agriculture news in Marathi, cattle farmers companies will be establish in the state, Maharashtra | Agrowon

पशुपालक कंपन्या राज्यात स्थापन होणार
गणेश कोरे
रविवार, 29 ऑक्टोबर 2017

पुणे : पशुधनाच्या सामूहिक संवर्धनातून मूल्यवर्धन करण्यासाठी शेतकरी कंपन्यांच्या धर्तीवर प्रत्येक गावात पशुपालक कंपन्या स्थापन करण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात १०० गावांमध्ये कंपनी स्थापन्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, या कंपन्यांच्या यशस्वितेनंतर प्रत्येक गावात कंपनी स्थापन करण्यात येणार आहे. शेळी-मेंढी महामंडळाच्या वतीने या कंपन्या स्थापन करण्यात येणार असून, पहिल्या टप्प्यात एक काेटी रुपयांची तरतूद महामंडळाच्या वतीने करण्यात आली आहे. 

पुणे : पशुधनाच्या सामूहिक संवर्धनातून मूल्यवर्धन करण्यासाठी शेतकरी कंपन्यांच्या धर्तीवर प्रत्येक गावात पशुपालक कंपन्या स्थापन करण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात १०० गावांमध्ये कंपनी स्थापन्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, या कंपन्यांच्या यशस्वितेनंतर प्रत्येक गावात कंपनी स्थापन करण्यात येणार आहे. शेळी-मेंढी महामंडळाच्या वतीने या कंपन्या स्थापन करण्यात येणार असून, पहिल्या टप्प्यात एक काेटी रुपयांची तरतूद महामंडळाच्या वतीने करण्यात आली आहे. 

पशुधनामधील गायी, म्हशी, शेळी, मेंढी, कुक्कुट आणि मत्स्य आदी विविध क्षेत्रांत कंपन्या स्थापन करण्यात येणार आहेत. कंपनी स्थापनेतून गावातील विविध पशुधन एकत्र करून सामूहिकरीत्या व्यवसाय विकास, व्यवस्थापन, प्रक्रिया, विपणन आदी विविध क्षेत्रांतून मूल्यवर्धन आणि आर्थिक विकासासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे शेळी-मेंढी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक धनंजय परकाळे यांनी सांगितले. 

कंपनी स्थापनेसाठी राज्य शासनाने पशुसंवर्धन आयुक्त कांतिलाल उमाप यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना केली हाेती. या समितीने चंद्रपूर, रत्नागिरी, जालना, सातारा, वर्धा, नगर आणि अमरावती या सात जिल्ह्यांतील १२६ गावांमध्ये सर्वेक्षण केले. सर्वेक्षणामध्ये गावांतील पशुधनाची संख्या, रस्ते, पाणी, वीज, जवळची बाजारपेठ, वाहतुकीचे पर्याय आदींचा समावेश हाेता. तसेच शेतकरी उत्पादक कंपन्यांचादेखील अभ्यास केला.

यामध्ये कंपनी उभारताना येणाऱ्या अडचणी, कामकाज सुरूच न झालेल्या कंपनीच्या समस्या, बंद पडलेल्यांची कारणे, यशस्वी झालेल्या सध्या कार्यरत असणाऱ्या कंपन्या आदींचा अभ्यास करण्यात आला. या सर्व सर्वेक्षणाचा अहवाल शासनाला सादर करण्यात आला. शासनाने या अहवालाचा अभ्यास करून पशुपालक कंपन्या प्रत्येक गावात स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. 

या कंपन्या शेळी मेंढी महामंडळ स्थापन करणार असून, प्रत्येक कंपनीचा व्यवसाय विकास आराखडा बनविण्यात येणार आहे. या कंपन्यांना वित्तीय संस्थांकडून वित्तपुरवठ्यासाठीदेखील शासन पाठपुरावा करणार आहे. 

