परभणीत पाणीपुरवठ्याच्या टॅंकरचे शतक

परभणीत पाणीपुरवठ्याच्या टॅंकरचे शतक
परभणीत पाणीपुरवठ्याच्या टॅंकरचे शतक

परभणी : मोसमी पावसाचे आगमन लांबल्याने जिल्ह्यातील पाणीटंचाईचे संकट दिवसागणिक गहिरे होत आहे. जिल्ह्यातील सर्व नऊ तालुक्यांतील ७९ गावे, २२ तांडे अशा एकूण १०१ लोकवस्त्यांवरील १ लाख ६६ हजार ९३१ एवढ्या लोकांना १०० टॅंकरव्दारे पाणीपुरवठा सुरू आहे. जिल्ह्यात ४७९ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील टंचाई निवारण कक्षातील सूत्रांनी दिली.

गेल्या महिन्यापर्यंत पाथरी तालुका वगळता अन्य आठ तालुक्यांमध्ये टॅंकर सुरू होते. परंतु, या महिन्यात पाथरी तालुक्यात देखील टॅंकर सुरू झाले. बाष्पीभवनाचा वाढलेला वेग, बेसुमार उपसा, यामुळे जिल्ह्यातील तलाव, विहिरी, कूपनलिका यांसह नळपाणीपुरवठा योजनांचे जलस्त्रोत कोरडे पडले आहेत. ग्रामीण भागातील पाणीटंचाईचे स्वरूप गंभीर झाले आहे. ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. टंचाईग्रस्त गावांत टॅंकर सुरू केले जात आहेत. विहिरी, कूपनलिकांत अधिग्रहण सुरू आहे.

शुक्रवार (ता. १४) पर्यंत जिल्ह्यातील एकूण ७९ गावे, २२ वाडे, तांड्यांना ६ शासकीय आणि ९४ खासगी अशा एकूण १०० टॅंकरव्दारे पाणीपुरवठा केला जात आहे. जिल्ह्यातील ३८५ टंचाईग्रस्त गावातील एकूण ४७९ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले. यामध्ये ८८ विहिरी टॅंकरसाठी, तर ३९१ विहिरी टॅंकरव्यतिरिक्त आहेत.

तालुकानिहाय टॅंकरची संख्या

तालुका टॅंकर
परभणी
जिंतूर १६
सेलू ११
मानवत
पाथरी
सोनपेठ
गंगाखेड १५
पालम २३
पूर्णा   १६

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com