agriculture news in marathi, central government permits sugar exports | Agrowon

वीस लाख टन साखर निर्यातीला परवानगी
सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 31 मार्च 2018

नवी दिल्ली ः देशातील साखरेचा अतिरिक्त साठा कमी करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने वीस लाख टन साखरेच्या निर्यातीला परवानगी दिली आहे. २०१७-१८ च्या बाजारवर्षासाठी ही परवानगी लागू राहणार आहे. यामुळे साखर कारखान्यांना भासत असलेली पैशाची चणचण दूर होईल आणि वर्तमान हंगामात ऊस उत्पादकांच्या थकबाक्‍या फेडण्यासही मदत होईल अशी अपेक्षा आहे.

या उपायाबरोबरच सरकारने करमुक्त कच्ची साखर आयात करून तिचे शुभ्र साखरेत रूपांतर करून तिची निर्यात करण्याच्या योजनेसही परवानगी दिलेली आहे. यासाठी सरकारने सप्टेंबर २०१८ पर्यंतची मुदत दिलेली आहे.

नवी दिल्ली ः देशातील साखरेचा अतिरिक्त साठा कमी करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने वीस लाख टन साखरेच्या निर्यातीला परवानगी दिली आहे. २०१७-१८ च्या बाजारवर्षासाठी ही परवानगी लागू राहणार आहे. यामुळे साखर कारखान्यांना भासत असलेली पैशाची चणचण दूर होईल आणि वर्तमान हंगामात ऊस उत्पादकांच्या थकबाक्‍या फेडण्यासही मदत होईल अशी अपेक्षा आहे.

या उपायाबरोबरच सरकारने करमुक्त कच्ची साखर आयात करून तिचे शुभ्र साखरेत रूपांतर करून तिची निर्यात करण्याच्या योजनेसही परवानगी दिलेली आहे. यासाठी सरकारने सप्टेंबर २०१८ पर्यंतची मुदत दिलेली आहे.

अन्न मंत्रालयातर्फे जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार निर्यातीसाठी वीस लाख टनाचा कोटा निश्‍चित करण्यात आला आहे. ‘मिनिमम इंडिकेटिव्ह एक्‍स्पोर्ट कोटा’ योजनेखाली चालू बाजार वर्षात साखरनिर्यातीला परवानगी देण्याचा निर्णय करण्यात आला आहे. 

१३,८९९ कोटी ऊस उत्पादकांची थकबाकी
२३४८ कोटी महाराष्ट्रातील थकबाकी
२७२ लाख टन साखरेचे अपेक्षित उत्पादन 
२५० लाख टन देशातील साखरेची मागणी

निर्णयाचे राष्ट्रीय सहकारी साखर संघाकडून स्वागत
साखर निर्यातीबाबत घेतलेल्या निर्णयामुळे साखर उद्योग व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे, अशा शब्दांत राष्ट्रीय सहकारी साखर संघाचे अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले. साखर उद्योगाला दिलासा देणाऱ्या अशाच आणखी निर्णयांची केंद्र सरकारकडून अपेक्षा असल्याचे वळसे-पाटील यांनी नमूद केले आहे. 

गेल्यावर्षी झालेल्या सर्वदूर समाधानकारक पर्जन्यवृष्टीमुळे व परतीच्या पावसामुळे उभ्या उसाचे वजन व साखरेचे प्रमाण वाढले. त्यामुळे हंगामापूर्वी केलेल्या २५१ लाख टन साखर उत्पादनाच्या अंदाजापेक्षा ४५-५० लाख टन अधिक साखर तयार झाली. हंगामाच्या सुरवातीला शिल्लक असलेली ४० लाख टन साखर आणि यंदा नव्याने तयार होणाऱ्या २९५-३०० लाख टन साखरेमुळे ३३५-३४० लाख टन साखर उपलब्ध होणार आहे. त्यातून स्थानिक बाजारातील २५५ लाख टनांचा साखरेचा खप वजा होता. यंदा हंगामअखेर ८०-८५ लाख टनांची शिल्लक राहणार आहे. केंद्र सरकारच्या अन्न व वाणिज्य मंत्रालयाचे लक्ष राष्ट्रीय सहकारी महासंघाने सर्वप्रथम वेधले व त्यानंतर ‘इस्मा’सह पाठपुरावा जारी ठेवून केंद्र शासनाकडून साखर निर्यातीबाबतचे हे दोन्ही महत्त्वपूर्ण निर्णय एकाच दिवशी मिळवण्यात यश प्राप्त केल्याचे अध्यक्ष वळसे-पाटील यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे म्हटले आहे. 

