Agriculture News in Marathi, Centre has introduced the direct benefit transfer for fertiliser subsidies, India | Agrowon

खतांवरील अनुदान थेट शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यांत
वृत्तसेवा
शनिवार, 14 ऑक्टोबर 2017
नवी दिल्ली ः खतांवरील अनुदान लाभार्थी शेतकऱ्यांच्या थेट बॅंक खात्यांत जमा करण्यासाठी केंद्र सरकारने थेट अनुदान हस्तांतर योजना (डीबीटी) सुरू केली आहे.
 
देशातील सात राज्ये आणि दिल्लीसह अन्य केंद्रशासित प्रदेशात १ ऑक्‍टोबरपासून या योजनेची अंमलबजावणी करण्यात आली आहे. तर दुसऱ्या टप्प्यात पंजाब, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश आदींसह १२ राज्यांत पुढील महिन्यांत ही योजना राबविली जाणार आहे. तसेच संपूर्ण देशभरात जानेवारी २०१८ पर्यंत या योजनेची अंमलबजावणी केली जाणार आहे, असे सरकारी सूत्रांनी सांगितले. 
 
नवी दिल्ली ः खतांवरील अनुदान लाभार्थी शेतकऱ्यांच्या थेट बॅंक खात्यांत जमा करण्यासाठी केंद्र सरकारने थेट अनुदान हस्तांतर योजना (डीबीटी) सुरू केली आहे.
 
देशातील सात राज्ये आणि दिल्लीसह अन्य केंद्रशासित प्रदेशात १ ऑक्‍टोबरपासून या योजनेची अंमलबजावणी करण्यात आली आहे. तर दुसऱ्या टप्प्यात पंजाब, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश आदींसह १२ राज्यांत पुढील महिन्यांत ही योजना राबविली जाणार आहे. तसेच संपूर्ण देशभरात जानेवारी २०१८ पर्यंत या योजनेची अंमलबजावणी केली जाणार आहे, असे सरकारी सूत्रांनी सांगितले. 
 
या योजनेंतर्गत सर्व अनुदानित खताची रक्कम थेट हस्तांतरण पद्धतीने जमा होणार आहे. शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात खते मिळावीत, यासाठी केंद्र सरकार दरवर्षी ७० हजार कोटी अनुदान देते. खतांवरील अनुदान थेट बॅंक खात्यात जमा करण्याची योजना ही गॅस सिलिंडवरील अनुदान बॅंक खात्यात जमा करण्याच्या योजनेपेक्षा काही प्रमाणात वेगळी आहे.
 
शेतकऱ्यांना खतांवरील खर्चाचा अतिरिक्त भार पडू नये, याची काळजी घेतली जात आहे. शेतकऱ्यांना अनुदानित दरात खते उपलब्ध करण्याची योजना कायम सुरूच राहणार आहे, असे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
 
काही खते महाग असल्याने शेतकऱ्यांना ती खरेदी करणे परवडत नाहीत. त्यासाठी शेतकऱ्यांनी वितरकांकडून खते खरेदी केल्यानंतर त्यांची नोंद पॉस मशिनमध्ये राहणार आहे. ज्यावेळी वितरकांकडून खते विक्रीची आकडेवारी सरकारी संकेतस्थळावर अपलोड होईल; त्यानंतरच खतांचे अनुदान कंपन्यांना वितरीत केले जाणार आहे.
 
देशातील बहुतांश राज्यात पॉस मशिनची व्यवस्था केली आहे. या यंत्रणेत शेतकरी, वितरक आणि व्यवहाराची माहिती नोंद होणार आहे. देशातील विविध भागांत पॉस मशिनची सुविधा ६० टक्के उपलब्ध करण्यात आली आहे. या मशिनचा तुटवडा नाही. या यंत्रणेचा वापर सर्व राज्यांकडून होईल, अशी अपेक्षा केंद्र सरकारने व्यक्त केली आहे.
 
पुढील महिन्यात बारा राज्यांत अंमलबजावणी
देशातील मिझोराम, नागालॅंड, दिल्ली, पुद्दुचेरी, गोवा, दमण आणि दीव, दादरा आणि नगर हवेली या ठिकाणी डीबीटी योजनेची १ ऑक्‍टोबरपासून अंमलबजावणी करण्यात आली आहे. दुसऱ्या टप्प्यात पुढील महिन्यांत १२ राज्यांत ही योजना राबविली जाणार असल्याचे केंद्र सरकारकडून सांगण्यात आले आहे.

इतर अॅग्रो विशेष
कोकण, दक्षिण- मध्य महाराष्ट्रात आज... पुणे : पश्‍चिम मध्य प्रदेश, मध्य महाराष्ट्र आणि...
जपानमधील शहरी शेतीजपान हे हजारो बेटांपासून तयार झालेले एक विकसित...
कुठे दिलासा, कुठे चिंताराज्यातील शेतकरी परतीच्या पावसाची वाट पाहून थकला...
नाशिक जिल्ह्यातील काही भागाला अवकाळी...नाशिक : नाशिक जिल्ह्यातील अनेक भागात सोमवारी...
सांगलीत वादळी पावसाने द्राक्षबागांचे...सांगली ः द्राक्षाला दर चांगले मिळतील म्हणून लवकर...
अॅग्रोवन सरपंच महापरिषद शनिवारपासून...पुणे  : कृषी, ग्रामविकास आणि जलसंधारण...
अवकाळी पावसाचा पुन्हा तडाखापुणे  ः दक्षिण महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र,...
दुष्काळग्रस्तांना मदत, आरक्षणावरून...मुंबई   ः मराठा, मुस्लिम आणि धनगर आरक्षण...
गोड धाटाच्या ज्वारीपासून इथेनॉल नव्हे,...सध्या पेट्रोलसाठी पर्याय म्हणून इथेनॉल...
पिकते तिथेच करा प्रक्रियाहरितक्रांतीच्या काळात देशात साधनसंपत्ती विपुल...
कापूस गाठींचे देशांतर्गत उत्पादन घटणारजळगाव ः कापूस हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात...
दुष्काळप्रश्नी विरोधकांचा राज्य सरकारवर...मुंबई : दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना तातडीने मदत...
वादळी पावसाचा दणकापुणे : कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांत...
कोकण, मध्य महाराष्ट्रात आजही पावसाची...पुणे : पावसाला पोषक हवामान असल्याने राज्यात...
पुरवणी मागण्या : दुष्काळग्रस्तांच्या...मुंबई : हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी...
राज्यातील ७४ पाणलोट क्षेत्रांमध्ये अधिक...पुणे  : यंदा कमी पाऊस झाल्याने भूजल...
आयटी क्षेत्रातील नोकरीपेक्षा हिरव्या...शेतीतील विविध संकटांमुळे युवक शेती सोडून नोकरी,...
नवे काश्मीर घडवणारे ‘बसेरा- ए- तबस्सुम'अधिक कदम या कोसेगव्हाण (ता. श्रीगोंदा, जि. नगर)...
पर्यायी चाऱ्यासाठी काटे विरहित निवडूंगमुरमाड, कुरण जमिनी, वालुकामय जमिनी तसेच शेती बांध...
ऊसतोडणीचे काम थांबवले शेतीतून नवी उमेद...शिरूर कासार (जि. बीड) या दुष्काळी तालुक्‍यातील...