Agriculture News in Marathi, Centre- South Brazil sugar output down | Agrowon

दक्षिण ब्राझीलमधील साखर उत्पादनात घट
कोजेन्सिस वृत्तसेवा
रविवार, 19 नोव्हेंबर 2017
नवी दिल्ली ः ब्राझील देश साखर उत्पादनात जगात अाघाडीवर अाहे. येथील दक्षिण भागातील कारखान्यांनी अाॅक्टोबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात १.८८ दशलक्ष टन साखर उत्पादन घेतले अाहे. हे उत्पादन गेल्या वर्षीच्या तुलनेत ८.७ टक्क्यांनी कमी अाहे, अशी माहिती ब्राझीलमधील साखर उद्योग संघटनेने दिली अाहे.
 
नवी दिल्ली ः ब्राझील देश साखर उत्पादनात जगात अाघाडीवर अाहे. येथील दक्षिण भागातील कारखान्यांनी अाॅक्टोबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात १.८८ दशलक्ष टन साखर उत्पादन घेतले अाहे. हे उत्पादन गेल्या वर्षीच्या तुलनेत ८.७ टक्क्यांनी कमी अाहे, अशी माहिती ब्राझीलमधील साखर उद्योग संघटनेने दिली अाहे.
 
अाॅक्टोबरअखेरीस येथील ऊस पट्ट्यात जोरदार पाऊस झाल्याने ऊस गाळप कमी झाल्याचे साखर कारखानदारांनी म्हटले अाहे. ब्राझील हा साखरेचा सर्वात मोठा निर्यातदार देश अाहे. एप्रिल ते मार्च दरम्यान येथील गाळप हंगामास सुरवात होते. येथील दक्षिण भागातील कारखाने अाॅक्टोबरपर्यंत ऊस गाळप करतात.
 
देशातील एकूण साखर उत्पादनाच्या ८० टक्के उत्पादन हे दक्षिण भागात घेतले जाते. येथील कारखान्यांनी १६ ते ३१ अाॅक्टोबरदरम्यान ३०.३ दशलक्ष टन उसाचे गाळप केले अाहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाचे ऊस गाळप ५.६ टक्क्यांनी कमी असल्याचे साखर उद्योग संघटनेने म्हटले अाहे.
 
एप्रिल ते अाॅक्टोबरदरम्यान येथील कारखान्यांनी ५२९.६० दशलक्ष टन साखर उत्पादन घेतले अाहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाचे गाळप २.८ टक्क्यांनी कमी अाहे. याच कालावधीत ३३.१० दशलक्ष टन साखर उत्पादन घेण्यात अाले अाहे. तर २२.१० दशलक्ष टन इथेनॉलचे उत्पादन घेण्यात अाले असल्याचे सांगण्यात अाले अाहे.

इतर अॅग्रो विशेष
वीज पडून जाणारे जीव वाचवामागील जूनपासून सुरू झालेला नैसर्गिक आपत्तींचा कहर...
जल व्यवस्थापनाच्या रम्य आठवणीजलव्यवस्थापनाचे धडे घेण्यासाठी कुठलेही पुस्तक...
कापूस उत्पादकतेत भारताची पीछेहाटजळगाव ः जगात कापूस लागवडीत पहिल्या क्रमांकावर...
अडीच कोटींचे अनुदान ‘हरवले’पुणे : राज्यातील शेतकऱ्यांना वाटण्यासाठी केंद्र...
उन्हाचा चटका काहीसा कमी पुणे ः गेल्या दोन दिवसांपासून उन्हाच्या चटक्यात...
ऊस पट्ट्यात द्राक्ष शेतीतून साधली...लातूर जिल्ह्यातील आनंदवाडी (ता. चाकूर) हे गाव ऊस...
खारपाणपट्ट्यात कृषी विद्यापीठाने दिला...खारपाणपट्ट्यात विविध हंगामात पिके घेण्यावर...
शेतीमाल दरवाढीचे लाभार्थी सधन शेतकरीचमिलिंद मुरुगकर यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्या...
व्यवस्था परिवर्तन कधी?सतराव्या लोकसभेची निवडणूक सध्या सुरू आहे. एक...
राज्यातील दहा मतदारसंघांत आज मतदानपुणे ः लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात...
मराठवाड्यात सव्वाचार लाख जनावरे चारा...औरंगाबाद : गत आठवड्याच्या तुलनेत औरंगाबाद, बीड व...
नुकसानीचे पंचनामे होणार केव्हा?जळगाव  ः खानदेशात सलग तिसऱ्या दिवशी म्हणजेच...
जीपीएसद्वारे टँकर्सचे नियंत्रण करा ः...मुंबई : राज्यातील धरण व तलावांमध्ये उपलब्ध...
राज्यात कोरड्या हवामानाचा अंदाजपुणे : पूर्वमोसमी पावसाच्या सर्वच भागात हजेरी...
चीनची दारे भारतीय केळीसाठी बंदच जळगाव ः अतिथंडी व फी जारियम विल्ट या रोगामुळे...
वादळी पावसाने दाणादाणपुणे  : सोसाट्याचा वारा, मेघगर्जना, विजा,...
उत्पादन वाढले; पण उठाव ठप्पशेतकऱ्यांच्या दृष्टीने चालू ऊस हंगाम फारसा ठीक...
शुभवार्तांकनावर शिक्कामोर्तबअर्धा देश दुष्काळाने आपल्या कवेत घेतला आहे....
'कोरडवाहू'साठी एक तरी शाश्‍वत पीक...माझ्याकडे उत्तम बागायतीची सुविधा असून, गेल्या २०-...
खानदेशात चाराटंचाईचे संकटजळगाव : खानदेशातील पशुधनाच्या रोजच्या गरजेपेक्षा...