agriculture news in marathi, Center to impose Tax on sugar says source | Agrowon

साखरेवर कर लावण्याची शक्यता
कोजेन्सिस वृत्तसेवा
शुक्रवार, 27 एप्रिल 2018

- मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जीएसटी कौन्सिलची बैठक
- अडचणीतील साखर उद्योगाला सावरण्याचा प्रयत्न होणार

नवी दिल्ली : अडचणीतील साखर उद्योगाला दिलासा देण्यासाठी साखरेवर कर लावण्याचा निर्णय केंद्र सरकारच्या विचाराधीन आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जीएसटी कौन्सीन्सिलची बैठक होणार आहे. या बैठकीत साखरेवर कर लावण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो, अशी माहिती सूत्रांनी दिली.
‘‘येणाऱ्या जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत साखरेवर कर लावण्यासंर्भात विचार होऊ शकतो. यासंबंधीची कायदेशीर परवानगी अद्याप मिळालेली नाही. राज्यांनीही हा विषय पुढील बैठकीत चर्चेला घेण्यास सांगितले आहे,’’ अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली.

या अधीही सरकारने साखर कारखान्यांवर प्रतिक्विंटल १२४ रुपये कर लावला होता. हा कर थेट ग्राहकांवर लादला गेला. या करातून जमा झालेला पैसा अन्न मंत्रालयाच्या अखत्यारितील साखर विकास निधीत गेला. या निधीचा वापर कारखान्यांचे आधुनिकीकरण आणि विस्तार यासाठी वापरला गेला. या कराचा वेगळा असा भार असणार नाही. सध्याच्या कर पद्धतीत बरेचसे अप्रत्यक्ष कर हे जीएसटीमध्ये समाविष्ट झालेले आहेत. अलीकडेच झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीत ऊस उत्पादकांची साखर कारखान्यांकडे थकलेली जवळपास २० हजार कोटींची देणी देता यावी यासाठी उत्पादन संबंधित अनुदान आणि साखरेवर कर लावण्याच्या प्रस्तावावर चर्चा झाली.

यंदा देशात साखर उत्पादन मागील वर्षीच्या उत्पादनापेक्षा १० दशलक्ष टनाने जास्त होऊन ३१ दशलक्ष टन होणार आहे. त्यामुळे सध्या घाऊक बाजारात साखरेचे दर हे मागील २८ महिन्यांच्या निम्न पातळीवर आहेत. त्यामुळे सरकारने कारखान्यांना साखर कोटा ठरवून निर्यात करण्यास सांगितले आहे. परंतु आंतरराष्ट्रीय बाजारात साखर दबावात असल्याने कारखान्यांनी निर्यात अनुदान देण्याची मागणी केली आहे.
‘‘आम्ही ऊस उत्पादकांना गाळप झालेल्या उसावर अनुदान देण्याचा विचार करत आहोत. साखरेवर कर लावल्यानंतर जो निधी जमा होईल त्यातून हे अनुदान दिले जाईल,’’ अशी माहिती अन्न मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी दिली. 

इतर अॅग्रो विशेष
‘जनावरं जगवायची धडपड सुरू हाय’सातारा ः शाळू (रब्बी ज्वारी) केलीय. पण पीक...
परभणी जिल्ह्यात ज्वारीवर अमेरिकन लष्करी...परभणी ः परभणी जिल्ह्यात यंदा प्रथमच रब्बी...
सीड हब म्हणून भारताचा उदयनवी दिल्ली ः आशिया खंडात भारत देश ‘सीड हब’ म्हणून...
ब्राझीलचे साखर उत्पादन निम्मे घटलेनवी दिल्ली ः आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे सतत...
गोंदिया जिल्हा अधीक्षक अधिकारी बऱ्हाटे...गोंदिया ः नगर जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या...
शेतीपंप वीजवापर घोटाळा आयोगाच्या...मुंबई ः महावितरणची प्रचंड वितरण गळती व चोऱ्या...
राज्यात थंडी वाढली; नाशिक ११.५ अंशांवरपुणे : उत्तरेकडील थंड वाऱ्यांचे प्रवाह दक्षिणेकडे...
संत्रा बागेतील उत्कृष्ठ व्यवस्थापनाचा...किडी-रोग, पाण्याचे अयोग्य व्यवस्थापन आदी...
फॉस्फोनिक रेसिड्यूमुळे डाळिंब निर्यात...पुणे : निर्यातक्षम डाळिंबात युरोपसाठी फॉस्फोनिक...
चिकाटी, प्रयत्नवादातून शून्यातून...उस्मानाबाद जिल्ह्यातील देवसिंगे (तूळ) येथील रमेश...
उच्च जीवनमूल्य जपणारी आदिवासी संस्कृती मेळघाटात अंधश्रद्धेचे प्रमाण खूप आहे. यावर...
आर्थिक विकासवाट . देशात नोटाबंदीच्या निर्णयाला नुकतीच दोन वर्षे...
खानदेशातील जलसाठ्यात घट जळगाव : खानदेशात पाणीबाणी वाढू लागली असून,...
जिनर्स कापूस खरेदी केंद्रांसाठी ९००...जळगाव ः भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) कापूस...
राज्यात दुधाचे दर पुन्हा घसरलेपुणे: राज्यात होत असलेल्या जादा दुधाच्या...
दावणीला आणि छावणीला परिस्थितीनुसार चारा...बीड : राज्यात सरासरीच्या ७० टक्के पाऊस पडला असून...
सत्ताधाऱ्यांना नमवण्याची ताकद...मुंबई : गेल्या चार वर्षांत देश चुकीच्या...
दुष्काळातही माळरानावर हिरवाई फुलवण्याचे...लातूर जिल्ह्यातील वाघोली येथील सोनवणे कुटुंब...
सेंद्रिय पद्धतीने ऊस लागवड ते...लातूर येथील विलास सहकारी साखर कारखान्याने...
श्री विठ्ठल-रुक्मिणीचे २४ तास दर्शनसोलापूर ः पंढरपुरात श्री विठ्ठल -रुक्मिणीच्या...