agriculture news in marathi, Central Budget 2018_19, Pasha Patel | Agrowon

बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले : पाशा पटेल
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 2 फेब्रुवारी 2018

स्वातंत्र्यानंतर प्रथमच संसदेत शेतीशी संबंधित उत्पादनखर्चावर आधारित नफ्याची बाब चर्चेत आली. केंद्र सरकारने अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांना उत्पादनखर्च आणि ५० टक्के नफा देण्याची घोषणा केली आहे. पुढील खरीप हंगामापासून याची अंमलबजावणी केली जाईल. सर्व पिकांना दीडपट हमीभावाची किमान आधारभूत किंमत लागू होऊन त्याचा फायदा शेतकऱ्यांना होईल. निती आयोग आणि केंद्र सरकार राज्य सरकारांशी चर्चा करून या संदर्भातील कार्यक्रम लवकरच जाहीर करणार आहे. त्यासोबत २२ हजार आठवडे बाजार कृषी बाजार संरचनेशी जोडले जाणार आहेत.

स्वातंत्र्यानंतर प्रथमच संसदेत शेतीशी संबंधित उत्पादनखर्चावर आधारित नफ्याची बाब चर्चेत आली. केंद्र सरकारने अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांना उत्पादनखर्च आणि ५० टक्के नफा देण्याची घोषणा केली आहे. पुढील खरीप हंगामापासून याची अंमलबजावणी केली जाईल. सर्व पिकांना दीडपट हमीभावाची किमान आधारभूत किंमत लागू होऊन त्याचा फायदा शेतकऱ्यांना होईल. निती आयोग आणि केंद्र सरकार राज्य सरकारांशी चर्चा करून या संदर्भातील कार्यक्रम लवकरच जाहीर करणार आहे. त्यासोबत २२ हजार आठवडे बाजार कृषी बाजार संरचनेशी जोडले जाणार आहेत. जे शेतकरी मोठ्या बाजारापर्यंत पोचू शकत नाहीत अशा अल्प, अत्यल्पभूधारक शेतकऱ्यांना त्याचा लाभ होईल.  

शंभर कोटींची उलाढाल असलेल्या शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी पाच वर्षे करमुक्त असणार आहेत. त्यामुळे ग्रामीण बाजार व्यवस्था मजबूत होण्यास मदत होईल. सरकारने सेंद्रिय शेतीवरही विशेष लक्ष केंद्रित केले आहे. त्यासाठी पशुधनावर दहा हजार कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. १४ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक ग्रामीण भागात होणार आहे. शेतीसाठी ११ लाख कोटींची कृषीकर्जे उपलब्ध होणार आहेत. उत्पादनवाढीकडे लक्ष देतानाच निर्यातीला प्रोत्साहन देण्याचे धोरण राबविले जाणार आहे. शंभर अब्ज डॉलर निर्यातीचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे, त्यातून शेतमालाची निर्यात वाढेल. देशातील शेतकऱ्यांना जी आश्वासने दिली आहेत, ती पूर्ण करण्याचा सरकारचा प्रयत्न या अर्थसंकल्पातून दिसून  येतो.

तरतूद 

  • दीडपट हमीभावाची घोषणा
  • २२ हजार आठवडे बाजार जोडले जाणार
  • उत्पादक कंपन्यांसाठी पाच वर्षे करमुक्त
  •  १०० अब्ज डॉलर निर्यातीचे लक्ष्य

परिणाम

  • रास्त दर, आठवडे बाजारचा शेतकऱ्यांना फायदा
  • उत्पादक कंपन्यांच्या करमुक्तीमुळे बाजार व्यवस्था मजबूत
  • शेतमालाची निर्यात वाढेल  

- पाशा पटेल, अध्यक्ष,
राज्य कृषिमूल्य आयोग

इतर अॅग्रो विशेष
‘उजनी’तील पाणीसाठा उणे पातळीत सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी...
राज्यभरात अन्नत्याग आंदोलनमुंबई ः शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रती...
मार्चनंतरही पणन करणार कापूस बाजारात...यवतमाळ ः शेतकऱ्यांच्या घरातील कापूस विकल्या...
मढी यात्रेला बुधवारपासून प्रारंभनगर ः होळीच्या दिवशी सकाळी कानिफनाथांच्या समाधीला...
दर्जेदार ऊसबेण्याची केली निर्मिती काशीळ (ता. जि. सातारा) येथील उच्चशिक्षित व...
मतदानासाठी सकाळी सात ते सायंकाळी...अकोला ः देशात होत असलेल्या लोकसभा...
कोकणातील आंबा अडकला धुक्याच्‍या फेऱ्यातवेंगुर्ले, जि. सिंधुदुर्ग : ऐन हंगामातच कोकणातील...
विदर्भात वादळी पावसाची शक्यतापुणे : मध्य भारतात होत असलेल्या वाऱ्यांच्या...
हळदीचे दिवसातून दोन वेळा सौदेसांगली ः सांगली बाजार समितीत गेल्या दोन ते...
पदविकाधारकांना कृषिसेवेचे दरवाजे बंद... पुणे : राज्याच्या शेतकरी कुटुंबातील हजारो...
सर्वसामान्यांचा असामान्य नेतामाजी संरक्षणमंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर...
सर्जनशीलतेला सलाम!व र्ष २०१७ च्या खरीप हंगामात कापसावर फवारणी...
प्राणघातक हृदयरोगाचे प्रमाण होतेय कमीगेल्या दोन वर्षामध्ये हृदयरोगाला प्रतिबंध आणि...
अन्नत्याग आंदोलनास प्रारंभ : अमर हबीब,...नवी दिल्ली : शेतकरी आत्महत्यांप्रती सहवेदना आणि...
मच्छीमारी व्यवसायाने आणली समृद्धीगणित विषयात पदवी असूनही बेरोजगार राहणं नशिबी आलं...
काबुली हरभऱ्याने उंचावले अर्थकारण चोपडा तालुक्‍यातील (जि. जळगाव) तापी व अनेर...
जत तालुक्यात द्राक्ष, डाळिंब बागा...सांगली : जत तालुक्यात पश्‍चिम भाग वगळता...
प्रकल्प व्यवस्थापकावर कारवाईचे आदेशपुणे : एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन...
सहवेदना :आज अन्नत्याग आंदोलनयवतमाळ: शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रति...
उन्हाची काहिली वाढलीपुणे: राज्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाची...