agriculture news in marathi, centrals squad visit drought pron parali, Bid | Agrowon

कपाशीच्या झाडाला यंदा पाचच बोंड लागले, साहेब...
सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 डिसेंबर 2018

बीड : सतचा दुष्काळ आणि बोंडआळीने नेहमीच शेती पिकांचे नुकसान होत आहे, यंदा तर कपाशीच्या झाडाला पाचच बोंड लागले आहेत. दोन एकरांत ५० हजारांचा खर्च झाला आणि उत्पन्न तर दहा हजार रुपयेही आले नाही, अशा व्यथा मांडत मागच्या वर्षी एका शेतकऱ्याने आत्महत्या केली होती, यंदा किती शेतकरी करतील हे सांगता येत नाही अशी भितीच सरपंच मनोहर केदार यांनी पथकासमोर व्यक्त केली. प्रशासन मागे असल्याची पुष्टीही त्यांनी जोडली.

बीड : सतचा दुष्काळ आणि बोंडआळीने नेहमीच शेती पिकांचे नुकसान होत आहे, यंदा तर कपाशीच्या झाडाला पाचच बोंड लागले आहेत. दोन एकरांत ५० हजारांचा खर्च झाला आणि उत्पन्न तर दहा हजार रुपयेही आले नाही, अशा व्यथा मांडत मागच्या वर्षी एका शेतकऱ्याने आत्महत्या केली होती, यंदा किती शेतकरी करतील हे सांगता येत नाही अशी भितीच सरपंच मनोहर केदार यांनी पथकासमोर व्यक्त केली. प्रशासन मागे असल्याची पुष्टीही त्यांनी जोडली.

जिल्ह्यातील दुष्काळाची वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी तीन सदस्यीय केंद्रीय पथक गुरुवारी (ता. 6) जिल्ह्यात आले. दुपार नंतर रेवली (ता. परळी) येथे पाहणीदरम्यान शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी शेतकरी चंद्रकांत कांदे यांनी शेतीपिकांचे नुकसान आणि दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे होणारे हाल व्यथित केले. तर, सरपंच मनोहर केदार यांनी दुष्काळामुळे किती आत्महत्या होतील हे सांगता येत नाही अशी भीती व्यक्त केली.

रेवलीतील शेतकऱ्यांबरोबर केंद्रीय पथकाचा संवाद (video)

गावातील पाणी योजना बंद असून प्यायला पाणी नाही असे सांगत टँकरचा प्रस्ताव पाठविल्याचे केदार म्हणाले. यावर जिल्हाधिकारी एम. देवेंद्र सिंह यांनी दोन दिवसांत प्रस्ताव मंजूर करु, असे सांगीतले. निती आयोगाचे सह सल्लागार मनिश चौधरी, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्रालयाचे वरिष्ठ सल्लागार एस. सी. शर्मा, ग्रामीण विकास विभागाचे एस. एन. मिश्रा यांचा पथकात समावेश होता. पथकासमवेत राज्याचे कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले, कृषी आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर, मदत व पुनर्वसन विभागाचे उपसचिव सुभाष उमराणीकर एमसॅकचे श्री. रांजणकर होते. यावेळी जिल्हाधिकारी एम. देवेंद्र सिंह यांनी दुष्काळी स्थितीची माहिती दिली. 

दरम्यान, पथकाच्या दौऱ्यात चार गावांत पाहणी होती. यामध्ये रेवली (ता. परळी) नंतर खडकी (ता. वडवणी) गावाचा समावेश होता. त्यानंतर पथक बीड तालुक्यात येणार होते. मात्र, खडकी रद्द करुन पथकाने परळीत जाऊन वैद्यनाथाचे दर्शन घेतले. यानंतर पथक जरुडला पोचले. जरुडनंतर असलेले कांबी गावही रद्द केले.

इतर ताज्या घडामोडी
जळगावात दादरला ३१०० रुपयांपर्यंत दरजळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दादरची (...
भारतीयांच्या पचनसंस्थेतील...भारतीय लोकांच्या पचनसंस्थेमध्ये कार्यरत...
अमरावती विभागाला पाणीटंचाईच्या झळाबुलडाणा : कमी पावसामुळे अमरावती विभागातील...
तूर विक्रीच्या नोंदणीकडे शेतकऱ्यांची...अकोला  : या हंगामात शेतकऱ्यांनी पिकविलेल्या...
शेतकरी, जवान अडचणीत : भुजबळनाशिक : सध्याच्या सरकारच्या काळात देशातील...
दुष्काळात खचू नका, शासन पाठीशी :...सोलापूर : दुष्काळी परिस्थितीमुळे पाणी,...
शेतकऱ्यांच्‍या थकवलेल्या पैशांची...पुणे ः शेतीमालाचा लिलाव झाल्यानंतर २४ तासांत पैसे...
नगर जिल्हा परिषदेचा यंदा ४४ कोटी...नगर : जिल्हा परिषदेत सोमवारी झालेल्या सर्वसाधारण...
नांदेड परिमंडळात सौर कृषिपंप योजनेसाठी...नांदेड ः मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेअंतर्गत...
शेतीमाल तारण योजनेत ४०६ शेतकऱ्यांनी...औरंगाबाद : मराठवाड्यातील जालना, परभणी व हिंगोली...
ऊस उत्पादक शेतकरी देणार शहिदांच्या...कोल्हापूर : पुलवामा जिल्ह्यातील दहशतवादी हल्ल्यात...
तूर खरेदीतील अनागोंदीविरुद्ध आंदोलनअकोला  ः जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यात...
'पुलवामा'चा सूत्रधार काश्‍मीरमध्येच?नवी दिल्ली : पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याचा...
उन्हाळी पिकातील खतांचे व्यवस्थापनउन्हाळी हंगामात प्रामुख्याने भुईमूग, सूर्यफूल,...
केम प्रकल्पाला लागली भ्रष्टाचाराची वाळवीअमरावती : अंमलबजावणीपेक्षा गैरव्यवहार व...
‘पेंच’ लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना १३...नागपूर : मध्य प्रदेशातील चौराई प्रकल्पामुळे पेंच...
‘एसटी’साठी जागा आठ हजार अन्‌ अर्ज ४१...सोलापूर : राज्य परिवहन महामंडळात चालक व...
दररोजचा दोनशे टन द्राक्षपुरवठा ठप्पपिंपळगाव बसवंत, जि. नाशिक : जम्मू-काश्‍...
'देशात आयात होणाऱ्या सोयाबीनवर बंदी...पुणे : देशांतर्गत दर वाढत असल्याने...
बांबू उत्पादन, गुंतवणूक संधीसाठी...मुंबई : देशातील बांबू लागवडीला चालना देण्याबरोबरच...