एप्रिल ते सप्टेंबर २०१८ दरम्यान करावयाच्या निर्यातीचा कारखानानिहाय कोटा व तो कोटा पूर्ण करणाऱ्या कारखान्यांना ऑक्टोबर २०१९ ते सप्टेंबर २०२१ दरम्यान शून्य टक्के आयात दराने कच्ची साखर आयातीचा परवाना देण्यात येणार आहे. सध्याच्या आंतरराष्ट्रीय बाजारातील दराने निर्यात करून तोटा होणार असला, तरी २० लाख टन साखर देशाबाहेर आहे. स्थानिक बाजारातील साखर दरातील वाढ व शुल्कविरहित आयातीद्वारे मिळणारा लाभ लक्षात घेता साखर कारखान्यांची आर्थिक घडी सुस्थितीत येणार आहे. तसेच, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना समाधानकारक ऊसदर देता येणार आहेत, असे महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे यांनी नमूद केले आहे.

इतर अॅग्रो विशेष
आज शिवजयंती : शिवनेरीवर पारंपारिक...पुणे : फाल्गुन वद्य तृतीया या तिथीनुसार आज (ता....
अतितीव्र हवामानस्थितीला कर्बाचे वाढते...पुणे : वातावरणातील कार्बनडाय ऑक्साईडचे (कर्ब)...
कमतरतेनुसार सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर...अलीकडे सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता अधिक...
पिंप्री गावाने कमावले लसूणघास शेतीत नाव पिंप्री (वळण) (ता. राहुरी, जि. नगर) हे गाव मुळा...
दुष्काळातही सुरती हुरड्याची  चवच काही...औरंगाबाद जिल्ह्यातील सारंगपूर येथील अरुण कडूबाळ...
। तुका म्हणे कान्हा । भूक लागली नयनां ।।देहू : तुकाराम तुकाराम...असा नामघोष आणि...
नांदेड जिल्ह्यात कापूस उत्पादकता...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात २०१८-१९ च्या खरीप...
नगरची लढत राहणार लक्षवेधीनगर : राज्याच्या सर्वाधिक लक्ष असलेल्या नगर (...
रब्बी पीकविम्याला बोगस प्रकरणांचे ग्रहणमुंबई ः २०१८-१९ च्या रब्बी हंगामात पंतप्रधान...
सहा कारखान्यांची धुराडी थंडावलीऔरंगाबाद  : मराठवाडा व खानदेशातील पाच...
बेदाण्याला दराची गोडीसांगली ः होळी सणाच्या पार्श्वभूमीवर बेदाण्याची...
आनंदाचा उतरता आलेखजगभरातील आनंदी देशांचा अहवाल (वर्ल्ड हॅपीनेस...
आदित्यात् जायते वृष्टि:जगात एकूण १९५ देश आहेत, पण आकार, आर्थिक स्थिती,...
आज संत तुकाराम बीजदेहू, जि. पुणे  : जगद्‌गुरू संत श्री तुकाराम...
उज्ज्वल भविष्याचा सर्वोत्तम मार्ग ‘जल...भारत जलसंकट समस्येचा सामना करत आहे. वाढती...
जल‘मुक्त’ शिवारवॉ टर ग्रीडच्या माध्यमातून मराठवाड्यातील सर्व...
राज्यात शंभर लाख टन साखर उत्पादनभवानीनगर, जि. पुणे ः राज्यात ३० टक्के हुमणीग्रस्त...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अवकाळीची...पुणे : रविवारी, सोमवारी पुन्हा काही अंशी...
जैविक कीड-नियंत्रणासाठी उपयुक्त बुरशीगेल्या काही वर्षांमध्ये कीडनियंत्रणासाठी...
केशर आंबा फळगळीची कारणे अन् उपाययोजना  सद्यःस्थितीत हवामान आंबा झाडांसाठी...