रसायनमुक्त शेतीबाबत केंद्राने धोरण अाखावे : कृषक समाज

रसायनमुक्त शेतीबाबत केंद्राने धोरण अाखावे : कृषक समाज
रसायनमुक्त शेतीबाबत केंद्राने धोरण अाखावे : कृषक समाज

अकोला : रसायनमुक्त नैसर्गिक शेतीसाठी केंद्राने नियोजन करीत धोरण अाखावे, अशी मागणी भारत कृषक समाजाने राष्ट्रपती, पंतप्रधानांसह केंद्रीय कृषिमंत्र्यांकडे केली. भारत कृषक समाजाचे चेअरमन डॉ. प्रकाश मानकर, डॉ. रमेश ठाकरे यांनी दिल्ली येथे याबाबत निवेदन दिले असून, केंद्रीय कृषी राज्यमंत्री श्रीमती कृष्णाराज यांची याविषयावर प्रत्यक्ष भेटही घेतली.        कृषिप्रधान देशात केंद्र व राज्य शासनाने अापल्या शेतीच्या सुपीकतेसाठी शेतकऱ्यांच्या विकासासाठी, तसेच समाजाला चांगल्या दर्जाचे अन्नधान्य, भाजीपाला, फळे मिळण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे अाहे. त्यासाठी नियोजन अाखून धोरण हवे. मात्र नेमके याच गोष्टीकडे दुर्लक्ष होत असल्याने शेतकऱ्यांच्या अात्महत्यांमध्ये वाढ होत अाहे. शेतीची सुपीकता कमी होत अाहे. रासायनिक खते, विषारी अौषधे, तणनाशके यांच्या अतिवापरामुळे होणारे दुष्परिणा रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणावर योजना अाखण्याची गरज असल्याचे कृषक समाजाचे म्हटले. या अनुषंगाने कृषी राज्यमंत्री श्रीमती कृष्णाराज यांच्याशी चर्चा करण्यात अाली. केंद्र शासनाने राज्यांचे कृषी विभाग, कृषी विद्यापीठे तसेच संबंधित विभागांना निर्देश देत जास्तीत जास्त शेतकऱ्यांमध्ये यासंबंधी जागरूकता अाणून रासायनिक खते, अौषधांची शिफारस बंद करून देशी गायींच्या माध्यमातून हळूहळू नैसर्गिक शेतीसाठी प्रोत्साहित करण्याची मागणी करण्यात अाली.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com