agriculture news in Marathi, Chaitri wari celebration in Solapur, Maharashtra | Agrowon

चैत्री वारीचा पंढरपुरात उत्साह
टीम अॅग्रोवन
बुधवार, 28 मार्च 2018

पंढरपूर, जि. सोलापूर  ः पंढरपुरात चैत्र शुद्ध कामदा एकादशीच्या सोहळ्यामध्ये सुमारे दोन लाखांहून अधिक वारकरी मंगळवारी (ता. २७) सहभागी झाले होते. चंद्रभागा नदीचे वाळवंट, ६५ एकर आणि प्रदक्षिणा मार्गावरून निघालेल्या दिंड्यांमधील टाळ-मृदंगाचा गजर आणि हरिनामाच्या जयषोघामुळे पंढरी भक्तिमय झाली होती. दर्शनासाठी सुमारे अकरा तास लागत होते. चैत्री एकादशीनिमित्त श्री विठ्ठलाची पूजा मंदिर समितीचे सदस्य भास्कर गिरी महाराज यांच्या हस्ते, तर श्री रुक्‍मिणीमातेची पूजा मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी सचिन ढोले यांच्या हस्ते सपत्नीक झाली. 

पंढरपूर, जि. सोलापूर  ः पंढरपुरात चैत्र शुद्ध कामदा एकादशीच्या सोहळ्यामध्ये सुमारे दोन लाखांहून अधिक वारकरी मंगळवारी (ता. २७) सहभागी झाले होते. चंद्रभागा नदीचे वाळवंट, ६५ एकर आणि प्रदक्षिणा मार्गावरून निघालेल्या दिंड्यांमधील टाळ-मृदंगाचा गजर आणि हरिनामाच्या जयषोघामुळे पंढरी भक्तिमय झाली होती. दर्शनासाठी सुमारे अकरा तास लागत होते. चैत्री एकादशीनिमित्त श्री विठ्ठलाची पूजा मंदिर समितीचे सदस्य भास्कर गिरी महाराज यांच्या हस्ते, तर श्री रुक्‍मिणीमातेची पूजा मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी सचिन ढोले यांच्या हस्ते सपत्नीक झाली. 

चैत्री एकादशीच्या निमित्ताने चंद्रभागेत स्नानाची पर्वणी साधण्यासाठी पहाटेपासूनच लाखो वारकऱ्यांनी गर्दी केली होती. मात्र उजनी धरणातून भीमा नदीत सोडण्यात आलेले पाणी आज सकाळी साडेदहाच्या सुमारास पुंडलिक मंदिरापर्यंत आले होते. तत्पूर्वी सकाळी ९ वाजेपर्यंत लाखो भाविकांना नदीपात्रातील घाण पाण्याने स्नान करावे लागल्याने भाविकांनी प्रशासनाबद्दल नाराजी व्यक्त केली. श्री विठ्ठलाच्या दर्शनाची रांग गोपाळपूर रस्त्यालगतच्या एक नंबर पत्राशेडपर्यंत गेली होती.

सकाळी दहा वाजता श्री विठ्ठलाचे दर्शन घेऊन मंदिराबाहेर आलेले रघुनाथ युवराज पाटील (रा. कारंडे वाडी, ता. करवीर, जिल्हा ः कोल्हापूर) म्हणाले, ‘‘आम्ही रात्री नऊ वाजता स्मशानभूमीजवळच्या दर्शनरांगेत उभे होतो. अकरा तासांनी सकाळी नऊ वाजता आम्ही दर्शन घेतले. दर्शन रांगेत कुठेही घुसखोरी झाली नाही. नगर प्रदक्षिणेला निघालेल्या भाविकांच्या गर्दीने प्रदक्षिणा मार्ग फुलून गेला होता. दिंड्यांमधील हजारो वारकरी भरउन्हात टाळ-मृदंगाच्या गजरात तल्लीन होत, अभंग म्हणत नगर प्रदक्षिणा करताना दिसत होते.

