agriculture news in marathi, The cause of death of 'those' farmers is due to poisoning | Agrowon

‘त्या’ शेतकऱ्यांचे मृत्यू विषबाधेमुळेच
विनोद इंगोले
शनिवार, 2 डिसेंबर 2017

नागपूर : यवतमाळ जिल्ह्यात फवारणीदरम्यान झालेले शेतकऱ्यांचे मृत्यू हे विषबाधेमुळेच झाले आहेत, असे ‘एसआयटी’ (विशेष तपासणी पथक)कडून कृषी विभागाच्या प्रधान सचिवांकडे सोपविण्यात आलेल्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. गुरुवारी (ता. ३०) हा अहवाल राज्य सरकारला सादर करण्यात आला. यामुळे मद्य, तंबाखू आणि व्यसनाधीनता ही शेतकऱ्यांच्या मृत्यूला कारणीभूत होती, अशा प्रकारच्या चर्चांना पूर्णविराम मिळण्याची शक्‍यता आहे.

नागपूर : यवतमाळ जिल्ह्यात फवारणीदरम्यान झालेले शेतकऱ्यांचे मृत्यू हे विषबाधेमुळेच झाले आहेत, असे ‘एसआयटी’ (विशेष तपासणी पथक)कडून कृषी विभागाच्या प्रधान सचिवांकडे सोपविण्यात आलेल्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. गुरुवारी (ता. ३०) हा अहवाल राज्य सरकारला सादर करण्यात आला. यामुळे मद्य, तंबाखू आणि व्यसनाधीनता ही शेतकऱ्यांच्या मृत्यूला कारणीभूत होती, अशा प्रकारच्या चर्चांना पूर्णविराम मिळण्याची शक्‍यता आहे.

यवतमाळ जिल्ह्यात कपाशीवर कीटकनाशकांची फवारणी करतेवेळी ५०० पेक्षा अधिक शेतकऱ्यांना विषबाधा झाली होती. यामधील २२ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला, तर ४५० पेक्षा अधिक बाधितांवर उपचार करण्यात आले. त्यानंतर अकोला, अमरावती, नागपूर व राज्याच्या इतर भागांतदेखील अशा प्रकारच्या घटनांमध्ये शेतकऱ्यांचे मृत्यू झाले. या संपूर्ण शेतकरी मृत्यूच्या प्रकरणांची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारकडून अमरावती विभागीय आयुक्‍त पीयूष सिंग यांच्या अध्यक्षतेत एसआयटीची स्थापना करण्यात आली होती. विभागीय कृषी सहसंचालक सुभाष नागरे यांच्यासह वैद्यकीय अधिकाऱ्यांचादेखील या समितीत समावेश होता. या समितीने आपला ३० नोव्हेंबरला प्रधान कृषी सचिव बिजयकुमार यांच्याकडे सादर केला. यामध्ये फवारणीदरम्यान विषबाधा होऊनच या शेतकरी, शेतमजुरांचा मृत्यू झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.

त्यामुळे शेतकरी, शेतमजुरांच्या मृत्यूमागे व्यसनाधीनता असल्याच्या चर्चा आणि तर्क-वितर्कांना पूर्णविराम मिळण्याची शक्‍यता आहे. या अहवालात काही अधिकाऱ्यांच्या चौकशीची किंवा त्यांच्यावर कारवाईची शिफारस करण्यात आली काय, या संदर्भाने बोलण्यास मात्र समितीमधील सदस्यांनी नकार दिला. परंतु हिवाळी अधिवेशन काळात काही कृषी अधिकाऱ्यांवर हलगर्जीपणाचा ठपका ठेवत निलंबनाची कारवाई होण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.