लाेकप्रतिनिधींची मुख्यमंत्र्यांना पत्रे 
आमच्या गावात पशुपालक कंपनी स्थापन करावी, अशा मागणीची पत्रे ४० लाेकप्रतिनिधींनी मुख्यमंत्र्यांना पाठविली आहेत. यामध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विद्यमान अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्यासह विविध आमदार, खासदारांचा समावेश आहे. या मागणीमुळे आमदार आणि खासदार आदर्श ग्राम याेजनेतील सहभागी गावांमध्ये पहिल्या टप्प्यात कंपनी स्थापनेचा निर्णय घेतला असल्याचे शेळी-मेंढी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. धनंजय परकाळे यांनी सांगितले. 
 

इतर अॅग्रो विशेष
केरळात साडेतीन लाखावर लोक विस्थापित ;...तिरुअनंतपुरम : केरळ राज्यात अतिवृष्टी...
खरिपात खर्चही निघेल असं वाटत नाहीझळा दुष्काळाच्या ः जिल्हा नगर मागचे पाच-...
डाळिंबावर फुलगळीचा प्रादुर्भावसांगली ः राज्यात मृग हंगामात ८० ते ९० हजार हेक्‍...
अतिपावसाचा खरिपाला फटकापुणे : दीर्घ खंडानंतर बुधवार (ता.१५) ते शुक्रवार...
लष्करी अळीमुळे अन्नसुरक्षेला धोकायुरोपीयन संघ ः आफ्रिका खंडात कहर केल्यानंतर...
पीक बदलातून शेती केली किफायतशीरकोठारी येथील माध्यमिक शाळेमधील शिक्षकाची नोकरी...
अन्नपूर्णा उद्योगातून स्वयंपूर्णतेकडेआवडीचं क्षेत्र जेव्हा आपल्या व्यवसायाचा आधार बनते...
चंद्रपूर : पोडसा पूल पाण्याखाली; पाच...गोंडपिपरी, जि. चंद्रपूर : दोन...
केरळमध्ये पुरामुळे २४७ जणांचा मृत्यूतिरुअनंतपुरम : मागील आठवडाभर चालू असलेल्या...
कधी ढग, तर कधी पावसाची नुसती भुरभुरझळा दुष्काळाच्याः जिल्हा सांगली पहिल्या पावसावर...
मराठवाड्यात दुसऱ्या दिवशीही दमदार पाऊसऔरंगाबाद : मराठवाड्यातील ४२१ महसूल मंडळांपैकी...
ग्लायफोसेटला परवान्यातूनच वगळण्याचा...नागपूर ः चहा वगळता इतर पिकांसाठी ग्लायफोसेट...
कोल्हापूर जिल्ह्यात अतिपावसाने पिके...कोल्हापूर : गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या...
खारपाणपट्ट्यात पावसाच्या खंडाने खरीप...पावसात कुठे १७ दिवस तर कुठे २२ दिवसांचा खंड...
केळी उत्पादक कंगाल; व्यापारी मालामालजळगाव ः जिल्ह्यात केळीचे जे दर जाहीर होतात,...
विदर्भ, मराठवाड्यात पावसाचे धूमशानपुणे : अनेक दिवसांच्या खंडानंतर राज्यात गेले तीन...
`मोन्सॅन्टोला नुकसानभरपाईचे आदेश हे...युरोपियन संघ ः मॉन्सॅन्टो या बलाढ्य बहुराष्ट्रीय...
कामगंध सापळ्यांमध्ये होतेय ‘बनवाबनवी’अकोला ः बोंड अळीमुळे गेल्या हंगामात झालेले नुकसान...
वर्षभर १५ भाजीपाल्यांसह फळबागांची...रसायन अंश विरहीत आरोग्यदायी अन्नाची निर्मिती करून...
लौटकर आऊँगा...! अटलजींना साश्रू नयनांनी...नवी दिल्ली : प्रखर देशभक्त, भारतरत्न, माजी...