हमीभाव जाहीर : कापसात ११३०; तर सोयाबीनमध्ये ३४९ने वाढ

हमीभाव जाहीर : कापसात ११३०; तर सोयाबीनमध्ये ३४९ने वाढ
हमीभाव जाहीर : कापसात ११३०; तर सोयाबीनमध्ये ३४९ने वाढ

नवी दिल्ली : शेतकऱ्यांना दीडपट हमीभावाचा दावा करत केंद्रीय मंत्रिमंडळाने खरीप २०१९ करिताच्या हमीभाव आज (ता.४) जाहीर केले. यात सर्वाधिक वाढ ही कारळात १८२७, मूगात १४००, सुर्यफूलात १२८८ आणि कापसात ११३० रुपयांपर्यंत वाढ करण्यात अाली. सोयाबीनमध्ये ३४९ रुपये वाढ करण्यात आल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी दिली. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या अर्थविषयक समितीची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज (ता.४) झालेल्या बैंठकीत हमीभाव जाहीर करण्यात आले. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत खरिपातील १४ पिकांच्या हमीभावात केंद्रीय कृषी मुल्य आयोगाने काढलेल्या उत्पादन खर्चाच्या तुलनेत ५० टक्के वाढ करण्यात आल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री सिंह यांनी दिली. यावेळी केंद्रीय कृषिमंत्री राधामोहनसिंह, केंद्रीय अन्न प्रक्रिया हरसिमत कौर बादल अादी उपस्थित होते. माजी पंतप्रधान अटबिहारी वाजपेयी यांच्यानंतर पहिल्यांदाच हमीभावात एेतिहासिक वाढ करण्यात आल्याची माहिती गृहमंत्री सिंह यांनी दिली. सिंह म्हणाले, की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या बैठकीत देशातील शेतकऱ्यांसाठी एेतिहासिक निर्णय घेण्यात अाला. देशातील सर्वात मोठा उत्पादक, उपभोक्ता आणि ग्राहक असलेल्या शेतकऱ्यांस स्वातंत्रयानंतर कधीही आपल्या उत्पादनात वाजवी किंमत मिळाली नाही. स्वाभाविकपणे शेतकऱ्यांना याबाबत प्रचंड नाराजी होती. याबाबत पंतप्रधान मोदी यांनी मागील अर्थसंकल्पातच शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या तुलनेत दीडपट हमीभावाबाबत आश्‍वासन दिले होते. याशिवाय २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचेही पंतप्रधानांनी जाहीर केले होते, त्याच दिशेने आजच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात अाला. दीडपट हमीभाव धरताना सर्व प्रकाराच्या श्रमामुळे येणारा खर्चही धरण्यात अाला आहे. या निर्णयामुळे केंद्र सरकारच्या तिजोरीवर १५ हजार कोटी रुपये अधिक भार पडणार आहे.’’  

खरिप २०१८-१९ करिताचे १४ पिकांचे हमीभाव (क्विंटलचे रुपयात) 

 
पीक  २०१७-१८ यंदाची वाढ २०१८-१९
भात  १५५० २०० १७५०
भात (ग्रेड ए) १५९० १८० १७७०
ज्वारी (संकरीत)  १७०० ७३० २४३०
ज्वारी (मालदांडी) १७२५ ७२५ २४५०
बाजरी १४२५ ५२५ १९५०
मका १४२५ २७५ १७००
नाचणी १९०० ९९७ २८९७
तूर ५२५० २२५ ५६७५
मूग ५३७५ १४०० ६९७५
उडीद ५२०० ४०० ५६००
कापूस (मध्यम धागा) ४०२० ११३० ५१५०
कापूस (लांब धागा) ४३२० ११३० ५४५०
भूईमूग ४२५० ४४० ४८९०
सुर्यफूल ४००० १२८८ ५३८८
सोयाबीन २८५० ३४९ ३३९९
तीळ ५२०० ९४९ ६२४९
कारळ ३९५० १८२७ ५८७७

शेतकऱ्यांची अनेक वर्षापासून मागणी होती उत्पादन खर्चाच्या दिडपट हमीभाव मिळावा, ती केंद्र सरकारने आज मान्य केली, केंद्र सरकारचे आभार, क्रांतिकारी निर्णय, हे शेतकरी हिताचे सरकार आहे, - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com