agriculture news in marathi, Center to discuss on Sugar price crises today | Agrowon

साखर दराच्या समस्येबाबत केंद्रात आज चर्चा होणार
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 5 जानेवारी 2018

पुणे : बाजारपेठेत ग्राहकांसाठी साखरेचे दर टिकून असताना साखर कारखान्याकडून खरेदी केल्या जाणाऱ्या साखरेचे भाव मात्र व्यापाऱ्यांनी पाडल्यामुळे कारखाने संकटात आले आहेत. या समस्येवर आज (ता. ५) दिल्लीत चर्चा होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

पुणे : बाजारपेठेत ग्राहकांसाठी साखरेचे दर टिकून असताना साखर कारखान्याकडून खरेदी केल्या जाणाऱ्या साखरेचे भाव मात्र व्यापाऱ्यांनी पाडल्यामुळे कारखाने संकटात आले आहेत. या समस्येवर आज (ता. ५) दिल्लीत चर्चा होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

केंद्रीय अन्न मंत्रालयाचे सहसचिव सुभाशिष पांडा यांनी ही समस्या जाणून घेण्यासाठी देशातील साखर कारखाना प्रतिनिधींशी सपर्क साधण्याचा प्रयत्न केला आहे. राष्ट्रीय साखर कारखाना संघाचे अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्याशी देखील श्री. पांडा चर्चा करणार आहेत. या समस्येवर उपाय म्हणून सरकारने साखर आयातीवर बंदी घालावी, तसेच निर्यात बंदी लागू करून बफर स्टॉक धोरण मागे घेण्याचा आग्रह संघाकडून धरला जाईल, असे सूत्रांनी स्पष्ट केले. 

देशाचा ऊस गाळप हंगाम सध्या वेगात असून, साखरेचा साठा मर्यादित स्वरूपाचा आहे. बाजारपेठांमध्ये साखरेचे दर 40 ते 42 रुपये किलो असल्यामुळे साखर कारखान्यांची साखर चढया दराने म्हणजेच 3600 रुपये प्रतिक्विंटल दराने विकली जात होती. बाजारात सध्यादेखील साखरेचे दर टिकून असताना दुसऱ्या बाजूला कारखान्यांकडील साखर खरेदीचे दर पाडण्यात आलेले आहेत. 

कारखान्यांचा साखर उत्पादन खर्च प्रतिक्विंटल तीन हजार 675 रुपये असताना सध्या व्यापारी मात्र तीन हजार रुपये दराने साखर विकत घेत आहेत. हीच साखर बाजारात पूर्वीप्रमाणेच 40 रुपये प्रतिकिलो दराने विकली जात आहे. त्यामुळे कारखान्यांचा मोठा तोटा होत असून, त्यातून शेतकऱ्यांना ऊस पेमेंट देताना अडचणी उभ्या राहत आहेत, अशी भूमिका साखर कारखान्यांनी घेतली आहे. 

राष्ट्रीय सहकारी साखर कारखान्याच्या म्हणण्यानुसार, साखर विक्रीत सध्या कारखान्यांना प्रतिक्विंटल 600 रुपयांचा तोटा होतो आहे. यातून उद्भविणाऱ्या समस्यांवर महराष्ट्र राज्य साखर संघ तसेच व्हीएसआयनेदेखील चर्चा केली होती. केंद्र शासनाने हस्तक्षेप न केल्यास कारखान्यांसमोरील समस्या अजून वाढतील, असेही कारखान्यांनी सूचित केले होते. 

शेतकऱ्यांचा पैसा कोणाच्या खिशात?
भारतीय साखर कारखानदार संघाचे (इस्मा) उपाध्यक्ष रोहित पवार यांच्या म्हणण्यानुसार, साखर कारखान्यांची अडवणूक खरेदीचे दर पाडले गेले आहेत. ग्राहकांसाठी विक्रीचे किरकोळ दर कायम ठेवून कारखान्यांकडून मात्र दहा रुपये कमी दराने साखर विकत घेतली जात आहे. शेतकऱ्यांचा हा पैसा कोणाच्या खिशात जातोय याचा शोध सरकारने घ्यावा. कारण त्याचा थेट फटका शेतकऱ्यांना बसतो आहे. त्यामुळे बाजारातील अनिष्ठ घडामोडींना आळा घालून कारखान्यांना किमान 35 रुपये प्रतिकिलो दर मिळण्याबाबत उपाय करण्याची जबाबदारी सरकारचीच आहे.  

इतर ताज्या घडामोडी
'दारुमुळे दरवर्षी अडीच लाखापेक्षा जास्त...नवी दिल्ली- दारूमुळे दरवर्षी जवळपास अडीच...
जालन्यात पाण्यात बुडून तिघांचा मृत्यूजालना : गणपती बाप्पांचे विसर्जन करताना जालना...
शिखर, रोहितने पाकला धुतले; भारत अंतिम...दुबई : पाकिस्तानने उभारलेल्या 237 धावांचा सहजी...
खानदेशात मध्यम पाऊस; नंदुरबारला हुलकावणीजळगाव : खानदेशात शुक्रवारी (ता.२१) मध्यरात्री व...
पुणे जिल्ह्यात ढगाळ हवामानपुणे  : जिल्ह्यात आठवड्याच्या सुरवातीला...
खानापूर घाटमाथ्यावर तीव्र पाणीटंचाई सांगली  : घाटमाथ्यावर पावसाने ओढ दिली आहे....
नगर जिल्ह्यात साडेसहा लाख हेक्‍टरवर...नगर  ः जिल्ह्यात रब्बी हंगामात सहा लाख ५२...
कौशल्यावर आधारित उपक्रम ‘रयत’मध्ये सुरू...सातारा  ः केवळ पुस्तकी नव्हे तर कौशल्यावर...
नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचा अकोला...अकोला  ः नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या...
सांगली जिल्ह्यात पाणीप्रश्‍न पेटण्याची...सांगली  : पावसाने दिलेली उघडीप आणि पावसाळा...
अकोला, बुलडाण्यात सर्वदूर पाऊसअकोला   ः वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा या...
सावधान... अल्झायमर आला उंबरठ्यावर ! कोल्हापूर : मंगळवार पेठेतल्या विठ्ठल मंदिरात रोज...
परभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला...
भातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे...सध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी...
कमी तीव्रतेच्या वणव्यांचाही मातीच्या...कमी तीव्रतेचे वणवे किंवा मर्यादित प्रमाणात...
ढगाळ वातावरणाने खानदेशात सोयाबीन मळणीला...जळगाव : खानदेशातील धुळे, नंदुरबार व जळगाव...
माळेगावकरांचा औद्योगिक वसाहतीच्या...नाशिक : माळेगाव औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक...
परभणीत व्यापाऱ्यांचे असहकार आंदोलन सुरूचपरभणी ः परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत...
सांगली जिल्ह्यात द्राक्ष क्षेत्रात वाढसांगली  ः दर्जेदार द्राक्ष उत्पादनासाठी...
धुळे, जळगाव जिल्ह्यांतील पैसेवारी चुकीचीजळगाव   ः धुळे व जळगाव जिल्ह्यांत हवा तसा...