agriculture news in marathi, caste certificate fraud system continues | Agrowon

जात प्रमाणपत्र पडताळणीतील बनवेगिरी कायम
मनोज कापडे 
सोमवार, 19 मार्च 2018

राज्यभर ऑनलाइन प्रक्रिया अर्धवट, प्रमाणपत्रावर साधा होलोग्रामही नाही. पारदर्शकता, जलद कामाला अजूनही फाटा 

पुणे : बोगस जात प्रमाणपत्रे शोधण्यासाठी नियुक्त केलेल्या "जात प्रमाणपत्र वैधता समित्या" कमकुवत ठेवण्यात आल्या असून वैधताप्रमाणपत्रेदेखील बनावट वाटली जात असल्यामुळे राज्याच्या कृषी क्षेत्रातील हजारो विद्यार्थी अस्वस्थ आहेत. 

"जात पडताळणी प्रमाणपत्राचे वाटप ऑनलाइन केल्यामुळे राज्यातील समाज कल्याण विभागाच्या दफ्तर दिरंगाईत कोणताही बदल झालेला नाही. दलाली, गैरव्यवहारदेखील कमी झालेला नाही. राज्य शासनाने फक्त ऑनलाइन अर्ज भरण्याची सोय केली आहे. मात्र, "टेबलाखालील" कार्यपद्धती कायम ठेवली आहे. देशात पासपोर्ट पटकन मिळतो पण जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी विद्यार्थी किंवा नोकरदाराचा छळ केला जातो, अशी प्रतिक्रिया एका कृषी पदवीधराने दिली. 

जात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी महसूल विभागाच्या एका छळप्रक्रियेतून गेल्यानंतर छळाचा दुसरा टप्पा आदिवासी विकास विभाग किंवा समाजकल्याण विभागाच्या जात प्रमाणपत्र वैधता समित्यांच्या माध्यमातून सुरू होतो. राज्यभर आता प्रत्येक जिल्ह्यात समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. मात्र, पुरेसे मनुष्यबळ, तांत्रिक सुविधा आणि ऑनलाइनची संपूर्ण प्रक्रिया न राबविल्यामुळे जात पडताळणी प्रमाणपत्र वाटपात पारदर्शकता व गतिमानता आलेली नाही. 

राज्यात १९९७ पर्यंत जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी पुण्यात एकच उच्चस्तरीय समिती होती. त्यानंतर १९९५ मध्ये प्रत्येक महसूल विभागात विभागीय जात पडताळणी समिती तयार करण्यात आली. महसूल आयुक्त किंवा आयएएस दर्जाचा अधिकारीच या समितीचा अध्यक्ष असावा, अशी अट शासनाने ठेवली. मात्र, सुधारणेचादेखील काहीही उपयोग दफ्तर दिरंगाई कमी करण्यासाठी झाला नाही. "बोगस जातीच्या दाखल्यांच्या आधारे पुण्याच्या बीजे मेडिकल कॉलेजमध्ये सर्रास प्रवेश मिळत असल्याचे उघड झाल्यामुळे राज्य शासन भानावर आले. त्यातून जात प्रमाणपत्रांची तपासणी करण्यासाठी आदिवासी विकास विभाग व समाजकल्याण विभाग यांनी स्वतंत्र समित्या तयार केल्या. मात्र, गोंधळ मिटला नाही. त्यामुळे आता प्रत्येक जिल्ह्यात आदिवासी विकास विभाग व समाजकल्याण विभागाची समिती आहे. तथापि, ऑनलाइन यंत्रणा मुद्दाम कमकुवत ठेवून अजूनही विद्यार्थ्यांचा छळ केला जातो, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

जात पडताळणी प्रमाणपत्राला आला सोन्याचा भाव 
कोणत्याही निवडणुकीत, सरकारी नोकरीसाठी तसेच शैक्षणिक वाटचालीत नागरिकांना जात पडताळणी प्रमाणपत्र सक्तीचे करण्यात आले आहे. याशिवाय म्हाडाची घरे, सरकारी कोट्यातील पेट्रोलपंप, अनुसूचित जाती व जमातीमधील कायद्याच्या आधारे चालणारे दावे, आदिवासी शेतजमिनी अशा विविध कामांसाठी जात पडताळणी प्रमाणपत्र सक्तीचे झाल्यामुळे या प्रमाणपत्राला आता सोन्याचा भाव आला आहे. 

