agriculture news in marathi, Center refuses to reconsider BT cotton prices | Agrowon

बियाणे दराचा पुनर्विचार करण्याचा प्रस्ताव केंद्राने फेटाळला
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 16 मार्च 2018

नागपूर : या वर्षी नाही, परंतु पुढच्या वर्षीच्या हंगामात निश्‍चितच बियाणे कंपन्यांच्या हिताचा निर्णय घेण्याचे आश्‍वासन देत केंद्रीय कृषिमंत्री राधामोहनसिंग यांनी नॅशनल सीड असोसिएशनच्या प्रतिनिधींचा दरासंदर्भातील प्रस्ताव फेटाळला.

नागपूर : या वर्षी नाही, परंतु पुढच्या वर्षीच्या हंगामात निश्‍चितच बियाणे कंपन्यांच्या हिताचा निर्णय घेण्याचे आश्‍वासन देत केंद्रीय कृषिमंत्री राधामोहनसिंग यांनी नॅशनल सीड असोसिएशनच्या प्रतिनिधींचा दरासंदर्भातील प्रस्ताव फेटाळला.

बीटी बियाणे दरात केलेल्या कपातीचा पुनर्विचार करण्याची मागणी करीत नॅशनल सीड असोसिएशनच्या शिष्टमंडळाने केंद्रीय कृषिमंत्र्यांची बुधवारी (ता. १४) दिल्लीत भेट घेतली. नॅशनल सीड असोसिएशनचे कार्यकारी संचालक कल्याण गोस्वामी, समीर मुळे, कावेरी सीड कंपनीचे भास्कर राव, अंकुर सीड कंपनीचे संचालक माधव शेंबेकर यांचा शिष्टमंडळात समावेश होता. सीड असोसिएशनच्या शिष्टमंडळाने बीटी बियाणे दर ८०० रुपयांवरून ७४० करण्यात आले, त्यामुळे कंपन्यांना मोठे नुकसान सोसावे लागणार असल्याचे कृषिमंत्र्यांना सांगितले. बीजोत्पादन, प्रक्रिया, तसेच याकामी लागणाऱ्या मजुरीच्या खर्चात वाढ झाली आहे, त्याची दखल घेत बियाणे दरात वाढ होणे अपेक्षित असताना शासनाने गेल्यावर्षीपेक्षा या वर्षी कमी दराने बीटी बियाणे विकण्याची अधिसूचना काढली. ही बाब अन्यायकारक असल्याने बियाणे दराबाबत पुनर्विचार व्हावा, अशी मागणी करण्यात आली.

पुढील वर्षी कंपन्यांचे हित जपू
बीजी- २ या कपाशी वाणाची विक्री या वर्षी ७४० रुपयांना होणार आहे, त्यात फेरबदल शक्‍य नसल्याचे केंद्रीय कृषिमंत्री राधामोहनसिंग यांनी सांगितले. पुढील वर्षीच्या हंगामात कंपन्यांच्या हिताचा नक्‍कीच विचार करून कंपन्यांसाठी दिलासादायक असा निर्णय घेतला जाईल, असे आश्‍वासन राधामोहनसिंग यांनी कंपन्यांच्या शिष्टमंडळाला दिले.

‘नॅशनल सीड असोसिएशनने बियाणे दराबाबत पुनर्विचार करण्याचा प्रस्ताव मांडला होता. परंतु या वर्षी त्यात फेरबदल शक्‍य नसल्याचे कृषिमंत्र्यांनी सांगितले. पुढील वर्षीच्या हंगामात बियाणे कंपन्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली आहे. आम्ही आजही मोन्सँटोला देण्यात येणारे तंत्रज्ञान शुल्क रद्द करण्याच्या मागणीवर ठाम आहोत.’
- कल्याण गोस्वामी
कार्यकारी संचालक, नॅशनल सीड असोसिएशन ऑफ इंडिया

‘६० रुपये दरात कपात करून काहीही साधले जाणार नाही. या वर्षी बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्यास शेतकऱ्यांना पुन्हा फवारणीवर खर्च करावा लागेल. परिणामी दरात कपात करण्याऐवजी बोंड अळी प्रतिकारक कमी खर्चाचे तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्याची गरज आहे.’
- श्रीकृष्ण ठोंबरे
कापूस उत्पादक शेतकरी, कान्हेरी, जि. अकोला 

इतर अॅग्रो विशेष
शेतीतील दारिद्र्याचे भीषण वास्तवभारताने खुली व्यवस्था स्वीकारल्याला २०१६ मध्ये २५...
आश्वासक हरभरा; अस्वस्थ उत्पादकराज्यात हरभरा काढणीस महिनाभर आधीपासूनच सुरवात...
इतिहासातील जलसंधारण संकल्पना अन्...मागच्या भागात आपण इतिहासातील सागरी किल्ल्यांवरील...
खानदेशात बाजरी मळणीवरजळगाव : खानदेशात बाजरी पीक मळणीवर आले आहे. आगामी...
शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती : '...मुंबई ः शेतीच्या शाश्वत सुधारणेला गती देण्यासाठी...
सांगली : कडब्याचे दर पोचले साडेचार हजार...सांगली  ः यंदा दुष्काळी स्थिती तीव्र आहे....
सांगली जिल्ह्यात पाण्याअभावी रखडली खरड...सांगली  ः जिल्ह्यातील द्राक्ष हंगाम अंतिम...
ऊस, कापूस पट्ट्यात कष्टाने पिकविली हळद शेतीचा फारसा अनुभव नाही. पण आवड, जिद्द,...
कृषी विद्यापीठांचे वाण वापरण्यात...वाशीम जिल्ह्यातील शिरपूर जैन (ता. मालेगाव) येथील...
राज्यात अद्यापही २४ टक्के ‘एफआरपी’ बाकीपुणे : ऊस खरेदीपोटी राज्यातील शेतकऱ्यांना...
उत्तर प्रदेशात ऊसबिलावरून धुमशाननवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत कोणता मुद्दा...
शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी युवकाचा ‘...नाशिक : राज्यात नापिकी, दुष्काळ, बाजारभाव...
उन्हाचा ताप वाढण्याची शक्यतापुणे : राज्यात उन्हाचा चटका अाणि उकाडा...
जेजुरी गडावर देवाची रंगपंचमीजेजुरी, जि. पुणे : जेजुरी गडावर पारंपरिक...
शेतकरी मंडळामुळे मिळाला ९० लाखांचा...वेंगुर्ले, जि. सिंधुदुर्ग : बॅंकेच्या चुकीमुळे...
कोंबडा झाकला तरी...मा  गील सात वर्षांत कृषी आणि सलग्न क्षेत्रातील...
शेतकऱ्यांची दैनावस्था दूर करणारा...गेल्या अनेक वर्षांत शेती आणि शेतकऱ्यांची जी...
तुरळक ठिकाणी पावसाची शक्यतापुणे : राज्यात उन्हाचा चटका वाढल्याने अनेक ठिकाणी...
शिल्लक साखरेचा दबाव पुढील हंगामावर?कोल्हापूर : केंद्राने सुरू केलेल्या कोटा...
‘सॉर्टेड सिमेन’चा प्रयोग यशस्वीनगर : गोदावरी खोरे नामदेवराव परजणे पाटील तालुका...