तर्कवितर्कांना पुर्णविराम?
‘एसआयटी’च्या अहवालात मृत्यूमागील शास्त्रीय कारणांचा शोध घेण्याकरिता वैद्यकीय अधिकाऱ्यांची मदत घेण्यात आली. अमरावती, अकोला, यवतमाळ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांच्या मृत्यूमागील कारणांचा यात अभ्यास करण्यात आला. अनेक प्रकारचे विष एकत्रित करून फवारणी केल्याने तीव्रता वाढली, असे सूत्र सांगतात. श्‍वासावाटे थेट फुफ्फुसात हे विष पोचले आणि थेट मेंदूवर त्याचा परिणाम होऊन मृत्यू झाल्याचे या अहवालात म्हटले आहे. विषबाधेनंतर ऍट्रोपीन व पामसारखे ऍन्टीडोज देण्यात आले. यामुळे शरिरातील विषाची मात्रा निघून गेली. त्याआधारेच मृतकांच्या रक्‍तात विष नसल्याचे भ्रामक दावे करण्यात आले, असेही निरीक्षण अहवालात नोंदविल्याची माहिती आहे.

इतर अॅग्रो विशेष
भारत शेतीमध्ये जागतिक महासत्ता :...बारामती ः भारत हा शेतीच्या बाबतीत जगातील महासत्ता...
माॅन्सून अंदमानात; मंगळवारपर्यंत केरळातपुणे : नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) बंगालच्या...
जॉईंट अॅग्रेस्को : ‘कृषी’च्या मंथनाकडे...दापोली, जि. रत्नागिरी : शेतकऱ्यांच्या आत्महत्या...
मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाजपुणे ः पावसाला पोषक हवामान असल्याने कोकण,...
गोष्ट अश्‍वमेधाच्या डिजिटल घोड्यांचीनरेंद्र मोदी देशाच्या राजकारणात उतरले तेच मुळी...
छत्तीसगडच्या शेतकऱ्यांना सीताफळाने...सीताफळ शेतीत देशात अाघाडीवर महाराष्ट्राची भुरळ...
चला आटपाडीला देशी शेळी, माडग्याळी मेंढी...आटपाडी (जि. सांगली) येथील अोढा पात्रात दर शनिवारी...
विशेष संपादकीय : देशाच्या 'फिटनेस'चे...नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता...
मोदी सरकार चार वर्ष : अपेक्षा...गेल्या चार वर्षांत नरेंद्र मोदी सरकारला अनेक चढ-...
विवेकबुद्धी, स्वयंप्रेरणाच बनली धूसरमोदी सरकारच्या काळात हिंदुत्व आणि नरम हिंदुत्व...
माॅन्सून अंदमानात दाखल !!!पुणे : माॅन्सूनसाठी अंदमानाच्या दक्षिण भागात...
फेरवाटपातून वाढतोय जलसंघर्षमहाराष्ट्र देशी जलसंघर्षांच्या संख्येत व तीव्रतेत...
शेतकरी सक्षमतेचा ‘करार’भारतीय शेतकऱ्यांसमोर आजची सर्वांत मोठी अडचण कोणती...
शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी...दापोली, जि. रत्नागिरी : शेतकऱ्यांच्या...
‘त्या’ कृषी पर्यवेक्षकांना ‘मॅट’चा...अकोला ः अमरावती विभागीय कृषी सहसंचालकाकडून सन...
भुईमुगालाही हमीभाव मिळेनाअकोला ः या हंगामात लागवड झालेल्या भुईमुगाची काढणी...
जैन इरिगेशनला विदर्भातील सूक्ष्म सिंचन...जळगाव : जगातील अग्रगण्य सिंचन कंपनी जैन इरिगेशन...
कडधान्याचा पेरा वाढण्याची शक्यतानवी दिल्ली ः भारतीय हवामान खत्याने यंदा मॉन्सून...
माॅन्सून उद्या अंदमानातपुणे : माॅन्सूनसाठी अंदमानाच्या दक्षिण भागात...
ढगाळ हवामानामुळे पारा घसरला पुणे : मध्य महाराष्ट्राच्या उत्तर भागात व परिसरात...