कीटकनाशक फवारणी प्रकरण
कीटकनाशक फवारणी प्रकरण

यवतमाळ जिल्ह्यात केंद्रीय पथकाकडून भेटीगाठी

यवतमाळ : कीटकनाशक फवारणीतून विषबाधा प्रकरणी विविध चौकशी समित्यांमार्फत चौकशी सुरू असून, आता केंद्र शासनाच्या केंद्रीय पीक संरक्षण विभागाची (डिपाटर्मेंट ऑफ प्लान्ट प्रोटेक्‍शन) चमू जिल्ह्यात दाखल झाला आहे. रविवारी (ता.८ ) आणि सोमवारी (ता. ९) समितीने काही गावांना भेटी दिल्या असून बाधित कुटुंबीयांशी पथकाने संवाद साधला.

जिल्ह्यात फवारणीतून विषबाधा झाल्याने ५६० वर शेतकरी, शेतमजूर बाधित झाले आहेत. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी अपर सचिव (गृह) नुकतेच जिल्ह्यात येऊन गेलेत. त्यानंतर ही जिल्हास्तरावर विविध समित्यांमार्फत वेगवेगळ्या प्रकरणांची चौकशी सुरू आहे. अशातच आता चार सदस्यीय केंद्रीय पथक जिल्ह्यात दाखल झाले आहेत. रविवारी केळापूर तालुक्‍यातील पहापळ व टेंभी या ठिकाणी पथकातील सदस्य डॉ. देशकर, डॉ. ठाकरे यांच्यासह दोन अधिकाऱ्यांनी भेट दिली. पहापळ येथे विठ्ठल पेरकेवार, टेंभी प्रदीप सोयाम यांच्या फवारणीतून विषबाधा झाल्याने मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबीयांशी समिती पथकाने संवाद साधला.

विशेष म्हणजे, कृषी विभागाच्या स्थानिक अधिकाऱ्यांकडून प्राथमिक माहिती घेतली. त्यानंतर शेतकऱ्यांचे घर विचारून त्यांना चौकशीवेळी थोडे बाजूलाच ठेवण्यात आले. केंद्राचे अधिकारी जिल्ह्यात आल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहे. चारसदस्यीय पथक आणखी काही दिवस जिल्ह्यात मुक्कामी असून, शेतकऱ्यांच्या बांधावर भेटी देणार असल्याची माहिती आहे.

उपचारात हवा नवीन तंत्रज्ञानाचा वापर मुंबई येथील विषशास्त्र विभागाच्या डॉ. कीर्ती पवार यांनी रविवारी (ता. ८) वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालयातील प्रशासकीय इमारतीत जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकारी यांना मार्गदर्शन केले. उपचारादरम्यान अजूनही जुन्याच पद्धतीने उपचार केले जात आहेत. मात्र, आता तंत्रज्ञानाचा वापर करून उपचार करायला हवेत, असे त्यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com