‘नॅचरल गॅस’ योजनेवर भर

‘नॅचरल गॅस’ योजनेवर भर
‘नॅचरल गॅस’ योजनेवर भर

नाशिक: इंधन आयातीवर होणारा खर्च कमी करण्यासाठी केंद्र सरकारने नॅचरल गॅस देशभर पुरवठा करण्याची योजना तयार केली आहे. त्याअंतर्गत देशभरात पहिल्या टप्प्यात १७४ जिल्ह्यांची निवड केली असून, त्यात नाशिकचा समावेश आहे. राज्यात सात जिल्ह्यात हा पुरवठा केला जाणार आहे. घरगुती वापरासाठी नॅचरल गॅस (पीएनजी) व वाहनांसाठी कॉप्रेस्ड गॅस (सीएनजी) सर्वांसाठी पोचवण्याची ही योजना आहे. पेट्रोलिमय अॅण्ड नॅचरल गॅस ॲथाॅरिटी बोर्ड (पीएनजीआरबी) यांनी देशभरासाठी टेंडर काढले. त्यात राज्यातील सात जिल्ह्यांचे काम दोन कंपनीकडे गेले आहे. राज्यात महाराष्ट्र नॅचरल गॅस (एमएनजीएल) कंपनी नाशिक, धुळे व सिंधुदुर्ग येथे काम करणार आहे. तर भारत गॅस रिसोर्सेस लि. (बीजीआरएल) ही कंपनी औरंगाबाद, सांगली, सातारा, अहमदनगर जिल्ह्यांसाठी काम करणार आहे. राज्यात या दोन कंपनी सात जिल्ह्यात सुरुवातीला पायाभूत सुविधा उभारणार आहे. त्यात घरगुती वापरासाठी नॅचरल गॅस (पीएनजी) व वाहनांसाठी कॉप्रेस्ड गॅस (सीएनजी) यासाठी स्टेशन उभे केले जाणार आहे. महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनी व बीजीआरएल ही कंपनी यात अगोदरपासून काम करत आहे. पुढील आठ वर्षांमध्ये शहरात हे काम टप्प्याटप्प्याने केले जाणार आहे. त्यात ही कंपनी ३८ हजार किलोमीटर पाइपलाइन टाकणार आहे. तसेच तीन हजार ६२७ सीएनजी स्टेशन उभारण्याचे कामही केले जाणार आहे. तसेच १ कोटी ५३ लाख पीएनजी कनेक्शन ते या काळात देणार आहेत. ऑक्टोबर २०१९ पर्यंत या कंपनीला ४ हजार ९०० किलोमीटरची पाइपलाइन टाकावी लागणार आहे. त्यानंतर ऑक्टोबर २०१९ ते सप्टेंबर २०२० पर्यंत घरगुती १५ लाख ३० हजार कनेक्शन द्यावे लागणार आहे. तसेच ५३७ सीएनजी स्टेशनही त्यांना उभारण्याचे लक्ष्य देण्यात आले. अशा पद्धतीचे लक्ष्य दरवर्षी देण्यात आले असून ते आठ वर्षांमध्ये करायचे आहे. नैसर्गिक वायू नैसर्गिक वायू हा कच्च्या तेलाच्या परिसरात आढळतो. रंगहीन असलेला हा वायू-गंध विरहीत व पर्यावरणपूरक आहे. ९५ टक्के हायड्रो कार्बन व ८० मिथेन त्यात असते. उद्योजकांना माहितीचे सादरीकरण महाराष्ट्र नॅचरल गॅसने निमा येथे या प्रकल्पाची माहिती उद्योजकांना दिली. यावेळी नाशिकमध्ये घराघरात हा गॅस पुरवला जाणार असल्याचे कंपनीतर्फे सांगण्यात आले. दोन हजार कोटीपेक्षा जास्त खर्च या प्रकल्पाला लागणार असल्याचेही सांगण्यात आले. घराघरात, हॉटेलमध्ये व उद्योजकांना हा गॅस पाइपलाइनने पुरवला जाणार आहे. तर वाहनांसाठी स्टेशन उभारले जाणार आहे. कंपनीचे संचालक राजेश पांडे, महाव्यस्थापक मिलिंद नरहाशेट्टीवर यांनी ही माहिती दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com