agriculture news in marathi, cattle become trouble due to drought situation, nagar, maharashtra | Agrowon

नगर जिल्ह्यातील दहा लाख जनावरे पाणीटंचाईच्या कचाट्यात
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 13 नोव्हेंबर 2018

नगर जिल्ह्यात दुष्काळी स्थिती आहे. लोकांसाठी पाणी उपलब्ध होणे गरजेचे अाहेच पण जनावरांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठीदेखील प्रशासनाने उपाययोजना करणे गरजेचे आहे. मात्र, प्रशासन जनावरांना पाणी देण्याबाबत अजून तरी उपाययोजना करताना दिसत नाही.    
- संदेश कार्ले, जिल्हा परिषद सदस्य, नगर.

नगर  ः दुष्काळाच्या पाश्वर्भूमीवर लोकांना पिण्यासाठी पाणी देण्याचे नियोजन प्रशासन करीत आहे. लोकसंख्या गृहीत धरून टॅंकरने पाणी दिले जात आहे. मात्र पशुधनाचे काय, जनावरांसाठी पाणी अाणायचे कोठून असा प्रश्न अाता शेतकऱ्यांना पडू लागला आहे. जिल्ह्यातील सुमारे दहा लाख जनावरे पाणीटंचाईच्या कचाट्यात सापडले अाहेत. प्रशासनानेही जनावरांच्या पाण्याबाबत अजून तरी उपाययोजना केल्याचे दिसत नाहीत.

नगर जिल्ह्यात शेतीसोबत पशुधनाला प्राधान्य दिले जात अाहे. शेतीला दुग्ध व्यवसायाची जोड दिलेली असल्याने प्रत्येक शेतकऱ्यांच्या दारात किमान चार तरी जनावरे आहेत. अनेक तरुणांनी कर्ज काढून गाई, म्हशीचे गोठे उभे केले आहेत. मुळा, गोदावरी, प्रवरा नदीकाठच्या गावांतील लोकांना अजून फारशी पाणीटंचाई जाणवत नसली तरी दुष्काळी पट्ट्यातील पशुपालक शेतकरी मात्र अडचणीत सापडले अाहेत.

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी सध्या पाथर्डी, जामखेड, शेवगाव, कर्जत, पारनेर या भागात टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे. मुळात उघड्यावर कोठेही पाणी नाही, जनावरांना चारा नाही. विहिरी आटत असल्याने टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची गरज निर्माण झाली आहे. माणसांना टॅंकरने पाणी देता, पण जनावरांसाठी पाणी कोठून आणायचे असा प्रश्न पशुपालकांना पडला अाहे. चारा टंचाईबाबत चर्चा केली जाते, पण जनावरांसाठी पाण्याबाबत अजून कोणीही चर्चा केलेली नाही. त्याबाबत प्रशासनानेही नियोजन केले नाही.

२०१२ मधील पशुगणनेनुसार जिल्ह्यात १६ लाख ४८ हजार ५४८ गाई, म्हशी, ११ लाख ५३ हजार ८३६ शेळ्या, मेंढ्या व अन्य पशुधन अाहे. याशिवाय चार हजार घोडे, चौदाशे गाढवे, चौदा हजार वराहांची संख्या आहे. प्रती जनावरांना दररोज सरासरी दहा लिटर पाणी दिले तरी फक्त जनावरांसाठी तीन कोटी लिटर पाणी दररोज लागते. सध्याचा विचार करता सुमारे दहा लाख जनावरे पाणीटंचाईत सापडले आहेत. त्यामुळे आता जनावरांना पाणी उपलब्ध कोठून करायचे असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आाहे. प्रशासनाने जनावरांना लागणारे पाणी गृहीत धरून नियोजन करावे, अशी मागणी केली जात आहे.
 

इतर ताज्या घडामोडी
पूर्णा, पालम, गंगाखेड येथे दूध संकलन...पूर्णा, जि. परभणी ः परभणी जिल्ह्यातील पूर्णा,...
धुळे जिल्ह्यात भरड धान्याची २६४९...धुळे ः जिल्ह्यात २०१८-१९ च्या खरीप पणन हंगामात...
परभणीत खरीप पीक विमा परताव्याचा घोळ...परभणी  : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत...
कोल्हापूर जिल्ह्यात २० टक्के ऊस तोडणी...कोल्हापूर  : जिल्ह्यात साखर कारखान्यांचा...
मराठवाड्यातील प्रकल्पांत २० टक्‍के...औरंगाबाद  : मराठवाड्यातील सर्वच...
कमी पाऊस : ‘जलयुक्त’ची कामे झालेल्या...नगर  ः जलयुक्त शिवार अभियानातून कामे करून...
हमीभाव, कर्जमुक्ती असेल तरच महाआघाडीत...बुलडाणा  : दीडपट हमीभाव आणि शेतकऱ्यांची...
पुणे विभागात ९२ टॅंकरव्दारे पाणीपुरवठापुणे   : विभागातील पाणीटंचाईची तीव्रता...
हजारो केळी रोपांचे रानडुकरांकडून नुकसानअकोला   ः सातपुड्यालगत असलेल्या अकोट...
पाण्याअभावी संत्रा तोडून फेकण्याची वेळअमरावती  ः पाण्याअभावी संत्र्याचा अपेक्षित...
बोदवडला मका खरेदीसाठी मुहूर्त मिळेनाबोदवड, जि. जळगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार...
सिल्लोड तालुक्यात विहिरींसाठी दोन...सिल्लोड, जि. औरंगाबाद : वैयक्तिक लाभाच्या...
नांदेड, परभणी, हिंगोलीत सव्वा लाख...नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...
पुणे बाजारात भाजीपाल्यांचे दर स्थिरपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
कांदा पिकावरील फुलकिडीचे नियंत्रणकांदा पीक हे प्रामुख्याने खरीप, रब्बी हंगामात...
पशुसल्लासध्या महाराष्ट्रात सर्वच ठिकाणी कमी-जास्त...
नांदेड जिल्हा कर्जवाटपात मराठवाड्यात...नांदेड : जिल्ह्यात मुद्रा योजनेअंतर्गत १ लाख ५५...
कृषिपंप वीजजोडणीच्या प्रतीक्षेत पाचशेवर...देऊर, जि. धुळे : धुळे ग्रामीण उपविभागांतर्गत...
खानदेशातील ऊस गाळपात आर्यन शुगरने घेतली...जळगाव : खानदेशात सर्वाधिक तीन साखर कारखाने...
काजू बोंडापासून इथेनॉल, सीएनजी...पुणे  ः भविष्यातील इंधनाची टंचाई आणि आयात...