agriculture news in marathi, Cashew trees in flowering stage | Agrowon

थंडीने काजू मोहोरला...!
सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 जानेवारी 2018

देवरूख, रत्नागिरी : जानेवारी महिना मध्यावर आला असून मध्यंतरी पडलेल्या कडाक्‍याच्या थंडीने परिसरातील काजू कलमे मोहोराने लगडली आहेत. काजू मोहरले तरी आंब्याला मोहोराची प्रतीक्षा असून खाडी भागात मात्र आंबा आणि काजूचा मोहोर समाधानकारक आहे.

देवरूख, रत्नागिरी : जानेवारी महिना मध्यावर आला असून मध्यंतरी पडलेल्या कडाक्‍याच्या थंडीने परिसरातील काजू कलमे मोहोराने लगडली आहेत. काजू मोहरले तरी आंब्याला मोहोराची प्रतीक्षा असून खाडी भागात मात्र आंबा आणि काजूचा मोहोर समाधानकारक आहे.

गेल्यावर्षी अवकाळी पावसाने सर्वांचाच हिरमोड केला. दरवर्षी सप्टेंबर-आॅक्‍टोबरपर्यंत मर्यादित असलेला पाऊस गेल्यावर्षीही लांबला. त्यामुळे थंडीचा मोसम लांबला आणि बदललेल्या वातावरणामुळे मोहोर येण्याच्या प्रक्रियेस उशीर झाला. तालुक्‍यातील खाडीभाग वगळता अन्य भागांत जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात मोहोराला सुरुवात झाली. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात कडाक्‍याची थंडी होती. मात्र मध्येच आलेल्या ढगाळ वातावरणाने मोहोराचा घात होण्याची शक्‍यता होती. मात्र पुन्हा ढगाळ वातावरण गायब झाले आणि थंडीचा कडाका वाढल्याने तालुक्‍यातील बहुतांश भागांतील काजू कलमे भरगच्च मोहरताना दिसत आहेत. तालुक्‍यातील इतर भागात काजूच्या तुलनेत आंब्याला मोहोर कमी असल्याचे दिसत आहे.

खाडीभागातील खाऱ्या हवामानामुळे या परिसरात आंबा कलमे भरगच्च मोहरली असून मोहोराचे रुपांतर छोट्या कैऱ्यांमध्ये होत आहे. दरवर्षी जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात बाजारात कैऱ्या विक्रीसाठी येतात यावर्षी यासाठी फेब्रुवारी महिना उजाडणार आहे. लांबलेल्या प्रक्रियेमुळे आंबा पिकण्यालाही उशीर होणार असून यावर्षीचा तालुक्‍यातील आंब्याचा हंगाम एप्रिल-मे महिन्यात जाण्याची शक्‍यता आहे. हवामानाने साथ दिली तर आंबा लवकर पिकेल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. दरवर्षी प्रमाणे तालुक्‍यातील शेतकऱ्यांना लहरी वातावरणाचा फटका यावर्षीही बसला असून भातशेतीच्या नुकसानानंतर निदान आलेला आंबा तरी हातात पडू दे अशी प्रार्थना बागायतदार निसर्गाकडे करीत आहेत.

इतर अॅग्रो विशेष
प्राणघातक हृदयरोगाचे प्रमाण होतेय कमीगेल्या दोन वर्षामध्ये हृदयरोगाला प्रतिबंध आणि...
अन्नत्याग आंदोलनास प्रारंभ : अमर हबीब,...नवी दिल्ली : शेतकरी आत्महत्यांप्रती सहवेदना आणि...
मच्छीमारी व्यवसायाने आणली समृद्धीगणित विषयात पदवी असूनही बेरोजगार राहणं नशिबी आलं...
काबुली हरभऱ्याने उंचावले अर्थकारण चोपडा तालुक्‍यातील (जि. जळगाव) तापी व अनेर...
जत तालुक्यात द्राक्ष, डाळिंब बागा...सांगली : जत तालुक्यात पश्‍चिम भाग वगळता...
प्रकल्प व्यवस्थापकावर कारवाईचे आदेशपुणे : एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन...
सहवेदना :आज अन्नत्याग आंदोलनयवतमाळ: शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रति...
उन्हाची काहिली वाढलीपुणे: राज्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाची...
राजकीय उपद्रव्य मूल्य घटल्याने...मुंबई: मर्यादित जनाधार आणि राजकीय उपद्रव मूल्य...
सोलापूर जिल्ह्यातील सर्व गावांची...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील सर्वच ११४५...
विदेश अभ्यास दौऱ्याच्या शेतकरी यादीत...पुणे : विदेश अभ्यास दौऱ्यासाठी निवड केलेल्या...
क्रांती कारखाना हुमणीचे भुंगेरे खरेदी...कुंडल, जि. सांगली : एकात्मिक हुमणी कीड नियंत्रण...
तेजस्विनीच्या साथीने बचतीतून...तेजस्विनी लोकसंचालित साधन केंद्राच्या...
परवानाधारक व्यापाऱ्यांनीच केळीची खरेदी...जळगाव : चोपडा बाजार समिती दरवर्षी १४...
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर...पणजी : देशाचे माजी संरक्षणमंत्री व गोव्याचे...
आडातच नाही तर पोहऱ्यात येणार कोठून? दुष्काळ पडल्याने पाण्यासाठी बोअर घेण्याची अक्षरशा...
कृषी पर्यवेक्षकांना पदोन्नती मिळाली, पण...पुणे : राज्यातील कृषी पर्यवेक्षकांना शासनाने मंडळ...
दुष्काळी मराठवाड्यात मार्चमध्येच ‘केसर'...केज, जि. बीड ः फळांचा राजा आंबा बाजारात...
मिरची पीक अंतिम टप्प्यातनंदुरबार (प्रतिनिधी) ः खानदेशातील मिरचीचे आगार...
सुधारित जोडओळ पद्धतीमुळे कपाशीतून...सोगोडा (जि. बुलढाणा) येथील विजय पातळे या कपाशी...