कोल्हापुरात कर्नाटकी बेंदूर सण उत्साहात

कोल्हापुरात कर्नाटकी बेंदूर सण उत्साहात
कोल्हापुरात कर्नाटकी बेंदूर सण उत्साहात

कोल्हापूर : शहर व जिल्ह्याच्या विविध भागांत कर्नाटकी बेंदूर उत्साहात साजरा झाला. गेल्या चार दिवसांपासून जिल्ह्यात पावसाळी हवामान निर्माण झाल्याने बेंदूर सणावर समाधानाचे वातावरण होते.

वटपौर्णिमा झाल्यानंतर कर्नाटकी बेंदूर हा सण येतो. सकाळपासून गाय-बैलांना न्हाऊ माखू घातले जात होते. त्यानंतर शिंगांना रंगरंगोटी, अंगावर झूल घालून पुरणपोळीचा नवैद्य खायला दिला गेला. याशिवाय घरात मातीचे दोन बैल आणून त्यांची हरभऱ्याची डाळ आणि गुळापासून बनवलेले कडबोळे शिंगांवर ठेवून त्यांची मनोभावे पूजा करून त्यांना पुरणपोळीचा नवैद्य दाखवला. बैलांना सजवण्यासाठी लागणारे साहित्य विक्रीसाठी बाजारपेठेत मांडण्यात आलेल्या स्टॉलवर बळिराजाने गर्दी केली होती.

सकाळपासून पंचगंगा नदीघाटावर आपल्या बैलांना अंघोळ घालून त्यांना विविध आकर्षक रंगांनी व फुलांनी सजवून त्यांची वाजतगाजत मिरवणूक काढण्यात येत होती. शहरात अनेक ठिकाणी कर तोडण्याचा कार्यक्रमही पार पडला. जिल्ह्यात विविध ठिकाणी मिरवणुका ही काढण्यात आल्या.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com