agriculture news in marathi, central minster prabhu assures all initiative will take for gram rate, Maharashtra | Agrowon

हरभऱ्याच्या किमतीत सुधारणांसाठी सर्व पर्याय वापरू : केंद्रीय मंत्री प्रभू
टीम अॅग्रोवन
शनिवार, 24 फेब्रुवारी 2018

हरभरा उत्पादनात यंदा ४० टक्के वाढ आहे. याकरिता हमीभाव केंद्र सुरू होणार आहेत, मात्र निर्यातीलाही प्रोत्साहन देण्याची गरज आहे. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय कृषी राज्यमंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी केंद्रीय वाणिज्यमंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे पत्र दिले आहेत. आम्हीही या संदर्भातील निवेदन श्री. प्रभू यांना दिले. याबाबत निर्णय घेऊन शेतकऱ्यांना दिलासा देऊ, असे त्यांनी आश्‍वासित केले आहे. शेतकऱ्यांनीही टप्प्या-टप्प्याने हरभरा बाजारात आणावा, गडबड करू नये.
- पाशा पटेल, अध्यक्ष, राज्य कृषिमूल्य आयोग.

नवी दिल्ली : हरभऱ्याच्या घसरत्या किमती रोखण्यासाठी केंद्र सरकार सर्व पर्याय वापरेल, याकरिता निर्यातीलाही विशेष प्रोत्साहन दिले जाईल, अशी ग्वाही केंद्रीय वाणिज्यमंत्री सुरेश प्रभू यांनी येथे दिली.

राज्य कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी केंद्रीय मंत्री श्री. प्रभू यांची नुकतीच (ता. २२) भेट घेऊन त्यांना हरभरा निर्यातीसाठी विशेष प्रोत्साहन देण्याची मागणी केली. यास मंत्री श्री. प्रभू यांनी तत्काळ प्रतिसाद देत लवकरात लवकर याकरिता केंद्रीय पातळीवरील सर्व पर्याय वापरण्याचे आश्‍वासन श्री. पटेल यांना दिले. देशभरातील ९ राज्यांत हरभरा लागवड क्षेत्र आणि उत्पादनातही ४० वाढ होण्याचे आणि दोन वर्षे पुरेल एवढे उत्पादन होणार असल्याने तत्काळ उपाययोजनांची मागणी केली. व्यापाऱ्यांनीही यापूर्वी हरभरा आयातही करून ठेवल्याने दर हमीभावाच्या खाली आहे, याची माहिती दिली.

हरभरा उत्पादनवाढीचा अंदाज असल्याने केंद्र सरकारने यापूर्वी २००६ नंतर पहिल्यांदाच हरभऱ्यावरील निर्यात बंदी हटविली आणि आयातीवर ४० टक्क शुल्क लावले, तसेच हरभऱ्याच्या देशांतर्गत दरावर परिणाम करणाऱ्या वाटाण्यावरही ५० टक्के आयात शुल्क लावले, मात्र हरभरा दर हमीभावाच्या खालीच आहेत. यंदा ४४०० रुपये प्रतिक्विंटल हरभऱ्यास हमीभाव आहे, मात्र बाजारातील दर ३६००च्या खाली आहेत. दुसरीकडे राज्य सरकारनेही हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्याची केंद्राकडे मागणी केली आहे.

ज्याप्रमाणे सरकार हमीभावाने हरभरा खरेदी करणार आहे, त्याचप्रमाणे निर्यातीलाही प्रोत्साहन दिल्यास देशांतर्गत हरभरा दरात सुधारणा होण्याची आशा आहे. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात ३६०० रुपये क्विंटलपर्यंत दर आहेत, हमीभाव ४४०० रुपये आहे, अशा वेळी ८०० रुपये फरक आणि ४०० रुपये खर्च मिळून निर्यात प्रोत्साहन मूल्य दिल्यास स्थानिक बाजारात हमीभावापेक्षही पुढे दर जाण्याची शक्यता असल्याचा विश्‍वास श्री. पटेल यांनी या वेळी व्यक्त केला. याप्रसंगी फळबाग तज्ज्ञ डॉ. भगवानराव कापसे उपस्थित होते.

‘‘हरभरा उत्पादनात यंदा ४० टक्के वाढ आहे. परिणामी, केंद्र सरकारकडून पर्यायी उपाय करूनही दरात सुधारणा होत नाही. याकरिता हमीभाव केंद्र सुरू होणार आहेत, मात्र निर्यातीलाही प्रोत्साहन देण्याची गरज आहे. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय कृषी राज्यमंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी केंद्रीय वाणिज्यमंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे पत्र दिले आहेत. आम्हीही या संदर्भातील निवेदन श्री. प्रभू यांना दिले. याबाबत निर्णय घेऊन शेतकऱ्यांना दिलासा देऊ, असे आश्‍वासित केले आहे. शेतकऱ्यांनीही टप्प्या-टप्प्याने हरभरा बाजारात आणावा, गडबड करू नये.’’
- पाशा पटेल, अध्यक्ष, राज्य कृषिमूल्य आयोग.

इतर अॅग्रो विशेष
प्राणघातक हृदयरोगाचे प्रमाण होतेय कमीगेल्या दोन वर्षामध्ये हृदयरोगाला प्रतिबंध आणि...
अन्नत्याग आंदोलनास प्रारंभ : अमर हबीब,...नवी दिल्ली : शेतकरी आत्महत्यांप्रती सहवेदना आणि...
मच्छीमारी व्यवसायाने आणली समृद्धीगणित विषयात पदवी असूनही बेरोजगार राहणं नशिबी आलं...
काबुली हरभऱ्याने उंचावले अर्थकारण चोपडा तालुक्‍यातील (जि. जळगाव) तापी व अनेर...
जत तालुक्यात द्राक्ष, डाळिंब बागा...सांगली : जत तालुक्यात पश्‍चिम भाग वगळता...
प्रकल्प व्यवस्थापकावर कारवाईचे आदेशपुणे : एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन...
सहवेदना :आज अन्नत्याग आंदोलनयवतमाळ: शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रति...
उन्हाची काहिली वाढलीपुणे: राज्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाची...
राजकीय उपद्रव्य मूल्य घटल्याने...मुंबई: मर्यादित जनाधार आणि राजकीय उपद्रव मूल्य...
सोलापूर जिल्ह्यातील सर्व गावांची...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील सर्वच ११४५...
विदेश अभ्यास दौऱ्याच्या शेतकरी यादीत...पुणे : विदेश अभ्यास दौऱ्यासाठी निवड केलेल्या...
क्रांती कारखाना हुमणीचे भुंगेरे खरेदी...कुंडल, जि. सांगली : एकात्मिक हुमणी कीड नियंत्रण...
तेजस्विनीच्या साथीने बचतीतून...तेजस्विनी लोकसंचालित साधन केंद्राच्या...
परवानाधारक व्यापाऱ्यांनीच केळीची खरेदी...जळगाव : चोपडा बाजार समिती दरवर्षी १४...
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर...पणजी : देशाचे माजी संरक्षणमंत्री व गोव्याचे...
आडातच नाही तर पोहऱ्यात येणार कोठून? दुष्काळ पडल्याने पाण्यासाठी बोअर घेण्याची अक्षरशा...
कृषी पर्यवेक्षकांना पदोन्नती मिळाली, पण...पुणे : राज्यातील कृषी पर्यवेक्षकांना शासनाने मंडळ...
दुष्काळी मराठवाड्यात मार्चमध्येच ‘केसर'...केज, जि. बीड ः फळांचा राजा आंबा बाजारात...
मिरची पीक अंतिम टप्प्यातनंदुरबार (प्रतिनिधी) ः खानदेशातील मिरचीचे आगार...
सुधारित जोडओळ पद्धतीमुळे कपाशीतून...सोगोडा (जि. बुलढाणा) येथील विजय पातळे या कपाशी...