्षेत्रावर उत्पादन घेतले जाते. यातून दीड लाख टन काजू मिळतात. कोकणामध्ये या पैकी १.७७ लाख हेक्‍टर क्षेत्रावर काजूचे पीक घेतले जाते. कोकण किनारपट्टीवरील पोषक उष्ण व दमट हवामान यामुळे काजूच्या बागांचे प्रमाण मोठे आहे. कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातच जवळ जवळ ८० हजार हेक्‍टर क्षेत्रावर काजू पीक घेतले जाते.

यंदाचा पाऊस पालवीला लाभदायक
यंदा कोकणात योग्य प्रमाणात पाऊस झाला. यामुळे काजूला चांगली पालवी फुटली. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात तपमान बरेच खाली गेले. यामुळे पालवी फुटण्यास अडथळे निर्माण झाले. परंतु मोठे नुकसान होण्याच्या आतच पुन्हा अनुकूल हवामान निर्माण झाल्याने काजूच्या बागा पुन्हा मोहोरल्या. गेल्या पंधरवड्यात थंडीचे प्रमाण कमी झाल्याने काजू आता तयार होत आहेत. मध्यंतरीच्या थंडीमुळे व ढगाळ हवामानामुळे ढेकण्या रोगाचा प्रादुर्भाव काही ठिकाणी झाला असला तरी सध्याच्या चांगल्या वातावरणामुळे त्याचे नुकसान होणार नाही, असा अंदाज आहे.

इतर बातम्या
पारंपरिक उत्साहात शिवजयंती साजरीपुणे : संपूर्ण महाराष्ट्रासह देश-विदेशात अनेक...
माजी आमदार जयंत ससाणे यांचे निधन नगर  :  कॉंगेसचे जिल्हाध्यक्ष माजी...
मराठवाड्यातील लघू प्रकल्प आले २७ टक्‍क्...औरंगाबाद : मराठवाड्यातील ८६४ लघू, मध्यम, मोठ्या...
पुणे जिल्ह्यात रब्बीत अवघे २५ टक्के...पुणे : शेतकऱ्यांना रब्बी हंगामात पुणे जिल्हा...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत १५...नांदेड : केंद्र शासनाच्या किंमत समर्थन...
सरपंचांनी कारकीर्दचे स्मरण होईल असे काम...कोल्हापूर : सरपंचांनी नैतिकता जपत निरपेक्ष व...
जळगाव जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पात...जळगाव  : जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प यंदा सहा...
बियाणे कंपन्यांत पाकिटावरील...नागपूर : बोंड अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी या...
टॉवरग्रस्त शेतकऱ्यांच्या समस्या सोडविणारयवतमाळ : पॉवरग्रीड कंपनीच्या वतीने महागाव, पुसद...
‘महामेष’ योजना ३४ जिल्ह्यांत राबविणार...औरंगाबाद : राजे यशवंतराव होळकर महामेष योजना...
शेतीतील यांत्रिकीकरणासाठी हवे शासनाचे...अकोला ः अाजच्या बदलत्या काळात शेती पद्धतीत...
मध्य प्रदेशात गारपीटग्रस्तांना हेक्टरी...नवी दिल्ली ः मध्य प्रदेश राज्यात नुकत्याच...
गारपीटग्रस्तांना भरीव मदतीचा प्रस्ताव...नागपूर ः गारपीटग्रस्तांना सरकारकडून जाहीर करण्यात...
शेतकरी कंपन्यांच्या धान्य खरेदीबाबत...पुणे : हमीभावाने धान्य खरेदीत शेतकरी उत्पादक...
महसूल मंडळातील सरासरी उत्पादकतेनुसार...परभणी : केंद्र शासनाच्या किंमत समर्थन...
गारपीटग्रस्त क्षेत्र तीन लाख हेक्टरमुंबई : राज्यात गेल्या आठवड्यात झालेल्या...
राजधानी दिल्लीत शेती क्षेत्रावर आज...नवी दिल्ली : देशाला नवे कृषी धोरण देण्यासाठी...
‘कापूस ते कापड’पासून आता ‘पिकणे ते...नाशिक : राज्यातील कापसावर प्रक्रिया होऊन...
उन्हाचा चटका जाणवू लागलापुणे : उत्तरेकडील थंड वाऱ्यांचा प्रवाह कमी होऊ...
'मॅग्नेटिक महाराष्ट्र'चे आज उद्‌घाटनमुंबई : राज्याच्या औद्योगिक वाढीसाठी उपयुक्त ठरणा...