agriculture news in marathi, Centre-South Brazil sugar output up | Agrowon

ब्राझीलच्या साखर उत्पादनात वाढ
कोजेन्सिस वृत्तसेवा
बुधवार, 27 डिसेंबर 2017

नवी दिल्ली : दक्षिण-मध्य ब्राझीलमधील साखर कारखान्यांनी डिसेंबरच्या पंधरवाड्यात एकूण ५०६००० टन साखरेचे उत्पादन घेतले आहे. गेल्या वर्षात या कालावधीत येथे कारखान्यांनी ३७५००० टन साखर उत्पादित केली होती. तुलनेत यंदा ३४.८ टक्क्यांनी वाढ झाल्याचे साखर उद्योग संघटनेच्या (यूएनआयसीए) अहवालात म्हटले आहे.

नवी दिल्ली : दक्षिण-मध्य ब्राझीलमधील साखर कारखान्यांनी डिसेंबरच्या पंधरवाड्यात एकूण ५०६००० टन साखरेचे उत्पादन घेतले आहे. गेल्या वर्षात या कालावधीत येथे कारखान्यांनी ३७५००० टन साखर उत्पादित केली होती. तुलनेत यंदा ३४.८ टक्क्यांनी वाढ झाल्याचे साखर उद्योग संघटनेच्या (यूएनआयसीए) अहवालात म्हटले आहे.

साखर उत्पादन आणि निर्यात करण्यासाठी जागतिक पातळीवर ब्राझील आघाडीवर आहे. येथे साखरेचे उत्पादन एप्रिल ते मार्च या कालावधीत सुरू असते. दक्षिण मध्य ब्राझीलमध्ये कारखान्यात साखरेचे उत्पादन ऑक्टोबरपर्यंत सुरू असते. याच भागातून देशाच्या एकूण ९० टक्क्यांहून अधिक साखरेचे उत्पादन घेतले जाते.

एप्रिल-ऑक्टोबरमधील गळीत हंगामात (१ एप्रिल ते १५ डिसेंबर) ५७८.७६ दशलक्ष टन उसाचे गाळप करण्यात आले असून, यामध्ये वार्षिक १.७ टक्क्यांनी घसरण झाली. यामधून सुमारे ३५.५९ दशलक्ष टन साखरेचे उत्पादन झाले असून, हे मागील वर्षीच्या तुलनेत १.४ टक्क्यांनी वाढले आहे.

इथेनॉल उत्पादन स्थिती
जागतिक इथेनॉल उत्पादनात ब्राझीलचा क्रमांक दुसरा आहे, तर एकूण जागतिक इथेनॉल उत्पादनापैकी २० टक्के वाटा असून, जागतिक इथेनॉल निर्यातीतही २० टक्के वाटा आहे. दरम्यान, यंदाच्या हंगामात दक्षिण-मध्य विभागातील कारखान्यांनी २४.९६ अब्ज लिटर इथेनॉलचे उत्पादन केले असून, गेल्या वर्षी याच कालावधीत २४.७५ अब्ज लिटर इथेनॉलची निर्मिती झाली होती.

ब्राझीलमध्ये एकूण उस गाळपापैकी :

  • साखर उत्पादनासाठी ४७ टक्के वापर
  • इथेनॉल निर्मीतीसाठी ५३ टक्के वापर

इतर ताज्या घडामोडी
परभणी जिल्ह्यात हुमणीच्या नुकसानीचा कहरपरभणी ः परभणी जिल्ह्यात उद्‍भवलेल्या दुष्काळी...
बाजार समिती कर्मचारी शासन आस्थापनावर...पुणे  ः राज्यातील बाजार समित्यांमधील...
पुणे विभागात चारापिकांची एक लाख...पुणे   ः जनावरांसाठी चाऱ्याची अडचण येऊ नये...
साताऱ्यात उसावर ‘हुमणी’चा प्रादुर्भावसातारा  ः जिल्ह्यातील विविध पिकांवर ‘हुमणी’...
नगर जिल्ह्यात ३५ हजार हेक्‍टरवरील उसावर...नगर  ः नगर जिल्ह्यात यंदा उसावर ‘हुमणी’चा...
‘पंदेकृवि’तील शिवारफेरीला शेतकऱ्यांचा...अकोला  ः डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी...
महसूल राज्यमंत्र्यांनी घेतला महागावमधील...महागाव, जि. यवतमाळ  ः दुष्काळग्रस्त भागात...
महाराष्ट्रातील जनताच पंतप्रधान मोदी...शिर्डी, जि. नगर   ः घरकुलाचा लाभ देण्यासाठी...
सरकारने कर्जमाफीत घोटाळा केला : उध्दव...नगर  ः राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी...
पुण्यात भाजीपाल्याच्या मागणीत वाढ; दरही...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
नाशिक जिल्ह्यात सर्वपक्षीय पाणी बचाव...नाशिक  : मराठवाड्यातील जायकवाडी धरणात नाशिक...
इंदापूर बाजार समितीत शेतीमाल तारण योजना...इंदापूर, जि. पुणे  ः महाराष्ट्र राज्य कृषी...
नगर जिल्ह्यात एप्रिलपासून चाराटंचाई...नगर  ः जिल्ह्यात यंदा पाऊस नसल्याचे...
शेतीतील सुधारणांसाठी कृषी विद्यापीठांची...अकोला   ः बदललेल्या परिस्थितीत शेतीतही मोठी...
नगर जिल्हा परिषदेत सरकार विरोधात...नगर  ः जिल्हा परिषदेच्या मालकीच्या...
शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत ‘राष्ट्रवादी...अकोला  ः तूर, सोयाबीन, हरभरा या पिकांचा विमा...
शेतकरीप्रश्नी ‘स्वाभिमानी’चे विदर्भ,... पुणे ः पश्चिम महाराष्ट्रातील दूध व ऊस...
औरंगाबादेत बटाटा प्रतिक्‍विंटल १००० ते...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
धुळीतील जिवाणूंना रोखण्यासाठी हवे...खिडक्यातून आत येणाऱ्या सूर्यप्रकाशामुळे धुळीमध्ये...
हळदीमध्ये भरणी, खत व्यवस्थापन...हळदीची उगवण आणि शाकीय वाढ यांनतर पुढील दोन...