agriculture news in Marathi, central state agri minister says gram procurement will start soon in Maharashtra, Maharashtra | Agrowon

हमीभावाने हरभरा खरेदी लवकरच : कृषी राज्यमंत्री शेखावत
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 23 फेब्रुवारी 2018

नवी दिल्ली : हरभऱ्याचे यंदा उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. दरातील मंदी हटविण्यासाठी सरकार लवकरच महाराष्ट्र राज्यात हरभरा खेरदी सुरू करणार आहे, अशी माहिती केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण राज्यमंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी दिली. 

नवी दिल्ली : हरभऱ्याचे यंदा उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. दरातील मंदी हटविण्यासाठी सरकार लवकरच महाराष्ट्र राज्यात हरभरा खेरदी सुरू करणार आहे, अशी माहिती केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण राज्यमंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी दिली. 

राज्यमंत्री शेखावत म्हणाले, की मागील वर्षी देशांतर्गत हरभरा उत्पादन कमी झाले होते. परिणामी बाजारात हरभरा दर मोठ्या प्रमाणात वाढले होते. मागील वर्षी दर वाढल्याने शेतकऱ्यांचा ओढा यंदा हरभरा लागवडीकडे राहिला आहे. तसेच देशात मॉन्सून परतीच्या प्रवासात बराच काळ रेंगाळल्याने ज्या भागात खरीप पिके आली नव्हती, त्या भागात शेतकऱ्यांनी हरभरा पेरणीला प्राधान्य दिले आहे. यंदा देशातील जवळपास ९ राज्यांमध्ये १०३.०९ लाख हेक्टरवर हरभरा पेरणी झाली आहे. सरकारने शेतकऱ्यांना निमकोटेड युरिया आणि दर्जेदार बियाणे उपलब्ध करून दिले आहेत. सध्या काही प्रमाणात हरभरा पिकाची काढणी झाली असून, त्याची बाजारात विक्रिसुद्धा होत आहे. 

‘‘शेतकऱ्यांना हमीभाव मिळावा यासाठी सरकारने वाटाणा आयातीवर ५० टक्के शुल्क लावले होते. तसेच २००६ पासून भारतातून हरभरा निर्यात बंद होती आणि आयात शुल्क शून्य होते, जे सरकारने नुकतेच ४० टक्क्यांपर्यंत वाढविले आहे. तरीही हरभरा हमीभावाने विकला जात नाही. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरील किमतीशी स्पर्धा करण्यासाठी सरकार निर्यात अनुदान देण्याच्या विचारात आहे. जेणेकरून शेतकऱ्यांना हमीभावाचा लाभ मिळेल,’’ असेही ते म्हणाले. 

महाराष्ट्र राज्य कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी केंद्रीय कृषी राज्यमंत्री शेखावत यांना भेटून निवेदन दिले. मागील वर्षी महाराष्ट्रात १३ लाख हेक्टरवर हरभरा पेरणी झाली होती, ती यंदा २० लाख हेक्टरवर झाली आहे आणि हरभरा बाजारात येण्यास सुरवात झाली आहे. त्यामुळे तातडीने हमीभावाने हरभरा खेरदी सुरू करावी, अशी मागणी त्यांनी निवेदनात केली.  

केंद्रीय कृषी राज्यमंत्री शेखावत यांनी लवकरच महाराष्ट्रात हमीभावाने हरभरा खरेदी सुरू करणार असल्याचे अाश्वासन श्री. पटेल यांना दिले आहे. तसेच निर्यात अनुदानासाठी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्याशी चर्चा करणार असल्याचेही सांगितले.  

इतर अॅग्रो विशेष
आज संत तुकाराम बीजदेहू, जि. पुणे  : जगद्‌गुरू संत श्री तुकाराम...
उज्ज्वल भविष्याचा सर्वोत्तम मार्ग ‘जल...भारत जलसंकट समस्येचा सामना करत आहे. वाढती...
जल‘मुक्त’ शिवारवॉ टर ग्रीडच्या माध्यमातून मराठवाड्यातील सर्व...
राज्यात शंभर लाख टन साखर उत्पादनभवानीनगर, जि. पुणे ः राज्यात ३० टक्के हुमणीग्रस्त...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अवकाळीची...पुणे : रविवारी, सोमवारी पुन्हा काही अंशी...
जैविक कीड-नियंत्रणासाठी उपयुक्त बुरशीगेल्या काही वर्षांमध्ये कीडनियंत्रणासाठी...
केशर आंबा फळगळीची कारणे अन् उपाययोजना  सद्यःस्थितीत हवामान आंबा झाडांसाठी...
रसदार उन्हाळी काकडी अर्थकारणाला देतेय...जळगाव जिल्ह्यात पाचोरा, जामनेर, यावल, जळगाव आदी...
बॅंक अधिकारी झाला पूर्णवेळ प्रयोगशील...विशाखापट्टण व त्यानंतर हैद्रराबाद येथे खासगी...
स्मार्ट प्रकल्पाचा केंद्रबिंदू शेतमाल ‘...पुणे : राज्यातील बहुतेक शेतकऱ्यांना आता पिकवायचे...
पूर्व विदर्भात गारपीटपुणे  ः दोन दिवसांपूर्वी मध्य भारतात तयार...
जनावराच्या आहारात पाणी महत्त्वाचेजनावरांचे योग्य पोषण होण्यासाठी तसेच दुग्धोत्पादन...
राज्यात १७८ तालुक्यांत भूजल चिंताजनकपुणे ः कमी झालेला पाऊस, वाढत असलेला पाण्याचा उपसा...
दरामुळे साखरेचा रंग फिकाकोल्हापूर : साखरेचे विक्री मूल्य वाढविल्यानंतरही...
‘उजनी’तील पाणीसाठा उणे पातळीत सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी...
राज्यभरात अन्नत्याग आंदोलनमुंबई ः शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रती...
मार्चनंतरही पणन करणार कापूस बाजारात...यवतमाळ ः शेतकऱ्यांच्या घरातील कापूस विकल्या...
मढी यात्रेला बुधवारपासून प्रारंभनगर ः होळीच्या दिवशी सकाळी कानिफनाथांच्या समाधीला...
दर्जेदार ऊसबेण्याची केली निर्मिती काशीळ (ता. जि. सातारा) येथील उच्चशिक्षित व...
मतदानासाठी सकाळी सात ते सायंकाळी...अकोला ः देशात होत असलेल्या लोकसभा...