शिंगणापूर यात्रेला जाण्यापूर्वी चंद्रभागा नदीत सासनकाठ्यांना स्नान घालून मंदिराभोवती प्रदक्षिणा घालण्याची प्रथा आहे. त्याप्रमाणे अनेक भाविक सासनकाठ्यांना घेऊन नगर प्रदक्षिणा करून शिंगणापूरच्या यात्रेला रवाना झाले. मंदिर समितीच्या वतीने लाडू प्रसादासाठी यंदा प्रथमच कागदी पिशव्यांचा वापर करण्यात येत आहे. भाविकांना पंढरपूर नगरपालिकेच्या वतीने यात्रेदरम्यान शहरात स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. पालिकेचे ३६५ व हंगामी ७५० सफाई कर्मचाऱ्यांकडून सर्वत्र स्वच्छता करण्यात येत आहे.

शहरातील कचरा आरोग्य विभागाकडील विविध वाहनांमधून तातडीने उचलण्यात येत आहे. याशिवाय ५५ घंटागाड्या नियमितपणे शहरातील कचरा गोळा करीत आहेत. यात्रा कालावधीमध्ये भाविकांच्या सुरक्षेसाठी व शहरात कोणतीही अनुचित घटना घडू नये याकरिता मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 

इतर अॅग्रो विशेष
उच्च जीवनमूल्य जपणारी आदिवासी संस्कृती मेळघाटात अंधश्रद्धेचे प्रमाण खूप आहे. यावर...
आर्थिक विकासवाट . देशात नोटाबंदीच्या निर्णयाला नुकतीच दोन वर्षे...
खानदेशातील जलसाठ्यात घट जळगाव : खानदेशात पाणीबाणी वाढू लागली असून,...
जिनर्स कापूस खरेदी केंद्रांसाठी ९००...जळगाव ः भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) कापूस...
राज्यात दुधाचे दर पुन्हा घसरलेपुणे: राज्यात होत असलेल्या जादा दुधाच्या...
दावणीला आणि छावणीला परिस्थितीनुसार चारा...बीड : राज्यात सरासरीच्या ७० टक्के पाऊस पडला असून...
सत्ताधाऱ्यांना नमवण्याची ताकद...मुंबई : गेल्या चार वर्षांत देश चुकीच्या...
दुष्काळातही माळरानावर हिरवाई फुलवण्याचे...लातूर जिल्ह्यातील वाघोली येथील सोनवणे कुटुंब...
सेंद्रिय पद्धतीने ऊस लागवड ते...लातूर येथील विलास सहकारी साखर कारखान्याने...
श्री विठ्ठल-रुक्मिणीचे २४ तास दर्शनसोलापूर ः पंढरपुरात श्री विठ्ठल -रुक्मिणीच्या...
हरभरा पेरणी ३३ टक्क्यांनी माघारलीनवी दिल्ली ः देशातील दुष्काळी स्थितीचा परिणाम...
राणी लक्ष्मीबाईंचे गाव बनले पाणीदारसातारा: झाशीची राणी लक्ष्मीबाईंचे मूळ गाव म्हणजे...
विदर्भापाठोपाठ मराठवाडा, मध्य...पुणे : राज्यात किमान तापमानाचा पारा घसरल्याने...
खानदेशात जनावरांची निम्म्या दरात विक्रीचाळीसगाव, जि. जळगाव ः लांबलेल्या व अवेळी पडलेल्या...
रब्बी पेरणी २० टक्क्यांनी घटलीनवी दिल्ली ः देशातील बहुतांशी भागात यंदाच्या...
सातारा, सोलापूर, परभणीत ऊसदरासाठी आंदोलनपुणे ः गेल्या गळीत हंगामातील थकबाकी द्यावी तसेच...
निर्यातीच्या केळीला १८०० रुपये दरजळगाव ः राज्यात निर्यातीच्या केळीला यंदा उच्चांकी...
नागपूर, गोंदिया गारठलेपुणे : उत्तरेकडील वाऱ्यांच्या प्रभावामुळे राज्यात...
ऊसदराबाबत हवे दीर्घकालीन धोरणऊसदराचा प्रश्न मिटत नाही तोपर्यंत आम्ही कोणताही...
दक्षिण महाराष्टात ऊसतोडी सुरूकोल्हापूर : ऊसदराचा तिढा शनिवारी (ता. ११) दुपारी...