agriculture news in Marathi, CBI arrests Sachin Andure in Dr.Narendra Dabholkar murder case | Agrowon

दाभोलकरांचा मारेकरी सचिन अंदुरेची ही आहे ओळख
सकाळ वृत्तसेवा
रविवार, 19 ऑगस्ट 2018

औरंगाबाद : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा छडा लावण्यात दहशतवादविरोधी पथकाला (एटीएस) अखेर पाच वर्षांनंतर यश आले. याप्रकरणी मुख्य संशयिताला केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) ताब्यात देण्यात आले. सचिन प्रकाशराव अंदुरे असे या संशयित आरोपीचे नाव असून, तो मूळचा औरंगाबाद येथील रहिवासी आहे. त्याने दाभोलकर यांच्यावर गोळीबार केल्याचे चौकशीत पुढे आले आहे.

औरंगाबाद : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा छडा लावण्यात दहशतवादविरोधी पथकाला (एटीएस) अखेर पाच वर्षांनंतर यश आले. याप्रकरणी मुख्य संशयिताला केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) ताब्यात देण्यात आले. सचिन प्रकाशराव अंदुरे असे या संशयित आरोपीचे नाव असून, तो मूळचा औरंगाबाद येथील रहिवासी आहे. त्याने दाभोलकर यांच्यावर गोळीबार केल्याचे चौकशीत पुढे आले आहे.

नालासोपारा प्रकरणाशी संबंधित केसापुरी (ता. औरंगाबाद) येथील शरद भाऊसाहेब कळसकर याला अटक झाली होती. त्याच प्रकरणात शहरातील एका तरुणाचा संबंध असल्याचे एटीएसच्या तपासात समोर आले होते. त्यामुळे निराला बाजार परिसरात एका हॉटेललगत असलेल्या कापड दुकानावर पाळत ठेवून मंगळवारी (ता. 14) दुपारी साडेबाराच्या सुमारास सचिन अंदुरेला पकडून क्रांती चौक पोलिस ठाण्यात नेण्यात आले. दिवसभर त्याची चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर पुढील चौकशीसाठी मुंबईला नेण्यात आले होते.

दरम्यान, सचिन अंदुरे हा दौलताबादचा रहिवाशी असल्याची माहिती पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी दिली. 

कोण आहे सचिन अंदुरे? 
- सचिन हा मूळचा दौलताबादचा रहिवासी 
- औरंगाबादमधील राजाबाजारमधील वेणू निवास इमारतीत भाड्याने वास्तव्य 
- औरंगाबादमध्ये पत्नी व तीन महिन्यांच्या मुलीसह दहा महिन्यांपासून वास्तव्य 
- औरंगाबाद सासरवाडी असलेल्या सचिनला एक मोठा भाऊ 
- निराला बाजार भागातील एका कापड दुकानात नोकरी 
- अंदुरेच्या अटकेपासून त्याच्या राजाबाजारमधील घराला कुलूप 
- सचिन दहिहंडी, मिरवणुकांमध्ये असायचा सहभागी 
- सचिनचा कोणाशीही वाद नसल्याची शेजाऱ्यांची माहिती 
- सचिनच्या फेसबुक अकाउंटवर केवळ प्रखर हिंदुत्ववादी पोस्ट 

इतर ताज्या घडामोडी
काकडी, दोडका, कारल्याच्या दरात सुधारणापुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
‘गिरणा‘च्या पाण्यासाठी वाळूचा बंधाराजळगाव : गिरणा नदीतून पिण्यासह शेतीच्या पाण्याचे...
‘समृद्धी’च्या उभारणीसाठी रॉयल्टीत देणार...नाशिक   : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या...
व्याजासह एफआरपी दिल्याशिवाय...पुणे  : राज्यातील साखर कारखान्यांनी थकीत...
कोल्हापुरात पहिल्या टप्प्यात गूळदरात वाढकोल्हापूर  ः यंदाच्या गूळ हंगामाला सुरवात...
सरुड येथील गुऱ्हाळघरमालक उसाला देणार...कोल्हापूर : गुऱ्हाळघर व्यवसायात व्यावसायिकपणा...
नगर जिल्ह्यात १७८ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर   : जिल्ह्यात यंदा गंभीर पाणीटंचाई जाणवत...
पुणे बाजार समितीत हापूस आंब्यांची आवकपुणे  ः कोकणातील हापूस आंब्यांची या...
सातारा जिल्ह्यात पाणीटंचाई वाढलीसातारा   ः जिल्ह्याच्या पूर्व भागात...
नागपूर जिल्ह्यात रब्बीची २१ टक्के पेरणीनागपूर   ः पाणी उपलब्धतेची अडचण, जमिनीत...
राज्यकर्ते दूध भेसळ का थांबवत नाहीत :...पुणे : राज्यात राजरोस दुधात भेसळ सुरू असून, अन्न...
आर. आर. पाटील यांचे स्मारक युवकांना...सांगली   ः आर. आर. पाटील यांनी ग्रामविकास,...
जळगाव जिल्हा परिषद पाणी योजनांचे वीज...जळगाव : पाणी योजनांचे बिल भरण्यात आले नसल्याने...
जमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे...जमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत...
खानदेशात कांदा लागवड निम्म्याने...जळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड...
सटाणा, मालेगावसाठी सोडणार चणकापूर...नाशिक : सटाणा व मालेगावला भेडसावणाऱ्या...
पुणे विभागात ४८ हजार हेक्टरवर कांदा...पुणे   ः पुणे विभागात आत्तापर्यंत ४८ हजार...
वीजदरवाढीचा शॉक, अनुदानाची फक्त घोषणाचजळगाव ः वस्त्रोद्योगाला चालना मिळावी, उद्योजकांचा...
महिलांनी नाचणीपासून बनवले सत्तरहून अधिक...कोल्हापूर   : नाचणीची आंबील, नाचणीच्या...
बुलडाणा जिल्ह्यात रब्बीची ५६ हजार...बुलडाणा  ः कमी व अनियमित पावसामुळे संपूर्ण...