agriculture news in Marathi, Central government directed to BT leaf testing, Maharashtra | Agrowon

‘बीटी’ची पाने तपासण्याचे केंद्र सरकारचे आदेश
विनोद इंगोले
शुक्रवार, 26 जानेवारी 2018

अमरावती ः राज्यात कापसावर गुलाबी बोंड अळीचा मोठा प्रादुर्भाव झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारने बीटी कापूस झाडांच्या तपासणीचे आदेश दिले आहेत. त्यानुसार अमरावती विभागातून बीटी कापूस झाडांची हिरवी पाने नागपुरातील दोन तसेच हैदराबाद येथील एका प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आली. अशाप्रकारचे तब्बल ४१० नमुने काढण्यात आल्याची माहिती कृषी विभागाच्या विश्‍वसनीय सूत्रांकडून देण्यात आली. 

अमरावती ः राज्यात कापसावर गुलाबी बोंड अळीचा मोठा प्रादुर्भाव झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारने बीटी कापूस झाडांच्या तपासणीचे आदेश दिले आहेत. त्यानुसार अमरावती विभागातून बीटी कापूस झाडांची हिरवी पाने नागपुरातील दोन तसेच हैदराबाद येथील एका प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आली. अशाप्रकारचे तब्बल ४१० नमुने काढण्यात आल्याची माहिती कृषी विभागाच्या विश्‍वसनीय सूत्रांकडून देण्यात आली. 

या वर्षी राज्यात बीटी कापसावर मोठ्या प्रमाणात गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव झाला. अमरावती विभागाला याचा सर्वाधीक फटका बसला. राज्याच्या ३९ लाख हेक्‍टर लागवड क्षेत्रापैकी या वर्षी अमरावती विभागातील अकोला, वाशीम, बुलडाणा, यवतमाळ या पाच जिल्ह्यातील लागवड ९ लाख ९७ हजार हेक्‍टर आहे. त्यातील ७ लाख ७६ हजार हेक्‍टर क्षेत्र गुलाबी बोंड अळीने प्रभावीत झाल्याचा कृषी विभागाचा अहवाल आहे.

गुलाबी बोंड अळीग्रस्तांना कंपन्यांमार्फत हेक्‍टरी ३० हजार रुपयांच्या नुकसानभरपाईचे आदेश देण्यात आले आहेत; मात्र बीटी तंत्रज्ञानाचे हे अपयश असल्याचे सांगत त्यास कंपन्यांनी नकार दिला आहे. प्रयोगशाळेत तपासणी आणि बियाणे खराब असण्याविषयी कोणताच अहवाल नसताना नुकसानभरपाई देण्यास सांगितले जात असल्याने कंपन्यांकडून नाराजी व्यक्‍त करण्यात आली होती.

त्या पार्श्‍वभूमीवर अशाप्रकारचा निर्णय घेण्यात आल्याचे वृत्त आहे; परंतु बीटी जनुकांचा प्रभाव पानांमध्ये केवळ १२० दिवसच राहतो. त्यानंतर तो कमी कमी होत असल्याने कृषी विभागाचे हे प्रयत्न म्हणजे वरातीमागून घोडे या प्रकारातील असल्याची चर्चा रंगली आहे

नेमक्या कारणांचा शोध घेण्याची सूचना
बीटी जनुकांचा प्रभाव (एक्‍सप्रेशन) हा बियाण्यात सर्वांत कमी, फूल आणि पात्यामध्ये त्यापेक्षा थोडा अधिक, तर पानांमध्ये १२० दिवस राहतो आणि त्यानंतर हा प्रभाव कमी होत जातो, अशी माहिती तज्ज्ञांनी दिली. गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्याच्या नेमक्‍या कारणांची माहिती घेण्याकरिता केंद्र सरकारने राज्य सरकारला सूचना केली. त्यानुसार राज्य सरकारकडून जानेवारीत बीटी कापसाच्या हिरव्या पानांचे नमुने घेण्याचे आदेश कृषी विभागाच्या गुणवत्ता नियंत्रण शाखेला दिले गेले.

राज्यभरात अशाप्रकारे मोहीम राबविण्यात आली. अमरावती विभागात विविध कंपन्यांच्या कपाशी वाणांच्या पानांचे ४१० नमुने घेण्यात आहे. हे नमुने नागपुरातील दोन तसेच हैदराबाद येथील एका प्रयोगशाळेला पाठविण्यात आले आहे. त्यामध्ये नामांकीत कंपन्यांच्या बीटी झाडांच्या पानांचा समावेश असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

इतर अॅग्रो विशेष
भारत शेतीमध्ये जागतिक महासत्ता :...बारामती ः भारत हा शेतीच्या बाबतीत जगातील महासत्ता...
माॅन्सून अंदमानात; मंगळवारपर्यंत केरळातपुणे : नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) बंगालच्या...
जॉईंट अॅग्रेस्को : ‘कृषी’च्या मंथनाकडे...दापोली, जि. रत्नागिरी : शेतकऱ्यांच्या आत्महत्या...
मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाजपुणे ः पावसाला पोषक हवामान असल्याने कोकण,...
गोष्ट अश्‍वमेधाच्या डिजिटल घोड्यांचीनरेंद्र मोदी देशाच्या राजकारणात उतरले तेच मुळी...
छत्तीसगडच्या शेतकऱ्यांना सीताफळाने...सीताफळ शेतीत देशात अाघाडीवर महाराष्ट्राची भुरळ...
चला आटपाडीला देशी शेळी, माडग्याळी मेंढी...आटपाडी (जि. सांगली) येथील अोढा पात्रात दर शनिवारी...
विशेष संपादकीय : देशाच्या 'फिटनेस'चे...नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता...
मोदी सरकार चार वर्ष : अपेक्षा...गेल्या चार वर्षांत नरेंद्र मोदी सरकारला अनेक चढ-...
विवेकबुद्धी, स्वयंप्रेरणाच बनली धूसरमोदी सरकारच्या काळात हिंदुत्व आणि नरम हिंदुत्व...
माॅन्सून अंदमानात दाखल !!!पुणे : माॅन्सूनसाठी अंदमानाच्या दक्षिण भागात...
फेरवाटपातून वाढतोय जलसंघर्षमहाराष्ट्र देशी जलसंघर्षांच्या संख्येत व तीव्रतेत...
शेतकरी सक्षमतेचा ‘करार’भारतीय शेतकऱ्यांसमोर आजची सर्वांत मोठी अडचण कोणती...
शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी...दापोली, जि. रत्नागिरी : शेतकऱ्यांच्या...
‘त्या’ कृषी पर्यवेक्षकांना ‘मॅट’चा...अकोला ः अमरावती विभागीय कृषी सहसंचालकाकडून सन...
भुईमुगालाही हमीभाव मिळेनाअकोला ः या हंगामात लागवड झालेल्या भुईमुगाची काढणी...
जैन इरिगेशनला विदर्भातील सूक्ष्म सिंचन...जळगाव : जगातील अग्रगण्य सिंचन कंपनी जैन इरिगेशन...
कडधान्याचा पेरा वाढण्याची शक्यतानवी दिल्ली ः भारतीय हवामान खत्याने यंदा मॉन्सून...
माॅन्सून उद्या अंदमानातपुणे : माॅन्सूनसाठी अंदमानाच्या दक्षिण भागात...
ढगाळ हवामानामुळे पारा घसरला पुणे : मध्य महाराष्ट्राच्या उत्तर भागात व परिसरात...