agriculture news in Marathi, Cereal cultivation increased in rabbi season in India, Maharashtra | Agrowon

देशात कडधान्याचा पेरा वाढला
कोजेन्सिस वृत्तसेवा
सोमवार, 25 डिसेंबर 2017

नवी दिल्ली ः देशात यंदा रब्बी हंगामातील पेरणी क्षेत्रात गेल्या वर्षीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या ५४.५ दशलक्ष हेक्टरच्या तुलनेत यंदा ५४.६ दशलक्ष हेक्टरवर पेरणी झाल्याचे कृषी मंत्रालयाच्या आकडेवारीवरून दिसून येते. मात्र रब्बी हंगामात कडधान्याच्या लागवड क्षेत्रात वाढ झाली असून यंदा १४.६ दशलक्ष हेक्टरवर पेरणी झाली आहे. गेल्या वर्षी १३.४ दशलक्ष हेक्टरवर कडधान्य पिकांची पेरणी झाली होती.  

नवी दिल्ली ः देशात यंदा रब्बी हंगामातील पेरणी क्षेत्रात गेल्या वर्षीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या ५४.५ दशलक्ष हेक्टरच्या तुलनेत यंदा ५४.६ दशलक्ष हेक्टरवर पेरणी झाल्याचे कृषी मंत्रालयाच्या आकडेवारीवरून दिसून येते. मात्र रब्बी हंगामात कडधान्याच्या लागवड क्षेत्रात वाढ झाली असून यंदा १४.६ दशलक्ष हेक्टरवर पेरणी झाली आहे. गेल्या वर्षी १३.४ दशलक्ष हेक्टरवर कडधान्य पिकांची पेरणी झाली होती.  

सरकराने यंदा शेतकऱ्यांना कडधान्य पेरणीला प्रोत्साहन दिले आणि किमान आधारभूत किमतीत केलेली वाढ, अशा सरकारी धोरणांमुळे कडधान्य पीक लागवड क्षेत्रात वाढ झाल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यातच सरकारने डाळींवरील निर्यातबंदी उठवली आहे. तसेच तुरीवर १० टक्के, पिवळ्या वाटाण्यावर ५० टक्के आणि हरभरा आणि मसूरवरील आयात शुल्क प्रत्येकी ३० टक्क्यांनी वाढविले आहे. त्याचा उडीद आणि मुगाच्या आयातीवरही परिणाम झाला आहे. 

रब्बीतील प्रमुख पीक असलेल्या हरभऱ्याचे लागवड क्षेत्र वाढविण्यासाठी सरकारने प्रयत्न केले असून त्यामुळे हरभऱ्याच्या क्षेत्रात गेल्या वर्षीच्या तुलनेत १३.९ टक्क्यांनी वाढ झाली असून ते १० दशलक्ष हेक्टरवर पोचले आहे. मात्र गव्हाचे लागवड क्षेत्र यंदा कमी झाले असून एकूण २.६३ दशलक्ष हेक्टरवर गव्हाची पेरणी झाली आहे. गेल्या वर्षी २.७३ दशलक्ष हेक्टरवर गव्हाची लागवड झाली होती. त्यातच सरकारने गव्हावरील आयात शुल्क दुपट्टीने वाढविले आहे. तसेच शेतकरीदेखील देशांतर्गत कमी किमतीमुळे गव्हाची पेरणी करण्यास उत्सुक नसल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

दरम्यान, दर घसरल्यामुळे मोहरी आणि तेलबियांच्या लागवड क्षेत्रातदेखील घट झाली आहे. गेल्या वर्षीच्या ६.८ दशलक्ष हेक्टरच्या तुलनेत यंदा ६.३ दशलक्ष हेक्टरवर मोहरी आणि तेलबियांची पेरणी झाली आहे.

इतर अॅग्रो विशेष
‘उजनी’तील पाणीसाठा उणे पातळीत सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी...
राज्यभरात अन्नत्याग आंदोलनमुंबई ः शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रती...
मार्चनंतरही पणन करणार कापूस बाजारात...यवतमाळ ः शेतकऱ्यांच्या घरातील कापूस विकल्या...
मढी यात्रेला बुधवारपासून प्रारंभनगर ः होळीच्या दिवशी सकाळी कानिफनाथांच्या समाधीला...
दर्जेदार ऊसबेण्याची केली निर्मिती काशीळ (ता. जि. सातारा) येथील उच्चशिक्षित व...
मतदानासाठी सकाळी सात ते सायंकाळी...अकोला ः देशात होत असलेल्या लोकसभा...
कोकणातील आंबा अडकला धुक्याच्‍या फेऱ्यातवेंगुर्ले, जि. सिंधुदुर्ग : ऐन हंगामातच कोकणातील...
विदर्भात वादळी पावसाची शक्यतापुणे : मध्य भारतात होत असलेल्या वाऱ्यांच्या...
हळदीचे दिवसातून दोन वेळा सौदेसांगली ः सांगली बाजार समितीत गेल्या दोन ते...
पदविकाधारकांना कृषिसेवेचे दरवाजे बंद... पुणे : राज्याच्या शेतकरी कुटुंबातील हजारो...
सर्वसामान्यांचा असामान्य नेतामाजी संरक्षणमंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर...
सर्जनशीलतेला सलाम!व र्ष २०१७ च्या खरीप हंगामात कापसावर फवारणी...
प्राणघातक हृदयरोगाचे प्रमाण होतेय कमीगेल्या दोन वर्षामध्ये हृदयरोगाला प्रतिबंध आणि...
अन्नत्याग आंदोलनास प्रारंभ : अमर हबीब,...नवी दिल्ली : शेतकरी आत्महत्यांप्रती सहवेदना आणि...
मच्छीमारी व्यवसायाने आणली समृद्धीगणित विषयात पदवी असूनही बेरोजगार राहणं नशिबी आलं...
काबुली हरभऱ्याने उंचावले अर्थकारण चोपडा तालुक्‍यातील (जि. जळगाव) तापी व अनेर...
जत तालुक्यात द्राक्ष, डाळिंब बागा...सांगली : जत तालुक्यात पश्‍चिम भाग वगळता...
प्रकल्प व्यवस्थापकावर कारवाईचे आदेशपुणे : एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन...
सहवेदना :आज अन्नत्याग आंदोलनयवतमाळ: शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रति...
उन्हाची काहिली वाढलीपुणे: राज्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाची...