agriculture news in marathi, chaitra pournima, Jyotiba yatra, kolhapur | Agrowon

लाखो भाविकांच्या उपस्थितीत फुलला जोतिबाचा डोंगर
टीम अॅग्रोवन
शनिवार, 31 मार्च 2018

कोल्हापूर : ढोल कैताळाच्या अखंड ठेक्यात ‘जोतिबाच्या नावानं चांगभलं’चा अखंड गजर, सजलेल्या, गगनाला भिडणाऱ्या सासनकाठ्या, खोबऱ्याचे तुकडे-गुलालाची उधळण, हलगी-ताशांचा कडकडाट...अशा मंगलमयी वातावरणात ‘दख्खनचा राजा’ श्री जोतिबा देवाची चैत्र यात्रा शनिवारी (ता.३१) उत्साही वातावरणात झाली. शनिवारी यात्रेचा मुख्य दिवस होता.

कोल्हापूर : ढोल कैताळाच्या अखंड ठेक्यात ‘जोतिबाच्या नावानं चांगभलं’चा अखंड गजर, सजलेल्या, गगनाला भिडणाऱ्या सासनकाठ्या, खोबऱ्याचे तुकडे-गुलालाची उधळण, हलगी-ताशांचा कडकडाट...अशा मंगलमयी वातावरणात ‘दख्खनचा राजा’ श्री जोतिबा देवाची चैत्र यात्रा शनिवारी (ता.३१) उत्साही वातावरणात झाली. शनिवारी यात्रेचा मुख्य दिवस होता.

देशाच्या कानाकोपऱ्यांतून आलेल्या लाखो भाविकांच्या आलोट गर्दी आणि गुलालाच्या उधळणीने अवघा जोतिबा डोंगर भक्तिमय वातावरणाने न्हाऊन निघाला. महाराष्ट्र, कर्नाटकसह विविध राज्यांतील भाविकांचे कुलदैवत आणि श्रद्धास्थान असलेल्या जोतिबा देवाची चैत्र यात्रा म्हणजे वर्षभरातला सर्वांत मोठा उत्सव. यानिमित्त शनिवारी पहाटे देवाची काकड आरती, पाद्यपूजा झाली. पन्हाळ्याचे तहसीलदार रामचंद्र चोबे यांच्या हस्ते देवाला शासकीय अभिषेक करण्यात आला. त्यानंतर देवाची राजेशाही थाटात पूजा बांधण्यात आली. पूजेनंतर देवाची मूर्ती दर्शनासाठी खुली करण्यात आली. 

यात्रेसाठी गेल्या दोन दिवसांपासूनच लाखो भाविक जोतिबा डोंगरावर दाखल झाले होते. राज्यासह परराज्यांतील कानाकोपऱ्यांतून लाखोंच्या संख्येने आलेल्या भाविकांच्या गर्दीने डोंगर परिसर फुलून गेला होता. खोबऱ्याचे बारीक तुकडे आणि गुलालाच्या उधळणीने मंदिराचा परिसर, आलेले नागरिक, भाविक गगनचुंबी सासनकाठ्यांचा भार हातांवर पेलत ढोल-ताशा, हलगीच्या कडकडाटात नृत्य करत होते. चारही बाजूंनी त्यांना दोरीच्या साहाय्याने आधार देणारे हात हा तोल सांभाळत होते.  यात्रेसाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. दुपारी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांच्यासह जिल्ह्यातील बहुतांशी लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत सासनकाट्यांची पूजा झाली.

इतर अॅग्रो विशेष
वेतन आयोग ठीक; पण शेतकरी आयोगाचे काय?१९४७ ते १९९० आणि १९९० ते २०१८ असे दोन भाग केले,...
वीजवापरातील ‘अंधार’वी ज दरवाढ तसेच शेती पंपासाठीची बिलं दुरुस्त करून...
परोपजीवी मित्रकीटकांची ओळखअळी-कोष-परोपजीवी (Larval-Pupal Parasitoid) या...
सांगलीत वाढली दुष्काळाची दाहकतासांगली : जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता वाढत आहे....
साखर कारखान्यांचे बॉयलर लवकर थंडावणारपुणे  : दुष्काळी स्थितीमुळे साखर...
नंदुरबार बाजार समितीत ओल्या लाल मिरचीची...जळगाव  ः खानदेशात एकीकडे थंडीने केळीला मोठा...
ॲग्रोवन स्मार्ट ॲवॉर्डसाठी शेतकऱ्यांचा...पुणे : संकटांपुढे हार न मानता प्रतिकूल...
टंचाईग्रस्त विसापूर झाले पाणीदार सातारा जिल्ह्यातील माण व खटाव कायम तीव्र...
विदर्भात गारपिटीचा इशारा; राज्यात...पुणे : पावसाला पोषक हवामान होत असल्याने आजपासून (...
‘एफआरपी’ची थकबाकी ४० हजार कोटींपर्यंत...पुणे : साखर उद्योगात तयार झालेल्या संकटामुळे...
गूळ उद्योगाला आर्थिक स्थैर्य देणे...मुंबई : ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे हित जपतानाच...
दुधाळ जनावरे वाटप योजनेत देशी गाईंचा...पुणे : देशी गोवंशाच्या संवर्धनासाठी संकरित दुधाळ...
बांबूशेतीमध्ये शेतकऱ्यांचे अर्थकारण...सोलापूर : ‘‘बांबू हे गवतवर्गीय पीक आहे....
‘ई-नाम’द्वारे देशातील बाजार समित्या...मुंबई : देशातील सर्व बाजार समित्या ‘ई-नाम’...
वेतन आयोगाने वाढते गरीब-श्रीमंतांतील दरीमाजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी ४ ...
दूध दरवाढीसाठीही दाखवा तत्परताआंतरराष्ट्रीय बाजारात दूध भुकटीचे (पावडर) दर...
मक्यातील लाग रंग येण्यामागील गूढ उलगडलेमक्यामध्ये काहीवेळा दिसणाऱ्या लाल रंगाच्या...
एफआरपी तुकड्यात घेणार नाही : खासदार...सांगली : राज्यातील साखर कारखाने सुरू होऊन ८० दिवस...
राज्यात १७८६ टॅंकरव्दारे पाणीपुरवठापुणे  : सलग दोन वर्षे पावसाने ओढ दिल्यानंतर...
केळी पट्ट्याला १५० कोटींचा फटकाजळगाव ः डिसेंबर व जानेवारी महिन्यातील थंडीचा...