छगन भुजबळ लीलावती रुग्णालयात

छगन भुजबळ लीलावती रुग्णालयात
छगन भुजबळ लीलावती रुग्णालयात

मुंबई : आर्थिक अफरातफरीच्या आरोपामुळे दोन वर्षे कारागृहात कैद राहिल्यानंतर जामिनावर सुटलेले राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना सोमवारी (ता.१४) लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. गेल्याच आठवड्यात त्यांना केईएम रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. गॅस्ट्रोलोजीचा त्रास होत असल्याने भुजबळ यांना गेल्या आठवड्यात केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर शस्त्रक्रिया आवश्‍यक असल्याचे उपचारादरम्यान स्पष्ट झाले; परंतु शस्त्रक्रिया केईएम रुग्णालयात न करण्याचा निर्णय भुजबळ यांच्या कुटुंबीयांनी घेतला. त्यानंतर  ते लीलावती रुग्णालयात दाखल झाले. त्यांच्यावर तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरू असल्याचे लीलावतीकडून स्पष्ट करण्यात आले; मात्र भुजबळ यांच्या आरोग्याबाबत तपशील देण्यास लीलावती प्रशासनाने नकार दिला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com