agriculture news in marathi, central minister Sudarshan Bhagats says its collective responsibility to increases agriculture output | Agrowon

कृषी उत्पादनवाढीची जबाबदारी सर्वांची : केंद्रीय मंत्री सुदर्शन भगत
टीम अॅग्रोवन
बुधवार, 14 फेब्रुवारी 2018

कोल्हापूर : भारतीय अर्थ व्यवस्थेचा कणा असलेल्या शेतकरी वर्गाच्या सर्वांगीण विकासातच देशाची प्रगती अवलंबून आहे . त्यासाठीच येत्या २०२२ सालापर्यंत अर्थात देश स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षी शेतकरी राजाचे उत्पन्न दुप्पट होण्यासाठी सर्वांच्या योगदानाची गरज आहे असे मत आदिवासी कौशल्य विकास विभागाचे केंद्रीय मंत्री सुदर्शन भगत यांनी व्यक्त केले. 

कोल्हापूर : भारतीय अर्थ व्यवस्थेचा कणा असलेल्या शेतकरी वर्गाच्या सर्वांगीण विकासातच देशाची प्रगती अवलंबून आहे . त्यासाठीच येत्या २०२२ सालापर्यंत अर्थात देश स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षी शेतकरी राजाचे उत्पन्न दुप्पट होण्यासाठी सर्वांच्या योगदानाची गरज आहे असे मत आदिवासी कौशल्य विकास विभागाचे केंद्रीय मंत्री सुदर्शन भगत यांनी व्यक्त केले. 

कणेरी येथे सुरू असलेल्या सिद्धगिरी कारागीर महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. मंगळवारी पहाटे साडेपाच वाजता काकड आरती व विधिवत पूजनाने सोहळ्यास प्रारंभ झाला. या वेळी केंद्रीय मंत्री श्री. भगत, काडसिद्धेश्‍वर स्वामी, स्वामी विद्नान्दजींसह मान्यवर उपस्थित होते. केंद्रीय मंत्री श्री. भगत कार्यकर्त्या समावेत सिद्धगिरी कारागीर महोत्सवाच्या प्रदर्शनात आले. तेथे त्यांनी कलाकारांनी निर्माण केलेल्या विविध कलात्मक वस्तूंच्या निर्मितीची माहिती घेतली.

शेती व ग्रामीण परंपरागत उद्योगाकडे झालेले दुर्लक्ष हे फार चिंतनीय आहे, ही चूक वेळीच सुधारली पाहिजे. आश्रमशाळा संस्कृतीमधूनच आपण आदिवासी युवक ते केंद्रीय मंत्री अशी प्रगती केल्याचे सागत त्यांनी वाल्मीकी आणि शबरी माता असे आदिवासी युवक-युवतींसाठी आश्रमशाळा सुरू करत असल्याचेही त्यांनी घोषित केले.

 या वेळी विजय कदम, मुक्ता दाभोलकर, विवेक सिद्ध, डॉ. सौ व श्री. चंद्रशेखर, रूपाश्री सिद्धापुरे, डॉ. दत्ता निकम, डॉ. सचिन पाटील यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी माजी मंत्री अण्णा डांगे, एसबीआयचे राजेश आयदे, समन्वयक बसंतकुमारसिंह यांच्या सहमान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्र गोव्यासह कर्नाटकातून आलेल्या लाखो भाविकांची रात्री उशिरापर्यंत गर्दी होती.

इतर ताज्या घडामोडी
शेतकऱ्याने तयार केली डिझेलवरची बाईकसांगली : वाढत्या पेट्रोलच्या सुटकेसाठी...
शेतकऱ्यांना फसविणारे विक्रेते,...सोलापूर : शेतकरी केंद्रबिंदू मानून...
धुळे जिल्ह्यात पूर्वहंगामी कापूस...धुळे : जिल्ह्यात पूर्वहंगामी कापूस लागवडीची...
जळगाव जिल्ह्यात खरिपासाठी मुबलक खतेजळगाव : जिल्ह्यात आगामी खरिपासाठी शेतकऱ्यांची...
सोलापुरात गाजर, काकडीचे दर वधारले,...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
कारखान्यांनी थकीत `एफआरपी' त्वरीत...सोलापूर : जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी थकवलेले...
हमीभाव खरेदी बंद होताच तुरीचे दर झाले...नागपूर ः शासनाची हमीभाव खरेदी बंद होताच तुरीचे दर...
नगरला गव्हाला १६४१ ते १८५० रुपये...नगर : नगर बाजार समितीत गव्हाची आवक बऱ्यापैकी होत...
नाशिकला आंबा, खरबूज, कलिंगड तेजीतनाशिक : वाढत्या उन्हाबरोबरच नाशिक बाजार समितीत...
कासवाच्या लिंगनिर्धारणामागील जनुकीय...गेल्या ५० वर्षांपासून अंडी उबण्याच्या...
सातारा जिल्ह्यात पाणीटंचाई वाढलीसातारा  : जिल्ह्यात पाणीटंचाईच्या झळा वाढू...
अग्रणी नदी पुन्हा अतिक्रमणाच्या विळख्यातसांगली : तासगाव, कवठेमहांकाळ तालुक्‍यांतील अग्रणी...
पुण्यातील डाळिंब, पेरू, चिकू बागांना...पुणे  : जिल्ह्यातील मृग बहारातील डाळिंब,...
इंदापुरातील नीराकाठची पिके जळण्याच्या...वालचंदनगर, जि. पुणे  ः इंदापूर तालुक्‍यातील...
नगर जिल्ह्यात ‘कृषी’च्या कामांवरच ‘...नगर  ः जलयुक्त शिवार अभियानाची कामे...
विषबाधा बळीप्रकरणी पावणेदोन कोटींची मदतअकोला : कीटकनाशक फवारणी करताना विषबाधा होऊन मृत...
हिंगोलीतील १०३ गावांची ‘जलयुक्त शिवार’...हिंगोली : जलयुक्त शिवार अभियानाच्या चौथ्या...
विधान परिषदेच्या ६ जागांसाठी उत्साहात...मुंबई ः स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान...
सैन्य दलात अधिकारी होण्याची संधीमुंबई : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलात...
कर्नाटक: कामगारांच्या पत्राशेडमध्ये...विजयपूर : नुकतेच कर्नाटकात विधानसभेची निवडणुका...