agriculture news in marathi, Centre to support state ballworm proposal : agriculture minister Radhamohan shing | Agrowon

बोंड अळीग्रस्तांना प्रस्तावाला केंद्राचे संपूर्ण सहकार्य : राधामोहनसिंह
टीम अॅग्रोवन
बुधवार, 20 डिसेंबर 2017

नागपूर : बोंड अळीग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे राहील आणि राज्याच्या प्रस्तावाला केंद्राचे संपूर्ण सहकार्य असेल, अशी ग्वाही केंद्रीय कृषिमंत्री राधामोहनसिंह यांनी दिली असल्याची माहिती राज्याचे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी दिली. बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे राज्यात उत्पन्न झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय कृषिमंत्री राधामोहनसिंह आणि केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत रामगिरी येथे उच्चस्तरीय बैठक पार पडली.

नागपूर : बोंड अळीग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे राहील आणि राज्याच्या प्रस्तावाला केंद्राचे संपूर्ण सहकार्य असेल, अशी ग्वाही केंद्रीय कृषिमंत्री राधामोहनसिंह यांनी दिली असल्याची माहिती राज्याचे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी दिली. बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे राज्यात उत्पन्न झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय कृषिमंत्री राधामोहनसिंह आणि केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत रामगिरी येथे उच्चस्तरीय बैठक पार पडली.

गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव पाहता पुढच्या वर्षीसाठी घ्यावयाची काळजी आणि त्यासाठी करावयाचे उपाय यावरसुद्धा या उच्चस्तरीय बैठकीत चर्चा झाली. यातून उद्‌भवलेल्या कीटकनाशक फवारणीच्या समस्यांबाबतही चर्चा झाली. शेतकऱ्यांना चांगले बियाणे उपलब्ध करून देण्याची गरज यावरही भर देण्यात आला. माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनीही व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे बोंड अळी प्रादुर्भावासंदर्भात आपले मत मांडले. कृषी क्षेत्रातील विविध मान्यवरांनीसुद्धा आपली मते व्यक्त केली. या सर्व सूचनांनंतर केंद्रीय कृषिमंत्र्यांनी राज्याला सर्वोतोपरी मदत देण्याचे आश्वासन दिले.

या वेळी कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर, सहकारमंत्री सुभाष देशमुख, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, खासदार सर्वश्री रामदास तडस, कृपाल तुमाने, संजयकाका पाटील, राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, आमदार अनिल बोंडे, कृषी विभागाचे प्रधान सचिव विजय कुमार, कृषी आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे उपमहासंचालक डॉ. ए. के. सिंग, अतिरिक्त महासंचालक पी. के. चक्रवर्ती, महिकोचे राजेश बारवाले, साउथ एशिया बायोटेक्‍नॉलॉजी सेंटरचे अध्यक्ष व शास्त्रज्ञ डॉ. सी. डी. माईक, केंद्रीय कापूस अनुसंधान संस्थेचे संचालक डॉ. व्ही. एन. वाघमारे, माजी कुलगुरू डॉ. शरद निंबाळकर, पणन विभागाचे उपसचिव के. जी. वळवी, कृषी संचालक एम. एस. घोलप, एस. एल. जाधव, क्रॉपकेअर फेडरेशनचे अध्यक्ष राजू श्रॉफ, कृषी विद्यापीठाचे कुलगुरू, महाराष्ट्र राज्य पणन महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी, कृषी क्षेत्राचे संशोधक आदी उच्चस्तरीय बैठकीस उपस्थित होते.

प्रारंभी कृषी विभागाचे प्रधान सचिव विजय कुमार यांनी बोंड अळीमुळे निर्माण झालेली परिस्थिती तसेच राज्य शासनातर्फे मदत. बोंड अळीवरील नियंत्रण व कापूस उत्पादन शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत बैठकीत माहिती दिली.

इतर ताज्या घडामोडी
राज्यातील चौदा मतदारसंघांत आज मतदानमुंबई   ः लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या...
स्थानिक घटकांपासून नावीन्यपूर्ण सौर...तीव्र थंडीच्या स्थितीमध्ये वापरण्यायोग्य सौर...
जळगावात हरभऱ्याची ऑनलाइन नोंदणी आज बंदजळगाव : जिल्ह्यात शासकीय हरभरा खरेदीसाठी अजून...
रावेर, जळगावसाठी आज मतदानजळगाव : लोकसभा निवडणुकीच्या जळगाव व रावेर...
वाळूउपशामुळे विहिरींच्या पाणीपातळीत घटनाशिक : बागलाण तालुक्यातील ताहाराबाद ...
नांदेड जिल्ह्यात अडीच हजार कोटींचे...नांदेड ः नांदेड जिल्ह्यातील विविध बॅंकांना २०१९-...
राज्याचे एक थेंबही पाणी गुजरातला देऊ...नाशिक  : ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी...
धर्मराजाचा कडाही यंदा आटलामाजलगाव, जि. बीड : माजलगाव धरणालगतच असलेला...
लक्षवेधी माढ्यासाठी आज मतदानसोलापूर  : अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या...
जळगाव बाजारात केळी दरात सुधारणाजळगाव ः जिल्ह्यात मुक्ताईनगर व रावेरात दर्जेदार...
नगरमध्ये प्रशासन गुंतले निवडणुकीत,...नगर  : दुष्काळात जनावरे जगविण्यासाठी चारा...
पुणे विभागात तेरा हजार हेक्टरवर चारा...पुणे : पाणीटंचाईमुळे चाऱ्याची चांगलीच टंचाई...
पुणे जिल्ह्यात पाणीटंचाईमुळे फळबागा...पुणे  ः कमी झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील...
नगर लोकसभा मतदारसंघात आज मतदाननगर : नगर लोकसभा मतदारसंघासाठी आज (मंगळवारी) २०३०...
यवतमाळ जिल्ह्यात दोन लाख टन खतांची मागणीयवतमाळ  : येत्या खरीप हंगामासाठी कृषी...
यवतमाळ जिल्ह्यात होणार ६६४ विहिरींचे...यवतमाळ  ः जिल्ह्यात दिवसेंदिवस गंभीर होत...
कळमणा बाजारात तुरीच्या दरात सुधारणानागपूर ः कळमणा बाजार समितीत तुरीची आवक...
अमरावतीतील दहा हजारांवर शेतकऱ्यांचे... अमरावती  ः निसर्गाचा लहरीपणामुळे शेतकरी...
शरद जोशीप्रणीत शेतकरी संघटनेच्या...जळगाव   ः लोकसभा निवडणुकीसाठी नाशिक...
शेतकरी आणि व्यापाऱ्यांमधील ...नाशिक  : कृषी अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी...