agriculture news in marathi, cereals procurement centers Status, jalgaon, maharashtra | Agrowon

जळगाव जिल्ह्यात खरेदी केंद्रांना प्रतिसाद नाहीच
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 28 नोव्हेंबर 2017
१६ भरडधान्य खरेदी केंद्र सुरू करायला मार्केटिंग फेडरेशनने मंजुरी दिली आहे. सहा केंद्रांना प्रारंभ झाला. परंतु इतर केंद्रांना गोदामे नाहीत. कडधान्याची खरेदी तीन केंद्रांवर सुरू आहे. तीनच केंद्रे जिल्ह्यात मंजूर आहेत. 
- सुभाष पी. माळी, विपणन अधिकारी, मार्केटिंग फेडरेशन.
जळगाव  : जिल्ह्यात एक महिन्यापूर्वी सहा भरडधान्य खरेदी केंद्रांचा प्रारंभ धूमधडाक्‍यात झाला, पण यापैकी फक्त तीन केंद्रांवरच धान्य खरेदी झाली आहे. कडधान्य खरेदी केंद्रांवरही फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. १६ भरडधान्य खरेदी केंद्रे मंजूर आहेत, त्यापैकी फक्त सहाच केंद्रे कागदावर सुरू असल्याचे चित्र आहे. 
 
जिल्ह्यात १ नोव्हेंबरपासून १५ तालुक्‍यांमध्ये १६ भरडधान्य खरेदी केंद्रे सुरू करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाने दिले होते. त्यापैकी जामनेर, बोदवड, मुक्ताईनगर, रावेर, चोपडा, अमळनेर व भुसावळ येथे या केंद्रांना प्रारंभ झाला.
 
परंतु या सहा केंद्रांपैकी फक्त तीनच केंद्रे सुरू असून, त्यात अमळनेर केंद्रात २३१ क्विंटल ज्वारीची आणि ९०५ क्विंटल मक्‍याची खरेदी झाली. बोदवड येथे ज्वारीची आवकच झालेली नाही; तर मक्‍याची ६५.५० क्विंटल खरेदी झाली. जामनेर येथील केंद्रात ज्वारी व मक्‍याची खरेदी झाली आहे, परंतु त्याची आकडेवारी मार्केटिंग फेडरेशनकडे सोमवारी (ता. २७) उपलब्ध नव्हती.
अर्थातच इतर १३ केंद्रे निष्क्रिय असून, त्यांना तहसील कार्यालयाकडून गोदामे उपलब्ध नसल्याने खरेदी झालेली नसल्याचे सांगण्यात आले. 

जिल्ह्यात पाचोरा, जळगाव व अमळनेर येथे मार्केटिंग फेडरेशनचे सब एजंट म्हणून बाजार समिती व इतर संस्थांनी कडधान्य खरेदी केंद्र सुरू केले. परंतु या केंद्रांवरही अल्प आवक होत आहे. या तिन्ही केंद्रांवर उडदाची मिळून २४००, मुगाची १९९४ आणि सोयाबीनची फक्‍त ९३.५० क्विंटल खरेदी झाली आहे.

सोयाबीनची अत्यल्प खरेदी झाल्याचे स्पष्ट झाले असून, निकषांमुळे ही आवक कमी असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. आर्द्रता, कचरा अशी कारणे सांगून खरेदी टाळली जाते. शेतकऱ्यांना परत पाठविले जाते, असे दावे शेतकऱ्यांनी केले आहेत. 

इतर ताज्या घडामोडी
प्रकाश संश्लेषणातून जीएम भात उत्पादनात...भात पिकामध्ये होणारी प्रकाश संश्लेषणाची क्रिया...
मराठवाड्यातील पाणीसाठे तळालाऔरंगाबाद : मराठवाड्यातील दुष्काळाचं संकट...
अकोल्यात आंतरविद्यापीठ कर्मचारी क्रीडा...अकोला ः सुवर्ण जयंती क्रीडा महोत्सवातंर्गत येथे...
‘कर्जाची वरात मुख्यमंत्र्यांच्या दारात...नागपूर  ः शेतकऱ्यांचा सात-बारा उतारा सरसकट...
`सेवाकर प्रश्न मिटेपर्यंत सांगलीत...सांगली   : मुंबईत भाजप कार्यालयातील...
पुणे जिल्ह्यात गव्हाचे क्षेत्र ४१ हजार...पुणे  ः जमिनीत ओल नसल्याने यंदा रब्बी...
राज्यात तरी लोकायुक्तांची नियुक्ती करा...नगर   : ‘लोकायुक्त कायद्याची अंमलबजावणी...
कांदा पट्टयात अस्वस्थता; चौघांनी संपवले...नाशिक   ः गंभीर दुष्काळ स्थिती, कर्ज,...
`कृषिक`मध्ये शेवंतीच्या जाती,...बारामती, जि. पुणे  ः येथे आयोजित कृषिक...
कांद्याच्या उभ्या पिकात चरण्यासाठी...राहुरी, जि. नगर  : कूपनलिकेचे पाणी अचानक...
‘एमसीडीसी’ शेतकरी कंपन्या स्थापन करणारपुणे : महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ नाबार्डच्या...
संत्रा पिकाबाबतच्या उपाययोजनांचा अहवाल...नागपूर  ः संत्रा उत्पादकांचे आर्थिक हित...
सूक्ष्म सिंचन विस्तारातील अडचणी, पर्याय...औरंगाबाद   : औरंगाबाद येथे आयोजित...
‘ई- टेंडरिंग’ रेशीम उत्पादकांच्या मुळावरपुणे  ः राज्यात पाणीटंचाईमुळे सर्वत्र...
आंदोलनामुळे शेतकऱ्यांना मिळाले ७४...पुणे  : साखर आयुक्तालयासमोर गेल्या तीन...
रोहित पवार यांनी वाढवला नगर जिल्ह्यात... नगर : कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात मरगळ...
लोणार तालुक्यात कडाक्याच्या थंडीमुळे...बुलडाणा : जिल्ह्यात द्राक्ष शेती टिकवून ठेवण्यात...
कृषी सल्ला (कोकण विभाग)भात रोप अवस्था : उन्हाळी भात रोपवाटिकेस...
थंडीच्या काळात केळी बागांची काळजीकेळीच्या पानांवर कमी तापमानाचे दुष्परिणाम २ ते ४...
पहाटे, रात्री थंडीचे प्रमाण अधिक राहीलमहाराष्ट्राच्या सह्याद्री पर्वत रांगावर १०१४...