agriculture news in marathi, Cauliflower, fenugreek and shepu rose in Solapur | Agrowon

सोलापुरात कोथिंबीर, मेथी, शेपूचे दर वधारले
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 3 जुलै 2018

सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात कोथिंबीर, मेथी, शेपूचे दर पुन्हा वधारले. त्यातही कोथिंबिरीला सर्वाधिक उठाव राहिल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. हिरवी मिरचीनेही दराचा उच्चांक केला, मिरचीला सर्वाधिक ४५०० रुपये प्रतिक्विंटल इतका दर मिळाला.

सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात कोथिंबीर, मेथी, शेपूचे दर पुन्हा वधारले. त्यातही कोथिंबिरीला सर्वाधिक उठाव राहिल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. हिरवी मिरचीनेही दराचा उच्चांक केला, मिरचीला सर्वाधिक ४५०० रुपये प्रतिक्विंटल इतका दर मिळाला.

बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात मेथीची आवक १० हजार पेंढ्या, कोथिंबिरीची १० ते १४ हजार पेंढ्या आणि शेपूची ८ हजार पेंढ्यांपर्यंत सर्वसाधारण आवक होती. भाज्यांची आवक मुख्यतः स्थानिक भागातून झाली. गेल्या दोन आठवड्यांपासून भाज्यांना मागणी वाढली आहे. पण, मागणीच्या तुलनेत ती कमीच राहिली. त्यामुळे या सप्ताहातही भाज्यांच्या दरातील तेजी कायम राहिली.

विशेषतः कोथिंबिरीला सर्वाधिक उठाव मिळाला. कोथिंबिरीला शंभर पेंढ्यांसाठी ८०० ते १४०० रुपये, मेथीला ९०० ते १२०० रुपये आणि शेपूला ७०० ते ९०० रुपये असा दर मिळाला. त्याशिवाय चुका आणि पालकाला प्रत्येकी ४०० रुपयांपर्यंत दर मिळाला. भाज्यांच्या या दरासह हिरवी मिरची, वांगी, ढोबळी मिरची यांचे दरही पुन्हा तेजीत राहिले. त्यातही हिरव्या मिरचीने दराचा उच्चांक केला. अलिकडच्या काही महिन्यांतील हिरव्या मिरचीचे दर आणि त्यांची आवक याचा विचार करता हिरव्या मिरचीला चांगला उठाव मिळतो आहे.

हिरव्या मिरचीला प्रतिक्विंटल ३००० ते ४००० रुपये असा दर मिळाला. त्याशिवाय वांग्याला १८०० ते ३००० रुपये आणि ढोबळी मिरचीला २५०० ते २८०० रुपये असा दर मिळाला. गवार, भेंडीला काहीसा कमी उठाव मिळत असला, तरी त्यांचे दरही टिकून होते. गवारला २५०० ते ४००० रुपये, भेंडीला १९०० ते ३२०० रुपये असा दर राहिला. कांद्याच्या दरात किंचित सुधारणा होत असली, तरी कांद्याची आवक तुलनेने खूपच कमी राहिली. अगदी एक-दोन गाड्यांपर्यंत त्याची आवक राहिली. कांद्याला प्रतिक्विंटल किमान २०० रुपये, सरासरी ७०० रुपये आणि सर्वाधिक १५०० रुपये असा दर मिळाला.

इतर ताज्या घडामोडी
खानदेशात मध्यम पाऊस; नंदुरबारला हुलकावणीजळगाव : खानदेशात शुक्रवारी (ता.२१) मध्यरात्री व...
पुणे जिल्ह्यात ढगाळ हवामानपुणे  : जिल्ह्यात आठवड्याच्या सुरवातीला...
खानापूर घाटमाथ्यावर तीव्र पाणीटंचाई सांगली  : घाटमाथ्यावर पावसाने ओढ दिली आहे....
नगर जिल्ह्यात साडेसहा लाख हेक्‍टरवर...नगर  ः जिल्ह्यात रब्बी हंगामात सहा लाख ५२...
कौशल्यावर आधारित उपक्रम ‘रयत’मध्ये सुरू...सातारा  ः केवळ पुस्तकी नव्हे तर कौशल्यावर...
नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचा अकोला...अकोला  ः नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या...
सांगली जिल्ह्यात पाणीप्रश्‍न पेटण्याची...सांगली  : पावसाने दिलेली उघडीप आणि पावसाळा...
अकोला, बुलडाण्यात सर्वदूर पाऊसअकोला   ः वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा या...
सावधान... अल्झायमर आला उंबरठ्यावर ! कोल्हापूर : मंगळवार पेठेतल्या विठ्ठल मंदिरात रोज...
परभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला...
भातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे...सध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी...
कमी तीव्रतेच्या वणव्यांचाही मातीच्या...कमी तीव्रतेचे वणवे किंवा मर्यादित प्रमाणात...
ढगाळ वातावरणाने खानदेशात सोयाबीन मळणीला...जळगाव : खानदेशातील धुळे, नंदुरबार व जळगाव...
माळेगावकरांचा औद्योगिक वसाहतीच्या...नाशिक : माळेगाव औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक...
परभणीत व्यापाऱ्यांचे असहकार आंदोलन सुरूचपरभणी ः परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत...
सांगली जिल्ह्यात द्राक्ष क्षेत्रात वाढसांगली  ः दर्जेदार द्राक्ष उत्पादनासाठी...
धुळे, जळगाव जिल्ह्यांतील पैसेवारी चुकीचीजळगाव   ः धुळे व जळगाव जिल्ह्यांत हवा तसा...
नैसर्गिक आपत्तीत यवतमाळमधील ६२ हजार...यवतमाळ   ः जिल्ह्यात या वर्षी आलेल्या...
पुणे जिल्‍ह्यात पावसाच्या हलक्या ते...पुणे : पावसाच्या मोठ्या खंडानंतर जिल्ह्याच्या...
नगर जिल्ह्यावर दुष्काळाचे सावटनगर  ः जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी फक्त ६५.५५...