agriculture news in marathi, Center to review BT cotton Seed price structure | Agrowon

बीटी बियाणे दराचा केंद्राकडून पुनर्विचार
विनोद इंगोले
शनिवार, 24 फेब्रुवारी 2018

नागपूर ः बीटी दराबाबत पुनर्विचार करण्याच्या मानसिकतेत केंद्र सरकार असून, तंत्रज्ञान शुल्क कमी करण्यासोबतच बीटी कंपन्यांनादेखील येत्या हंगामात कमी दराने बियाणेपुरवठा करण्याचे सांगितले जाणार असल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी दिली. बियाणे कंपन्यांनी तंत्रज्ञान शुल्क कमी करण्याला पाठिंबा दर्शविला असला, तरी बियाणे दर कमी करण्याला मात्र विरोध केला आहे. 

नागपूर ः बीटी दराबाबत पुनर्विचार करण्याच्या मानसिकतेत केंद्र सरकार असून, तंत्रज्ञान शुल्क कमी करण्यासोबतच बीटी कंपन्यांनादेखील येत्या हंगामात कमी दराने बियाणेपुरवठा करण्याचे सांगितले जाणार असल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी दिली. बियाणे कंपन्यांनी तंत्रज्ञान शुल्क कमी करण्याला पाठिंबा दर्शविला असला, तरी बियाणे दर कमी करण्याला मात्र विरोध केला आहे. 

देशभरातील अनेक कापूस उत्पादक राज्यांमध्ये गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाला. महाराष्ट्रातदेखील गेल्या खरिपात बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे कापूस पीक हातचे गेले. बीजी-२ तंत्रज्ञान याप्रकारे गुलाबी बोंड अळीला बळी पडल्याने त्या संदर्भाने महिको-मॉन्सॅन्टोला दिले जाणारे तंत्रज्ञान शुल्क सरसकट रद्द करावे, अशी मागणी बियाणे कंपन्यांकडून होऊ लागली. केंद्रशासन स्तरावरदेखील बियाणे कंपन्यांच्या संघटनेकडून या संदर्भाने पाठपुरावा करीत हे शुल्क रद्द करावे, असा आग्रह धरण्यात आला आहे. 

दरम्यान केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या अखत्यारीतील बीटी बियाणे दर नियंत्रण समिती येत्या हंगामात बीटी बियाणे कमी दराने पुरवठ्यासाठी आग्रही असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्याकरिता तंत्रज्ञान शुल्कात कपातीचा फॉर्म्युला वापरला जाणार असल्याचेदेखील सांगण्यात आले. गुरुवारी (ता. २२) दर नियंत्रण समितीची दिल्लीत बैठक झाली. त्यापूर्वी सीड असोसिएशनकडून बियाणे दर नियंत्रण समितीचे संयुक्‍त सचिव अश्‍विनी कुमार यांना पत्र लिहीत बीटी बियाणे दरवाढीची मागणी करण्यात आली आहे. 

बीजोत्पादनाच्या खर्चात झालेली वाढ, तसेच वाढलेले मजुरी दर, बियाणे कंपन्यांद्वारे तंत्रज्ञानाकरिता संशोधन आणि विकासकामावर होणारा खर्च, अशा अनेक कारणांमुळे बियाणे दरात वाढीची मागणी कंपन्यांनी केली आहे. सुरवातीला एक जीन असताना ९३० रुपयांना ४५० ग्रॅम बीटी बियाणे विकले जात होते. त्यानंतर महागाई वाढली असताना, सरकारने बीटी दर ८०० रुपयांपपर्यंत खाली आणला. हा प्रकार बियाणे कंपन्यांवर अन्याय करणारा असून, सर्व घटकांचा विचार करीत त्यात वाढ करावी, अशी मागणी बियाणे कंपन्यांची आहे. 

तंत्रज्ञान शुल्क रद्दच करा
मॉन्सॅन्टोचे बीजी-२ हे तंत्रज्ञान गुलाबी बोंड अळीला बळी पडले. त्यामुळे तंत्रज्ञान शुल्कात कपात केली जावी किंवा ते रद्दच करावे, अशीदेखील मागणी सीड असोसिएशनची आहे. तंत्रज्ञानापोटी महिको मॉन्सॅटोला ४९ रुपये दिले जातात. त्यामुळे तंत्रज्ञान अपयशी ठरले तर भरपाईदेखील मग त्यांच्याकडूनच वसूल झाली पाहिजे, असेही संघटनेचे म्हणणे आहे.

इतर अॅग्रो विशेष
नागपूर : रब्बीची पैसेवारी काढली खरीप...नागपूर : खरीप आणि रब्बी हंगामात वेगवेगळी पिके...
अॅग्रोवन समृद्ध शेती योजनेचे...नांदेड: `अॅग्रोवन’च्या माध्यमातून...
मराठवाड्यातील २९२ लघुप्रकल्प कोरडेऔरंगाबाद : मराठवाड्यातील ७४९ लघुप्रकल्पांपैकी २९२...
दक्षिण आशियात यंदा सर्वसामान्य मॉन्सून...पुणे  : भारतासह दक्षिण आशियातील देशांच्या...
कृषिउद्योग महामंडळाकडून ‘बायोकॅप्सूल’चा...पुणे : सेंद्रिय शेतीकडे वळालेल्या शेतकऱ्यांच्या...
शासन दरबारी रब्बी हंगामात नागपूर...नागपूर  : खरिपानंतर पाण्याअभावी रब्बी...
बीटी बियाणे १५ मेपूर्वी विक्रीस मनाईपुणे : राज्यातील बियाणे उत्पादक कंपन्यांनी १५...
जमिनीचे जैविक पृथक्करणआजकाल शेतकऱ्यांना मातीचा पृथक्करण अहवाल करून...
सांगलीतून १२ टन द्राक्षे निर्यातसांगली ः यंदा प्रतिकूल परिस्थतीतही जिल्ह्यातील...
काळजी घ्या : उन्हाच्या झळा वाढल्यापुणे : उन्हाच्या झळा वाढल्याने विदर्भ,...
शून्यातून राऊत दांपत्याने उभारली...लातूर जिल्ह्यात नागरसोगा (ता. औसा) येथील राऊत...
संत्रा बागेत काटेकोर पाणी व्यवस्थापन संत्रा पिकात पाणी व्यवस्थापन अत्यंत चोख ठेवावे...
दक्षिण अशियात मॉन्सूनचा पाऊस सरासरी...पुणे : भारतासह दक्षिण आशियातील देशांच्या बहुतांशी...
विश्वासावर बहरेल व्यापारचीन-अमेरिकेमध्ये चालू असलेल्या व्यापार युद्धाच्या...
निवडणुकीने दुष्काळ खाऊन टाकू नये म्हणून...लोकसभेच्या निवडणुकीमुळे राजकीय हवामान-बदल होत...
उपलब्ध पाण्याचे गणित मांडा...अनेक कारणांमुळे जलसंधारण ही सोपी वाटणारी म्हणून...
उत्कृष्ठ कारली पिकवण्यात पाटील यांचा...लोणी (ता. चोपडा, जि. जळगाव) येथील भरत, गणेश व...
पेरू, अॅपलबेरमधून पीक बदल, कष्टातून...पारंपरिक शेती पद्धतीत बदल करून व सेंद्रिय...
राज्यात उरले अवघे ३०५ टीएमसी पाणीपुणे (प्रतिनिधी) : उन्हाच्या झळांना होरपळ वाढून...
केंद्राकडून यंदा खरिपात १२ टक्के अधिक...पुणे : राज्यासाठी गेल्या खरीप हंगामाच्या तुलनेत...