बनावट पडताळणीपत्रानंतरही शासन सुस्त 
बारावीचा निकाल लागताच राज्यात प्रत्येक जिल्ह्यात ८ ते १५ हजार विद्यार्थ्यांचे अर्ज जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी येतात. याशिवाय पदवी, पदविका, विधी शिक्षण तसेच सीईटीच्या विविध परीक्षांनाही जात पडताळणी प्रमाणपत्र बंधनकारक आहे. प्रमाणपत्र वितरणाची पद्धत वेळखाऊ व संशयास्पद का ठेवली गेली, या प्रमाणपत्राला साधा होलोग्राम का लावला जात नाही, पुण्यात बोगस जात पडताळणी प्रमाणपत्र वाटपाचे गुन्हे दाखल होऊनसुद्धा ऑनलाइन वितरण सुटसुटीत का होत नाही, असे सवाल कृषी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी उपस्थित केले आहेत. 

इतर बातम्या
थंडी वाढण्यास हवामान घटक अनुकूलमहाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब...
दुष्काळी उपाययोजनांसाठी कोरड्या धरणात...बीड : मराठवड्यातील सर्वात तीव्र दुष्काळी...
परभणी जिल्ह्यात ३४ हजार ३९२ हेक्टरवर...परभणी : जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामात मंगळवार...
शेतकऱ्यांच्या विधवांचे २१ला मुंबईत...मुंबई : देशभरात विविध शेतकऱ्यांचे मोर्चे...
खानदेशात कांदा लागवड निम्म्याने...जळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड...
नाशिक जिल्ह्यात ४० हजार क्विंटल...नाशिक : एप्रिल महिन्यापासून शिधापत्रिकाधारकांना...
राज्यातील धरणांमध्ये ५५ टक्के पाणीसाठापुणे   : राज्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढू...
सटाणा, मालेगावसाठी सोडणार चणकापूर...नाशिक : सटाणा व मालेगावला भेडसावणाऱ्या...
पुणे विभागात ४८ हजार हेक्टरवर कांदा...पुणे   ः पुणे विभागात आत्तापर्यंत ४८ हजार...
वीजदरवाढीचा शॉक, अनुदानाची फक्त घोषणाचजळगाव ः वस्त्रोद्योगाला चालना मिळावी, उद्योजकांचा...
महाबळेश्र्वरमध्ये ३५०० एकरांवर...सातारा  ः महाबळेश्वरसह वाई, जावली, कोरेगाव...
महिलांनी नाचणीपासून बनवले सत्तरहून अधिक...कोल्हापूर   : नाचणीची आंबील, नाचणीच्या...
दुष्काळात तीन श्रेणींत कामांचे नियोजन...पुणे : राज्यात आलेल्या दुष्काळात मदतीचा...
बुलडाणा जिल्ह्यात रब्बीची ५६ हजार...बुलडाणा  ः कमी व अनियमित पावसामुळे संपूर्ण...
राज्याच्या दक्षिण भागात पावसाची शक्यतापुणे : राज्यात थंडी वाढण्यास सुरुवात झाली आहे....
सोयाबीन वधारण्याची चिन्हेपुणे: राज्यात सध्या सोयाबीनचे दर गडगडले असले...
ओडिशात भाडोत्री ट्रॅक्टर योजनेस प्रारंभभुवनेश्‍वर ः राज्यातील शेतकऱ्यांना अद्ययावत...
कोल्हापुरात ऊसतोडणीसाठी यंदा पुरेसे मजूरकोल्हापूर  : गेल्या हंगामाच्या तुलनेत...
चारा लागवडीसाठी शासकीय जमिनी देणारमुंबई : राज्यावरील दुष्काळाचे संकट लक्षात...
कापूस खरेदीला आजपासून प्रारंभनागपूर : पणन महासंघाव्दारे कापूस खरेदीला आजपासून...