agriculture news in marathi, cashew seed mortgage loan scheme, ratnagiri, maharashtra | Agrowon

रत्नागिरीत काजू बी तारणावर ७३ लाखांचे कर्जवाटप
सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 जुलै 2018

बाजार समितीतून यंदाच्या वर्षी ३०० टन आंबा गुजरातमध्ये कॅनिंगसाठी पाठवण्यात आला. शेतकऱ्यांना आंबा विक्रीसंदर्भात परिपूर्ण माहिती असावी, यासाठी पुढील महिन्यात प्रशिक्षणाचे आयोजन केले आहे.
- मधुकर दळवी, सभापती, बाजार समिती.

रत्नागिरी  ः कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत राबवण्यात आलेल्या काजू बी तारण योजनेचा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला. शेतकऱ्यांनी १०० टन काजू जमा केला असून, ७३ लाखांचे कर्जवाटप करण्यात आल्याची माहिती सभापती मधुकर दळवी यांनी दिली.

हंगामी काळात शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांकडून फसवणूक केली जाते. उत्पादित मालाला अल्प दर दिला जातो. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते. याला आळा बसावा म्हणून शासनाने शेतमाल तारण योजना सुरू केली. या योजनेंतर्गत कृषी उत्पन्न बाजार समितीने काजू बी तारण योजना राबवली होती.  किलोमागे शेतकऱ्यांना १०० रुपये कर्जवाटप केले. ७३ लाखांचे कर्जवाटप केले. काही शेतकऱ्यांना कागदपत्रांच्या पूर्ततेअभावी कर्जवाटप केलेले नाही. कागदपत्रांची पूर्तता झाल्यावर त्यांना कर्जवाटप केले जाईल.

किलोला १४० रुपये दर होता, त्यावेळी शेतकऱ्यांनी काजू बाजार समितीत जमा केला. आता हाच दर १७५ रुपयांपर्यंत पोहोचला आहे. आता ३ टन काजू बी विकण्यात आली असून, व्याज जमा करून घेऊन उर्वरित पैसे शेतकऱ्यांना देण्यात आले.

बाजार समितीतर्फे आंबा लिलाव शेडची उभारणी केली आहे. याद्वारे शेतकऱ्यांना आपला आंबा मुंबई, पुणे, सातारा, सांगली या ठिकाणी न पाठवता येथेच विकता येईल. यातून त्यांचा आर्थिक फायदा होईल. या शेडचे उद्‌घाटन निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे रखडले होते.
 

इतर ताज्या घडामोडी
जळगावात दादरला ३१०० रुपयांपर्यंत दरजळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दादरची (...
भारतीयांच्या पचनसंस्थेतील...भारतीय लोकांच्या पचनसंस्थेमध्ये कार्यरत...
अमरावती विभागाला पाणीटंचाईच्या झळाबुलडाणा : कमी पावसामुळे अमरावती विभागातील...
तूर विक्रीच्या नोंदणीकडे शेतकऱ्यांची...अकोला  : या हंगामात शेतकऱ्यांनी पिकविलेल्या...
शेतकरी, जवान अडचणीत : भुजबळनाशिक : सध्याच्या सरकारच्या काळात देशातील...
दुष्काळात खचू नका, शासन पाठीशी :...सोलापूर : दुष्काळी परिस्थितीमुळे पाणी,...
शेतकऱ्यांच्‍या थकवलेल्या पैशांची...पुणे ः शेतीमालाचा लिलाव झाल्यानंतर २४ तासांत पैसे...
नगर जिल्हा परिषदेचा यंदा ४४ कोटी...नगर : जिल्हा परिषदेत सोमवारी झालेल्या सर्वसाधारण...
नांदेड परिमंडळात सौर कृषिपंप योजनेसाठी...नांदेड ः मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेअंतर्गत...
शेतीमाल तारण योजनेत ४०६ शेतकऱ्यांनी...औरंगाबाद : मराठवाड्यातील जालना, परभणी व हिंगोली...
ऊस उत्पादक शेतकरी देणार शहिदांच्या...कोल्हापूर : पुलवामा जिल्ह्यातील दहशतवादी हल्ल्यात...
तूर खरेदीतील अनागोंदीविरुद्ध आंदोलनअकोला  ः जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यात...
'पुलवामा'चा सूत्रधार काश्‍मीरमध्येच?नवी दिल्ली : पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याचा...
उन्हाळी पिकातील खतांचे व्यवस्थापनउन्हाळी हंगामात प्रामुख्याने भुईमूग, सूर्यफूल,...
केम प्रकल्पाला लागली भ्रष्टाचाराची वाळवीअमरावती : अंमलबजावणीपेक्षा गैरव्यवहार व...
‘पेंच’ लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना १३...नागपूर : मध्य प्रदेशातील चौराई प्रकल्पामुळे पेंच...
‘एसटी’साठी जागा आठ हजार अन्‌ अर्ज ४१...सोलापूर : राज्य परिवहन महामंडळात चालक व...
दररोजचा दोनशे टन द्राक्षपुरवठा ठप्पपिंपळगाव बसवंत, जि. नाशिक : जम्मू-काश्‍...
'देशात आयात होणाऱ्या सोयाबीनवर बंदी...पुणे : देशांतर्गत दर वाढत असल्याने...
बांबू उत्पादन, गुंतवणूक संधीसाठी...मुंबई : देशातील बांबू लागवडीला चालना देण्याबरोबरच...